माझा गांव,
अता गांव नाही राहिला.
नदीचा ओढा अन ओढ्याचा नाला
झालाय.
तुंबलाय, बरबटलाय, आणि सडलाय पण.
पुर्वी दाट वडांच्या सावलीत गार निजायचा
आज रखरखत्या इमारतींत तगमगतोय.
सुटू शकत नाही.
निसटु ही शकत नाही.
नाही, तसा प्रयत्नच होत नाही.
रानं काळवंडलित
पूर्वी ती फुलायची
अता त्यांचे लिलाव होतायत.
आजु-बाजुने, आडवा-तिडवा
नुसता फुगत चाललाय.
डाम्बरी नांग्या फुटताय त्याला
इखान् डबडबलेल्या.
भुलवतोय मला, तेवढेच आतून छळतोय मला
माझा गांवअता माझा राहिला नाही.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2106
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच! आवडली!
धन्यवाद.
हम्म
धन्य झालो
In reply to हम्म by चाणक्य
चाणक्य
धन्य झालो
भयंकर म्हणजे भयंकर म्हणजे
भयंकर धन्य झालो
In reply to भयंकर म्हणजे भयंकर म्हणजे by भैड्या