असंच काहीतरी
लिहावंसं वाटतं; कधीकधी उगाचच वाटतं.
काय लिहायचं ते नंतर ठरतं.
शिवशिव करतात हात, धडधडते छाती
होईल का नीट सुरुवात, की होईल साऱ्याची माती
लिहीलंय सगळ्यांनी खूप, कशाला हवी आणखी भर
आहे तेच झालंय फार, कशाला हवी पसाऱ्यात भर
शब्द झालेत द्वाड खूप, शब्दांना लागतंय वाटीभर तूप
म्हणतात येऊ बाहेर आम्ही, स्मराल जेव्हा सार्थ रुप
कुठली आम्हां सवड तेवढी, कशाला लागतोय एवढा वेळ
भरभर ठोकू खिळे 'रफट'चे, अहो सगळा तर आहे सोपा खेळ
खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव
उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव
उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही
वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुक्तक आवडले. _/\_
सुरेख !
कय लिवलंय!कय लिवलंय!कय लिवलंय
मस्त हो....
इथे हे मुक्तक लिहिणारेही
शत प्रतिशत सहमती.
मस्त लिहिलेय!
वाचकांचे आणि प्रतिसादकांचे
मस्तं लिहिलंय. आवडलं.
खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ
खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ
आवडले
असो! आभार.
और ये लगा सिक्सर !!
प्यारेच्या लेखणीत शिसं आढळलं
वाह...
छानच लिहिलंय प्यारेकाका.
आवडलं. पटलंही.
बोळा निघाला आणि पाणी वहाते झाले,
ऑयिंग?
छान मुक्तक !