पटली तर पळवा

पाटीलअमित's picture
पाटीलअमित in जे न देखे रवी...
17 Oct 2015 - 7:51 pm

पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.com/2015/10/blog-post_17.html

मूळ कविता
http://www.misalpav.com/node/३३१७६

लोकसंखेच्या प्रमाणात जास्त वाढले नर
मुलगी मागताच मुलीचा बाप विचारतो घर

जबरदस्तीने हाकलतो काय ,बाप कधी संग
मारतो आपल्या पायावरती ,कुर्हाड नीट धर

यंदा लग्न करू नको,फुकट कांदा पोहे खा
गोरी किवा काळी ,पटव आणि पळवून कर

चढाच बोहल्यावर निग्रहाने ,बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर

मांडवातले मान पान ,कुठे कोण वर्ज्य
लग्न करूनच मर पण जिवंत पाणी मर

किती झगडणार बायकोशी ,बस इतके ठराव
रोज वाढणाऱ्या दादागिरीस , ’अभय’ असेल तर

अमित पाटील ( aaj ka kishan )

अनर्थशास्त्रविडंबन

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

17 Oct 2015 - 7:53 pm | मांत्रिक

हाण तिच्या मायला रे वाघा!!! जबरीच!!!

टवाळ कार्टा's picture

17 Oct 2015 - 9:00 pm | टवाळ कार्टा

खि खि खि....जब्रा....अस्ल कैतरी लिहित जा की....कितीवेळ लाल रंगाचा डब्बा घेउन बस्णार

अस्वस्थामा's picture

17 Oct 2015 - 9:20 pm | अस्वस्थामा

त्यांस मिपाचे वारे लागलेले आहे बरीक. तांब्याधिपतींना उत्तराधिकार्‍यांची चिंताच नै.. ;)

पाटीलअमित's picture

18 Oct 2015 - 11:50 am | पाटीलअमित

धन्यवाद

समाजातल्या एका गंभीर समस्येवर कवीने अचूकपणे बोट ठेवलं आहे.

एक एकटा एकटाच's picture

18 Oct 2015 - 9:26 am | एक एकटा एकटाच

हा हा हा

अगदी मार्मीक

अजया's picture

18 Oct 2015 - 12:21 pm | अजया

आज का किशन=)))
मिपाचे ठ्ठो कुमार तुम्हीच होणार =))
मुविंच्या हजारी धाग्याला हा उतारा!