Skip to main content

मिटण्याचा हव्यास (विडंबन)

लेखक दमामि यांनी शनिवार, 24/10/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा शोधा पाहू नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता कळले मग~ मजला~ की, तो चष्म्या~चा त्रास होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे ती~ साडीचा रंग पाही, चोळी~ मज, जल्लोष होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो घामात जमल्या अत्तराचा तो मुका आक्रोश होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले म्हणता "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 16773
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by दमामि

कौतुकाच्या फुलबाज्या उडायला ही थोडीच दिवाळीची रोषणाई आहे. होळी पेटवल्यावर धुळवडच होणार. अजून नारळ फुटायचाय. थाम्बा जरा.

In reply to by अभ्या..

प्रतिक्रिया कौतुकाच्याच असतात असं कोणी म्हणतय? प्रतिक्रिया विडंबनाबद्दल असाव्यात, अवांतर प्रतिक्रिया म्हणजे धुळवडच अभ्या.

In reply to by तर्राट जोकर

पूर्वी हीथं आयूर्हीत नावाचे वैदू होते. त्यांनी दीलं अस्तं औषध... सद्या विडंबनहव्याससुटकावटी सकाळ दुपार संध्याकाळ एक एक घ्यावी लागेल असे दीसतंय

In reply to by खटपट्या

त्यांची एकच ईच्छा होती, मिपाकरांनी त्यांना व्यनी करावेत. मात्र मिपाकर बाराचे. मिपाकरांनी त्यांच्या अपेक्षेची खिल्ली उडवली. शेवटी गेले बिचारे मिपा सोडून. आता दुसर्‍या नावाने येत असतील तर कल्पना नाही.

च्यायला, त्या प्रेरणेत देखील तेच, आणि इथे खुद्द दंगा कर्त्याच्या घरातही दंगा? ०००चेहो एखादा चांगला शब्द विडंबन काराच्या र्थोर्थोर प्रतिभे विषयी लिहीला तर तुमची बोट झाडातील का? जाऊदे मीच लिहितो! प्रेर्णेचे विडंबन आवडले. मस्तच! अवांतर- " वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता" ---> कानाखाली का?

In reply to by अरुण मनोहर

आपण लिहिलेल्या पेर्णेवर कुणी प्रतिसाद देईना, अगदी विडंबनकर्त्यानेही (हे स्त्रीलिंगी एकवचन किंवा स्त्रीलिंगी अनेकवचनही असू शकते) पेर्णेचा थेट उल्लेख न करुन तिचा दुवा देण्याचे टाळले तेव्हा तुम्हीच इथे तिचा उल्लेख केलात हे आवडले.

In reply to by सतिश गावडे

सगा, दुव्याची लिंक येइना, गेल्यावेळी पण हाच प्रॅाब्लेम झाला होता, पण अरुणजी त्याबद्दल माफी! सासंना अॅडवायला सांगतो.

"म्हणता" "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता.
च्या ऐवजी "ऐकता" "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता. हे कसे वाटते ?

सर्व प्रथम धन्यवाद, मामा, मामी, मामे न करता कविता वाचल्याबद्दल;) "ऐकता" चालेल किंवा "ऐकून" काका जास्त योग्य ठरेल असं वाटतं.

मी कै डबल ब्यारल ब्यान नै केली याची समस्त मंडळींनी नोंद घ्यावी. -दिलीप बिरुटे (डबल बॅरलवाला)

In reply to by दमामि

*तुमच्या या विडंबनाची पहिली ओळ आहे:
पेर्णा शोधा पाहू
आणि आता तुम्हीच संपादकांना तिकडे दुवा द्यायला सांगत आहात. त्याहीपेक्षा मंत्रातंत्रांवर विश्वास नसलेले संपादक तुम्हाला दुवा देतील याबद्दल मी साशंक आहे. *हे आदरार्थी आहे, अनेकवचन नाही. अर्थात अनेकवचनही चालू शकेल. ;)

In reply to by सतिश गावडे

"मंत्रातंत्रांवर विश्वास नसलेले संपादक तुम्हाला दुवा देतील याबद्दल मी साशंक आहे." खिखाखि दुवा माँगी हैं, दवा तो नही?

विडंबन चांगलं जमलंय.आणि जमतंही. कधीतरी एखादा कुमारी लेखही टाका बिनपेर्णेचा. आणि द्या कुणाला चानस छेड काढण्याचा.

खत्री!

१००!