Skip to main content

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 15/10/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील. तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या. या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 48888
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by फोटोग्राफर243

आवड्यास.

In reply to by जागु

हो एका स्पर्धकाने एकच फोटो द्यायचा आहे. ज्यांनी एकापेक्षा जास्त फोटो दिले आहेत, त्यांनी कुठला स्पर्धेसाठी आहे ते सांगितले आहे.

Rhine - Dusseldorf

वरिल फोटो - र्‍हाइन नदीचा आहे, स्पर्धेसाठी नाही. खालचा फोटो स्नोडोनिया पर्वतावरचं एक तळं -मार्च २०१३ snowdon

1)(स्पर्धेसाठी नाही)1 2)2 3)3 सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.

In reply to by सोंड्या

तुम्ही फोटोजचे दुवे वापरण्याऐवजी फ्लिकरवर ते डिस्प्ले झाल्यावर त्या वेबपेजचे दुवे वापरले आहेत. दुवे खालीलप्रमाणे असायला हवेत बाकी धाग्यात लिहिल्या प्रमाणे रुंदी कमाल ६४० ठेवायला हवी होती. पहिल्या चित्रासाठी ती १२३२ आहे. रुंदी दिल्यावर उंची देण्याची गरज नसते मूळ चित्रातल्या लांबी रुंदीच्या गुणोत्तरानुसार ब्राउझर उंची स्वतः सेट करते. अन आपण उंची चे मूल्य लिहिल्यास रुंदी ब्राउझरद्वारे सेट केली जाते. संपादकांना विनंती आहे की वरच्या प्रतिसादातले दुवे व रुंदीचे मूल्य दुरुस्त केले जावे. अवांतर - चित्र मोठा आकारमानात दाखवायचे असल्यास चित्रावर त्याचाच दुवा देऊन तो नव्या टॅबमध्ये उघडण्याची व्यवस्था करता येते.

१) 1 सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.

१)(स्पर्धेसाठी नाही) 1 २)2) ३)3 सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.

जेव्हा मोठं धरण बांधलं जातं, तेव्हा साहजिकच वरचा भाग आणि खालचा भाग असे पाण्याच्या पातळीनुसार दोन भाग अलग होतात. वरुन खाली रस्त्याने उतरणे सोपे असते. पण ज्या नदीवर प्रचंड धरण बांधायचे ती नदी जलवाहतूकीसाठी वापरली असेल तर? रस्त्याला घाट बांधुन उतार नियंत्रित करता येतो पण पाण्याच्या पातळीत ४०-५० फूट फरक असेल तर? मग नाईल नदीवर धरण बांधताना एस्ना येथे वरच्या पातळीवर पाणी अडवुन एक कृत्रिम असा अवाढव्य जलाशय बांधला गेला व त्या जलाशयाचे पाणी एक निरुंद गोदी बांधुन आड्वले गेले. गोदीत जहाज आले की फाटक बंद करुन गोदित जहाज स्थिर करुन धक्क्याला बांधायचे. जहाज स्थिर व अचल झाल्यावर जहाजाच्या शेपटाकड्चे गोदीचे फाट्क बंद करायचे म्हणजे जलाशयातुन गोदीत येणारे पाणी थांबते. मग पुढचे फाटक उघडायचे म्हणजे वरच्या पातळीचे पाणी साहजिकच वेगाने पुढे कमी पातळीकडे वाहू लागते व जहाज बंदिस्त गोदीत अलगद जागच्या जागी खाली उतरते. गोदीत भरलेले सगळे पाणी उतरले म्हणजे जहाज आता खालच्या पातळीवर आले. जहाज पुढे निघुन जाताच पुन्हा हा दरवाजा बंद करण्यात येतो आणि अलिकडचा दरवाजा उघडला जातो ज्यायोगे गोदीत पुन्हा वरच्या पातळीसमान पाणी भरेल व पुढचे जहाज तिथे घेता येईल. याला एस्ना जलबंध (वॉटर लॉक) असे नाव आहे, हे ठिकाण नाईल किनारी आस्वान ते लक्झर दरम्यान आहे. गोदी यायच्या अलिकडे प्रचंड जलाशय पार करताना बंधार्‍यावर दोन विषम पातळीवरचे आगगाडीचे डबे सूचक म्हणुन ठेवले आहेत, जे सर्व पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतात. esna कॅमेरा निकॉन डी ६०/ निकॉर १८-५५ एफ ७.१/ एक्स्पोजर १/२००, आयेसओ १०० फोकल लेंग्थ १८ एमेम

स्पर्धेसाठी खूप छान फोटो आलेले आहेत, मी फक्त काही जलाशयांचे फोटो इथे चिटकवतो (स्पर्धेकरिता नाही) १. गोठलेला Eiisee Lake (जर्मनी) - जर्मनीच्या सगळ्यात उंच पर्वत शिखराच्या पायथ्याशी हा तलाव आहे. eibsee २. जर्मनीच्या एका उद्यानामध्ये काढलेला फोटो park ३. कास तलाव kaas

स्पर्धेसाठी a रत्नागिरी - आडिवरे मार्ग...कशेळी बांध (कनकादित्य मंदीर) . . . . स्पर्धेसाठी नाही... १. b गावखडी... २. c

सगळ्यांचे फोटो एक सो एक आहेत.

(माझ्या दुर्दैवाने) हे फोटो स्पर्धेसाठी नाहीत! कारण हे नदीपात्रातील जलाशयाचे फोटो आहेत! केवळ जलाशयाशी संबंधीत असल्याने इथे पाहण्यासाठी देत आहे. 2 3 4 5 5 1 हे सर्व फोटो मोटो-जी(पहिला) या मोबाईलने काढलेले आहेत! ठिकाण: दांडेली, कर्नाटक फुडल्या स्पर्धेसाठी सरसावून बसलेला :) Sandy

पाबेघाट ओलांडल्यावर पुढे केळदच्या दिशेने जाताना मध्येच कुठेतरी हा जलाशय आहे. नक्की स्थान सांगता नाही येणार. (Latitude - 18.299167° N , Longitude - 73.630556° E) Madheghat

In reply to by विशाल कुलकर्णी

सुंदर फोटो. चित्रे टाकण्याच्या डायलॉग बॉक्समध्ये "लँडस्केपसाठी फक्त लांबी" आणि "पोर्ट्रेट्साठी फक्त रूंदी" चे आकडे टाका. मिपा योग्य ते इतर आकडे वापरून चित्र मूळ आकाराच्या प्रमाणात ठेवेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद डॉक्टरसाहेब. तेच केले होते, पण आधी मोजमापाचा अंदाज चुकला होता. संपादक मंडळाचेही आभार _/\_

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"लँडस्केपसाठी फक्त लांबी" आणि "पोर्ट्रेट्साठी फक्त रूंदी" चे आकडे टाका अरे हो, हे लक्षातच आले नाही. यापुढे लक्षात ठेवेन. धन्यवाद.

'गुगल फोटो' वरुन देत असलेल्या लिंक्स गंडताहेत.. कुणी मदत करु शकेल का?

In reply to by चिगो

क्रोम ब्राउझर वापरत असाल तर गुगल फोटोजमधल्या इमेजवर राइट क्लिक करून Copy image URL पर्याय निवडावा. असे करून जो दुवा मिळेल तो मिपावर फोटो प्रकाशित करण्यास वापरावा.

In reply to by श्रीरंग_जोशी

धन्यवाद.. खाली फोटो दिले आहेत, पण ते प्रमाणाबाहेर पसरले आहेत.. कृपया मदत करावी, ही विनंती..

a b उमियाम लेक, बडापानी, मेघालय.. c d मेघालयातील असेच एक तळे.. स्पर्धेत आलेल्या इतर छायाचित्रांच्या तुलतेन ह्यातील एकही लायक न वाटल्याने, स्पर्धेसाठी नाही..

In reply to by चिगो

क्र. ३ चा फोटो स्पर्धेसाठी योग्य वाटत आहे. 'स्पर्धेसाठी नाही' या गोष्टीचा पुनर्विचार करावा.