✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

असंच काहीतरी

प
प्यारे१ यांनी
गुरुवार, 10/15/2015 - 03:11  ·  लेख
लेख
लिहावंसं वाटतं; कधीकधी उगाचच वाटतं. काय लिहायचं ते नंतर ठरतं. शिवशिव करतात हात, धडधडते छाती होईल का नीट सुरुवात, की होईल साऱ्याची माती लिहीलंय सगळ्यांनी खूप, कशाला हवी आणखी भर आहे तेच झालंय फार, कशाला हवी पसाऱ्यात भर शब्द झालेत द्वाड खूप, शब्दांना लागतंय वाटीभर तूप म्हणतात येऊ बाहेर आम्ही, स्मराल जेव्हा सार्थ रुप कुठली आम्हां सवड तेवढी, कशाला लागतोय एवढा वेळ भरभर ठोकू खिळे 'रफट'चे, अहो सगळा तर आहे सोपा खेळ खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
3927 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

मुक्तक आवडले. _/\_

रातराणी
गुरुवार, 10/15/2015 - 05:09 नवीन
मुक्तक आवडले. _/\_
  • Log in or register to post comments

सुरेख !

सस्नेह
गुरुवार, 10/15/2015 - 06:23 नवीन
भा पो आणि सहमत !
  • Log in or register to post comments

कय लिवलंय!कय लिवलंय!कय लिवलंय

कंजूस
गुरुवार, 10/15/2015 - 06:29 नवीन
कय लिवलंय!कय लिवलंय!कय लिवलंय!
  • Log in or register to post comments

मस्त हो....

मुक्त विहारि
गुरुवार, 10/15/2015 - 07:44 नवीन
"उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव." ह्याला प्रचंड सहमत. पण काही जण फूल्ल बॉटल लेमन वॉटर पिवून हितोपदेश करणारे वाद घालायलाच येत असतात.
  • Log in or register to post comments

इथे हे मुक्तक लिहिणारेही

सालस
गुरुवार, 10/15/2015 - 10:58 नवीन
इथे हे मुक्तक लिहिणारेही काड्या सारताना दिसतात की.संभावित मुक्तक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शत प्रतिशत सहमती.

प्यारे१
गुरुवार, 10/15/2015 - 11:10 नवीन
शत प्रतिशत सहमती. मात्र आम्ही मूळ आयडीनावानंच जे काय करायचं ते करतो. उगाच 'सालसपणा' करीत नाही. ;) मध्ये काही दिवस नाव बदललं होतं तेव्हा सांगून बदललं होतं आणि आयडी क्रमांक तोच होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालस

मस्त लिहिलेय!

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 07:56 नवीन
मस्त लिहिलेय!
  • Log in or register to post comments

वाचकांचे आणि प्रतिसादकांचे

प्यारे१
गुरुवार, 10/15/2015 - 10:22 नवीन
वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!
  • Log in or register to post comments

मस्तं लिहिलंय. आवडलं.

पद्मावति
गुरुवार, 10/15/2015 - 11:01 नवीन
मस्तं लिहिलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments

खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 11:14 नवीन
खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव सुंदर!!!
  • Log in or register to post comments

खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 11:15 नवीन
खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव
सुंदर लिहिलंय!
  • Log in or register to post comments

आवडले

पैसा
गुरुवार, 10/15/2015 - 13:50 नवीन
लिखाण आवडले. यामागची भावना सच्ची असेल असे समजून प्रतिक्रिया देत आहे.
  • Log in or register to post comments

असो! आभार.

प्यारे१
गुरुवार, 10/15/2015 - 13:52 नवीन
असो! आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

और ये लगा सिक्सर !!

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 10/15/2015 - 19:43 नवीन
अनबाँडेड लेडवाली प्यारेबुवा की कभी कभी चलनेवाली भार्री पेन्सिल !!
  • Log in or register to post comments

प्यारेच्या लेखणीत शिसं आढळलं

द-बाहुबली
Sat, 10/17/2015 - 12:46 नवीन
प्यारेच्या लेखणीत शिसं आढळलं ? ब्यान करा. सर्व स्तॉक जप्त करा. दिवाळी अंक होस्तवर सोडु नका ;)
खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव .......................... उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव
बरेच दिवसांनी एकदम म्हातारं झाल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

वाह...

मदनबाण
गुरुवार, 10/15/2015 - 19:46 नवीन
वाह... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla
  • Log in or register to post comments

छानच लिहिलंय प्यारेकाका.

प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 21:16 नवीन
छानच लिहिलंय प्यारेकाका.
  • Log in or register to post comments

आवडलं. पटलंही.

दीपा माने
Sat, 10/17/2015 - 07:53 नवीन
आवडलं. पटलंही.
  • Log in or register to post comments

बोळा निघाला आणि पाणी वहाते झाले,

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 10/17/2015 - 09:46 नवीन
बोळा निघाला आणि पाणी वहाते झाले, मन मोकळे झाले, आणि गुरुजी लिहिते झाले. परत एकदा पॅड बांधुन बॅटिंग करायला सिध्द झाले एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या विषयांवरचे वाचनिय धागे? एवढे दिवस हात बुडाखाली दाबुन का बसला होतात हो मग? ह्ट्ट केल्या सारखे? चला आता उचला लेखणी आणि होउन जाउदे येळाकोट येळकोट जय मल्हार. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

ऑयिंग?

प्यारे१
Sat, 10/17/2015 - 12:39 नवीन
ऑयिंग? असं काही झालेलं नाही. आमचे बोळे आम्ही कधीच तुंबवत नसतो. बाकी केम छे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

छान मुक्तक !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/17/2015 - 12:50 नवीन
छान मुक्तक ! बर्‍याच दिवसांनी फक्त प्रतिसाद-प्रतिसाद खेळायचं सोडून लेख लिहायला सुरुवात केली हे फार चांगले झाले. सुस्वागतम आणि लिहीत रहा !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा