जरा "डोके" चालवा आणि "कोडे" सोडवा. उत्तर मलाही माहित नाही. मीसुद्धा उत्तराच्या शोधात आहे. अर्धा भरलेला "प्याला" आणि त्यासंदर्भातला "आशा"वाद/"निराशा"वाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत.
आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.
त्यानंतर आपण थोडे पुढे जाऊ आणि त्यात चार शक्यता येतात.
(A) समजा एक आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो -
(1) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही.
(2) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.
(B) समजा एक निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो -
(3) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही.
(4) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.
मग A(1) आणि B(4) याना काय म्हणाल? आशावादी कि निराशावादी? आणि का?
| लेख वर्गीकरण |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
A1 म्हणजे क्षूद्र(उदासीन)विचार.
B4 म्हणजे आशावादी विचारांचा कर्तबगार प्राणी.
म्हणतात कि"ठेविले अनंती तैसेची रहावे"हे प्रचंड गैरलागू होणारं वाक्य आहे सध्याच्या काळामध्ये.
A -1 शामच्या आइचा नको इतका
A -1 शामच्या आइचा नको इतका प्रभाव असणारा माणूस. (अप्रत्यक्ष निराशावादी)
B -4 यु कॅन विनचा नको इतका प्रभाव असणारा माणुस. (अवास्तव आशावादी)
A -1 भाहेरच्यांना सुखीप्राणीच भासेल
B -4 अंतर्बाह्य असंतुष्ट भासेल पण शक्य आहे.. ही कूड विन अ लॉटरी.
ही सगळी चर्चा करताना
ही सगळी चर्चा करताना ग्लासातल्या द्रवाच्या चवी बद्दल कोणीच बोलत नाहीत.
नुस्ती चर्चा अर्धा भरलाय की रीकामा आहे यावरच. त्यातून तहान भागणार नाही. फक्त कंठषोश होणार.
आयुष्य चवीनं जगणारे असल्या चर्चेत भाग घेत नाहीत.
आयुष्य चवीनं जगणारे असल्या चर्चेत भाग घेत नाहीत.
In reply to ही सगळी चर्चा करताना by विजुभाऊ
विजुभौ शीं दणकुन सहमत.
अहो, दीरानं घ्या...
In reply to आयुष्य चवीनं जगणारे असल्या चर्चेत भाग घेत नाहीत. by होबासराव
एकदम "दणकून" सहमत झालात तर, प्याला "दाणकन" आपटून फुटेल ना?
हो नं तं!!
धीरानं घ्या!
In reply to अहो, दीरानं घ्या... by निमिष सोनार
दीरानं नाही. चुकून टाईप झालं!
आयुष्य जगा चवीनं ...चर्चेत भाग घ्या आवडीनं!
प्रतिसाद द्या ... मजेनं!
निसो
निसो रॉकस
वाचक शॉक्स !!!!!
जर दारुचा असला तर ?
जर दारुचा असला तर ?
दारू चा ग्लास असला तर ...
ग्लासात अजून काहीतरी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दारूला तूर्तास बाजूला सारू.
आपण दारू ला बाजूला सारू !!
चला कविता करू!!!!
चला कविता करू!!!!
चला कविता करू!!!!
दारूला तूर्तास
बाजूला सारू!
पाण्याची शक्यता
गृहीत धरू!
चर्चेच्या विषयावर
नका हो
पांघरून धरू!
ग्लासाकडे बघण्याचा
दृष्टीकोन महत्वाचा धरू!
फरक पडत नाही
ग्लासात
पाणी असो कि दारू?
तरीही ग्लासातल्या द्रव्याबद्दल
चर्चा होत राहिली
मी तरी काय करू?
निसोभाऊ, यात "पेल्यातलं
निसोभाऊ, यात "पेल्यातलं द्रव्य हवंहवंसं आहे" हे लपलेलं गृहितक आहे. जर पेल्यात कोणतंतरी नकोसं द्रव्य आहे असं मानलं तर ए१ ते बी४ पर्याय तेच राहतील का?
चर्चेचा topic बदलून पेल्यात काय ओळखा असा करू ?
सांगा तसं!
जास्त कश्ट मनाला वा धाग्याला देउ नका.
In reply to चर्चेचा topic बदलून पेल्यात काय ओळखा असा करू ? by निमिष सोनार
निरर्थक चर्चा टाकु नका इतकाच त्याचा मतितार्थ आहे.
अर्धा पेला हे उदाहरण
अर्धा पेला हे उदाहरण भल्याभल्यांना गंडवत आलेलं आहे. अर्धा पेला हे मानवी जीवनाचं प्रतिबिंब आहे. दु:ख आणि सुख अशीच हातात हात घालून असतात. जीवनात, प्रत्यक्ष आयुष्यात कायम एका डोळ्यात हसू दुसर्यात आसू असे असते. त्याकडे पाहण्याचा कुणाचा काय दृष्टिकोन असावा ह्यासाठी कुणीतरी हे अर्धापेला उदाहरण काढले. इथे तो भरावा, रिकामा करावा इत्यादी प्रकार नाहीयेत. फक्त कसे बघावे हाच मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे बाकीचे प्रश्न गेले खड्ड्यात.
उदा.
१. तुमचे शिक्षण झाले पण नोकरी नाही.
२. तुम्हाला नोकरी आहे पण तुमचे लग्न झाले नाही.
३. लग्न झाले पण मूलबाळ नाही.
४. मुलगा आहे पण अपंग आहे.
५. अपंग आहे पण अतिशय हुशार आहे.
ही सगळी पाचही उदाहरणे अर्धापेल्याची आहेत. यातल्या कोणत्याही एका विधानामुळे दुसर्या विधानाच्या अर्धपेला असण्यात फरक पडत नाही. त्यामुळे पेला भरण्याचा वा रिकामा करण्याचा प्रश्न येत नाही. जेव्हा भरायला जाल तेव्हा तो परत अर्धाच होत आहे हे लक्षात येत जाईल. जे सतत भरायला जातात तेही रडतात, रिकामा करायला जातात तेही रडतात. खुश तेच राहतात जे या फंदात पडत नाहीत. तेव्हा साक्षीभाव ठेवून पेल्याच्या अर्धा भरलेला असण्या-नसण्याने मनावर परिणाम करून घेण्यापेक्षा आयुष्य मजेत जगा.
प्रचंड सहमत.
In reply to अर्धा पेला हे उदाहरण by तर्राट जोकर
तर्राट जोकर यांच्या अतिशय समंजस प्रतिसादाशी प्रचंड सहमत.
अर्ध्या पेल्याचे जबरदस्त
In reply to अर्धा पेला हे उदाहरण by तर्राट जोकर
अर्ध्या पेल्याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे
टमरेल गळकं आहे आणि
तुम्हाला बद्धकोष्ठ आहे.
वेळेत उपयोग केला नाही तर पंचाईत
खरेसाहेब, उदाहरण चुकतंय असं
In reply to अर्ध्या पेल्याचे जबरदस्त by सुबोध खरे
खरेसाहेब, उदाहरण चुकतंय असं वाटतंय....
टमरेल गळकं असणं आणि बद्धकोष्ठ असणं यातली नेमकी कुठली गोष्ट चांगली आहे?
+१०००
In reply to अर्धा पेला हे उदाहरण by तर्राट जोकर
वा वा! मस्तच!
सगळी गणेश लेखमाला वायाच गेली
सगळी गणेश लेखमाला वायाच गेली की काय?
मला काथ्याकूट नाही करायचा
मला अभ्या.. व्हायचंय.
घ्या A/B १,२,३,४ वगैरे आकडे टाकून.
कंजूस काका नका बनू अभ्या.
In reply to सगळी गणेश लेखमाला वायाच गेली by कंजूस
कंजूस काका नका बनू अभ्या.
.
आईबापाला तरास पोरगे असे का जगते.
भावाबहिणीला चिंता ह्याचे कसे व्हायचे.
मित्रांना काळजी हा अजून काय करतो की म्हणून.
होणारी बायको तर धसका घेऊनच.
मिपावाल्याना काळजी हा उद्या बॅनर करतो की नाही म्हणून.
बुवांना काळजी अजून कसला फोटो टाकेल म्हणून.
.
एवढे अपेक्षांचे प्याले रिकामे ठेवून आपला पेला भरत बसायला लैच कोडगे मन लागते बहुतेक :(
असो चीअर्स.....
अभ्या..
In reply to कंजूस काका नका बनू अभ्या. by अभ्या..
अभ्या..
लेका आता घेतलाय ना वसा. सोडायचा नाय.
बाकी तू ये तुला फुकट देईन म्हणून 'आपली' कुठंही धंद्याला लावू नकोस.
जे सतत भरायला
.
आवडले आणि पटलेही.
तुमचा प्याला (कुठला ते विचारू
तुमचा प्याला (कुठला ते विचारू नका) रिकामा आहे म्हणून असे काथ्या कुटत आहात. प्याला अर्धा जरी भरला असता तर काही अर्थपुर्ण लिहिले असते तुम्ही. :)
आमच्या पोटापाण्याचा विषय अन
आमच्या पोटापाण्याचा विषय अन आम्हीच बोलणार नाही, असे होईल?
ग्लास अर्धा आहे की पुर्ण हे संध्याकाळी सहा ला बसले की ८ पर्यंत येणाऱ्या उन्मनी अवस्थेत ठरवावे , गिर्हाइके तर ते ठरवू शकत नाहीत मग आम्ही त्यांच्या गाडीच्या किल्या ठेऊन घे किंवा विमान झाले असल्यास ते लँड कर असे प्रयोग करतो
(बाराश्रमाधिपति) नाना स्कॉच (सिंगल मॉल्ट पंथीय)
प्याल्याची क्षमता आणि द्रव्य
प्याल्याचा आकार काय ?
आत काय आहे ?
सर्वसाधारण ग्लास हा ३०० ते ३६० मी लि असतो - म्हणजे हाफ झाली कि ??
किती लोक एकही हल्फ खाली करून ऎक्दम पितात ? सो चीप !!
म्हणून चांगली सिंगल malt जरी नीट घेणार असले तरी ( शॉट ग्लास मासेल तर) ग्लास फार थोडा भरावा लागतो ....
त्यामुळे
A(1) छोट्या ग्लास मध्ये सिंगल maltपतियाला पेग बनवून पीत असावा .किंवा १२० मी लि - तो सर्वांवर खुश आहे .
B(4) ची बैको बघत असेल आए तिने त्याला १ च "ग्लास " प्याची परवानगी दिली असेल . दुसरा नाही . म्हणून तो मोठ्यात मोठा ग्लास बनवायचा प्रयत्न करीन असेल . ( असे माझे झाले होते - बायको घरी ऎकच ग्लास प्याची पेर्मिस्सिओन द्याची तेवा मी अक्खी क्वार्टर ओल्ड मंक ची कोला मिसळून मोठ्या बिअर ग्लास मध्ये प्यायचो )
बाळ निम्मू...
बाळ निम्मू...
झालं - की सांग हं!
वरच्या प्रति सादात माई मोड़
In reply to बाळ निम्मू... by अत्रुप्त आत्मा
वरच्या प्रति सादात माई मोड़ ऑनऑफ़ गृहीत धरावा! ;)
आम्ही तुम्हालाच गृहित धरलय.
In reply to वरच्या प्रति सादात माई मोड़ by अत्रुप्त आत्मा
आम्ही तुम्हालाच गृहित धरलय. लिव्हा काय बी. ;)
मग आपण धुवायला बोलवू
In reply to बाळ निम्मू... by अत्रुप्त आत्मा
मग आपण धुवायला बोलवू कोणालातरी =))
बाळ निम्मू...
In reply to बाळ निम्मू... by अत्रुप्त आत्मा
बाळ निम्मू...
झालं - की सांग हं!
:) :)