Skip to main content

एक वर्षानंतर . . .

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 25/05/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

वाचने 311863
प्रतिक्रिया 1265

प्रतिक्रिया

In reply to by चिनार

असे झाले नाही मंग ते!! तुम्ही मोर्शी मोर्शी चिल्लाऊ रायलते अन म्या धारनी ची गाडी समजलो!! माफ़ करा दादा आमाले बी गलती झाली उलिशिक

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिकन , मासे , बक्री स्वस्त आहे तोवर खाउन घ्या. आता मोदींच्या राज्यात पूर्ण भारतभर बीफबंदी झाली की सगळेच लोक चिकन मासे बक्रीच्या मागे लागतील. तेंव्हा मांसाहारासाठी मोदी कर्ज योजना आणणार आहेत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिकन , मासे , बक्री स्वस्त आहे तोवर खाउन घ्या. आता मोदींच्या राज्यात पूर्ण भारतभर बीफबंदी झाली की सगळेच लोक चिकन मासे बक्रीच्या मागे लागतील. तेंव्हा मांसाहारासाठी मोदी कर्ज योजना आणणार आहेत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

भौ, भारत लै पुढं जौन र्‍हायला ना, आन तुमाले काय ते डाळी-डुळी ची फिकर पडून र्‍हायली :) तुम्ही ईकासाचे ईरोधक हौ का? :)

In reply to by कपिलमुनी

डाळी खूप महाग झाल्या आहेत हे खरे आहे. परंतु त्यामागे निसर्गनिर्मित कारण आहे. यावर्षी खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन खूप कमी होणार आहे. पिण्याच्या पाण्याचीच टंचाई झाली आहे, त्यामुळे शेतीला फारसे पाणी देता येणारच नाही. त्यामुळे भाववाढ अटळ आहे. पण त्यावर नक्की काय उपाय आहे? परदेशातून डाळी आयात करणे हा सध्या तरी एकच उपाय दिसतो. आयात सुरू झाली आहे अशा बातम्या येत आहेत. त्याचा भावावर किती परीणाम होतो ते काही दिवसात कळेलच.

In reply to by श्रीगुरुजी

मोदी सरकारला परदेशातून डाळ आयात करता येते तर पाउस पण आयात करायचा ना …. वीस - पंचवीस विमानांनी युरोपावर जोरजोरात घिरट्या घालून तिकडचा पाउस इकडे वळवणे सहज शक्य होते :-) :-) .... राजकीय इच्छाशक्ती हवी हो…. बाकी काही नाही.. हेच का ते अच्छे दिन ???

In reply to by dadadarekar

दादा तुमचं बरोबर आहे…. राहुल गांधींना पंतप्रधान केलं असतं तर बदाबदा पाऊस पडला असता बघा…. ही तुरडाळ पिकली असती टम्म फुगलेली!!!

In reply to by श्रीगुरुजी

निसर्गनिर्मित कारण:- ह्यावर आपले काय वाचन आहे अन तर्क आहे ते जरा सांगाल का हु गुरूजी? कारण मी हे चक्र निसर्गनिर्मित नाही हे सिद्ध करू शकतो, १२-१२ एकर तुर पेरणी ते समिति सांभाळली आहे मी वय वर्षे १४-२४ दर वर्षी, इन एंड आउट बघितला आहे तो धंदा. तरीही आपला आदर म्हणुन प्रथम मान आपला :) (माजी जय किसान) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पाऊस कमी पडणे हे कारण निसर्गनिर्मित नसेल तर मग तुम्ही सांगा काय कारण आहे ते? हे सुद्धा वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pulses-crisis-in-india/ar…

महागाईविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीचे आंदोलन डाळी, कांदे इत्यादींच्या भडकणाऱ्या भाववाढीविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने आंदोलन छेडले आहे. खालील पत्रक काळजीपूर्वक वाचा, आणि ते मुख्यमंत्री, अन्नमंत्री आणि मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना ई-मेलद्वारे पाठवा. या मेलची एक प्रत पंचायतीला पाठवा. या सर्वांचे इ-मेल सदर पत्रकात आहेत. आंदोलन - ANDOLAN तुम्ही पुढील ‘लिंक’ कॉपी करून ई-मेलमध्ये थेट पेस्ट करून राज्य सरकारला मेल पाठवू शकता. http://mumbaigrahakpanchayat.org/Uploads/ANDOLAN.pdf

महागाई वाढली आहे , कारणे निसर्गनिर्मित असतीलही ! मला गुरुजींकडून भाजपा सरकारने 'आजवर' केलेल्या उपायांच्या माहितीची अपेक्षा होती. बाकी ५ जुलै २०१० ला याच निसर्गनिर्मित महागाई विरुद्ध भाजपाने देशव्यापी बंद केला होता.

In reply to by कपिलमुनी

अहो पण डाळ तूटवडा हा निसर्गनिर्मित नाहीचे न कपिलमुनी! मी त्येच म्हणतो आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मला पटतय ओ ! पण ....... आले त्यांच्या मना , तेथे कोणाचे चालेना

अबकी बार, अबकी बार म्हणत लेडीज बार सुरु केला ना भाऊ... अबकी बार मधला बार हा होता हे आता समजल.....

In reply to by dadadarekar

लेडीज बार सुरू करायला राज्य / केंद्र सरकारने परवानगी दिली नसून सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. ढकलपत्र समजून ढकलत चला !

In reply to by कपिलमुनी

काय राव कपिलमुनी…यु पी ए च्या काळात सर्वोच्च न्यायालय म्हणजे १० जनपथ !! त्यामुळे दादांचं नेहेमीप्रमाणे बरोबरच आहे

In reply to by dadadarekar

तुमच्या युक्तिवादातुन हे तर सिद्ध झाले की युपीयु२ च्या काळातले सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अकार्यक्षम सरकारच्या नाकर्तेपणामुळे न केलेल्या युक्तिवदामुळे झाले.

नाम फाउंडेशनला मुख्यमंत्रीनिधीपेक्षा जास्त देणगी मिळाली म्हणे... किती हा लोकांचा विकासाभिमुख सरकारवरचा विश्वास! तो काळा पैसा तर सोडाच गेल्या वर्षभरात सरकारवरचा विश्वासही परत आणू न शकलेल्या भाजपाकडे काय उत्तर आहे आता?

प्रथम जिथुन विषयाला तोंड लागले तो मुद्दा घेतोय, कपिलमुनी ह्यांनी डकवलेला फोटो,डाळ, तिचे गेल्यावर्षीचे भाव, ह्यावर्षी दिनांक ऑक्टोबर 07 अन दिनांक ऑक्टोबर 14 (एक आठवड्याचा काळ) असे एकंदरित त्या इन्फ़ोग्राफ़िक चित्राचे स्वरुप आहे.
(चित्र इथे दिसत नसल्यास आपणांस वरती स्क्रोल करुन पहावे लागेल , त्या तसदी बद्दल आगाऊ क्षमस्व)
जर "हे निसर्गनिर्मित नाही तर कसे?" हा प्रश्न विचारात घेतला तर मला पुढील काही उपप्रश्न पडले आहेत एकट्या तुरीचा भाव एका आठवड्यात इतका चढ़ा कसा झाला? कारण ऐकवेळ तुरीचे 2014 मधले भाव जरी सोडले (65 रु किलो) सोडल्यास दिनांक 07 ऑक्टोबर 2015 ला किंमत होती 115-155 ₹/किलो ह्यातले ह्यातली उच्च बजुकडली किंमत पकड़ता 155₹/किलो ते 210₹/किलो अर्थात 55 रुपयांची वाढ ही एका आठवड्यात झाली आहे, उडीद डाळ ह्याच प्रकारे एका आठवड्यात 25 रूपये वाढली आहे, मुग 2 रुपये वाढली आहे मसूर 3 रुपये अन चणा डाळ 3 रुपये कमी झाली आहे, मग नक्की काय झोल आहे? तुर अन उडीद डाळी ला एकदम एका आठड्यात एका वर्षाच्या बरोबरी ची भाववाढ का झाली? अन चण्याची कमी का झाली? दुष्काळ सुद्धा सेलेक्टिव होता असे म्हणता की काय आता? का एक आठवड्या पासुन जनता तुर सप्ताह साजरा करते आहे ?(ह्या आठवड्यात इंधन दरवाढ झालेली ही दिसत नाहीये) तो भाई मामला क्या है? हे साठेबाजी वाढीला लागल्याचे इंडिकेटर नाहीये का? दूसरे, ठीक एकवेळ कोणी म्हणेल की तुर अन उडीद ह्यांचा खप सर्वाधिक असतो अन दुष्काळ ही आहे (जे अगदी बरोबर आहेच म्हणा) म्हणून एका आठवड्यात जीएसएलव्ही मधे बसली आहे तुर तर मी थोडक्यात "तुर : पेरा ते डाळ" मांडायचा प्रयत्न करतो प्रथम तुर पिक (विषयाला धरून जितके आहे तितकेच मांडतोय आत्ता) -पिक म्हणुन जबरदस्त दुष्काळ रेसिस्टेंट पीक -झाडांची मुळे "टॅप रुट सिस्टम" ची म्हणजे वाढ होताना विशिष्ठ काळ सोडता (40-45 दिवस) पोषण हिवाळ्यातले दव पडले तरी अन मातीच्या ओली वर सुद्धा भागते (अर्थात ऊँटा सारखी असते ही वनस्पती पहिले 45 दिवस दाब्बुन पाणी पिते), ह्या वनस्पती मधे सुद्धा आता बारीक दांडी चे "एचपीए 90" नामक वाण आले आहे जे ओलीत ला सूटेबल आहे (खुरटे असते झाड़ अन दाणा टापोर असतो पण एकंदरित लाग कमी) -कोरडवाहु साठी परंपरागत लांब पिक चक्र असलेली वाणेच बरी पडतात कारण ती अवर्षण परिस्थिती मधे टिकून राहतात, मिश्र पिक म्हणून लावली तरी उत्तम लाग देतात अन प्रचण्ड वाढतात जेणे करून मिश्रपद्धतीत अंतरपिकांस छाया अन ओल दोन्ही मिळते -ह्या परंपरागत तुरीचे झाड़ पुर्ण वाढल्या नंतर तोडायला कुर्हाड़ लागते इतपत त्याचा बूंधा होतो आमच्या विदर्भात,अन असे हे पिक मिश्र पद्धतीत असल्या कारणे मधल्या ओळीत 3 3 महिन्याची 3 पिके सहज निघतात -विदर्भात बहुसंख्य पेरा हा कोरडवाहु चा असतो कारण सिंचन शष्प नाही, हे पिक 270 दिवसांचे वगैरे असते म्हणजे पुर्ण वाढचक्र तश्या शेंगा 190 दिवसा नंतर सुरु होतात, साधारण 45 ते 90 मधे फुले धरणे वगैरे (पॉइंट टु बी नोटेड मी लॉर्ड) -आता 2013 चे पर्जन्यमान पाहता ते "नॉर्मल टु एक्सेसिव" गटात होते, म्हणजे 2013 च्या जून मधे खरिपात जी तुर पेरली होती तिला 45 दिवस (वाढीचे) जे अगदी स्लो असतात तेव्हा पुरेसे मुबलक पाणी मिळाले होते -190 दिवसा नंतर शेंगा म्हणजे सरासरी जानेवारी 2014 चा पहिला आठवडा ह्या काळात शेंग फुटवे फुटायला सुरुवात झाली होती, दाणे भरणे अंदाजे मार्च मिड पर्यंत नंतर मे पहिला आठवडा मधे शेंग काळी पडणे अन कापणी असे एकंदरित क्रॉप टेन्योर असते, -(आता आपण वळु डाळ उद्योगाकडे) तर अशी ही तुर आपण 10 मे 2014 च्या दरम्यान सोंगली (तोड़नी केली) तरीही तुरीचे पिक हे काही लगेच सोंगली-थ्रेशर मधे घातली-मिल ला पाठवली अन डाळ केली इतकी सोपी नसते तर लगेच जमीन पुढल्या पिकासाठी तयार करावी लागते (मशागत करणे जुनी तुर उपटणे इत्यादी) त्याच दरम्यान वळीव पाऊस कचरा करू शकतो म्हणून सेफ साइड ही तुर गोठ्यात शेड मधे वगैरे दाबून ठेवली जाते, तुर थेट मिल ला न धाडने अन दाबून ठेवणे ह्याचे एक अजून फायदेशीर कारण म्हणजे "क्युरिंग" करणे डाळीचे , तुर ही नीट वाळवली नाही तर डाळ काढ़ताना खुप नुकसान होते (छिलका नीट न उतरणे ते गर भागाचा घसारा वाढने पर्यायाने डाळ लो क्वालिटी होणे अन नफा कमी होणे) तस्मात् नवी पेरणे होईपर्यंत अन पावसाळा सरे पर्यंत तुर दाबणे अन नंतर ऑक्टोबर हीट मधे ती कड़कड़ीत वाळवली की भाव वाढीव मिळतो, अश्याप्रकारे 2015 मधे आपण जो डाळ साठा खातो आहोत तो 2013 च्या पेर्याचा आहे. -आता खरी ज्ञानबाची मेख पॉइंट, एक एक वर्षाची गॅप म्हणजे 2014 चा डाळ साठा 2016 मधे मार्केट ला येणार असता नॉर्मली, पण आता 2014 पासुन पाण्याने हात दिलाय एकंदरित तस्मात् तुरीच्या "फ्यूचर्स" ला तेजी आली कारण 2016 मधे तुटवड़ा असणार हे 2014 च्या पर्जन्यमानाने जवळपास फिक्स केले आहे, ही साठेबाजी नुसती डाळ नाही तर कच्ची तुर ह्याची ही सुरु आहे, अन आत्तापासुन भाव वाढायचे कारण ही तेच आहे, कारण 2016 मधला दाम दुप्पट नफ़ा खुणावतो आहे, नसता एका आठवड्यात किंमत 55-60 रु कसे उडी मारली असेल विचार करा आता स्वतःच! थोडक्यात एक वर्ष साइकिल लैप्स झाल्याने ह्यावर्षी चे भाव वाढणार नाहीत तर पुढल्या वर्षीच्या लोभात वाढणार आहेत. आता सांगा ह्यावर्षी चा भाव निसर्गनियांत्रित कसा (तरीही मी ह्यात दलाल अड़ते ह्यांची हरामखोरी , भारतातल्या सर्वात मोठ्या तुर मार्केट (अकोला-अमरावती-यवतमाळ) मधल्या मारवाड़ीलोकांची बीजेपी मधली उठबस वगैरे राजकीय अन सेंसिटिव विषय टाळतोच आहे)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुमच्या वरील वेळापत्रकाप्रमाणे २०१६ मध्ये तुरीचा तुटवडा असणार आहे. त्यामुळे आतापासूनच पुरवठा कमी झालेला आहे. मागणी आणि पुरवठा यावर भाव ठरतो. मागणी अजिबात कमी झालेली नाही. परंतु पुढील वर्षी पुरवठा कमी असणार आहे हे ओळखूनच आतापासूनच तूर साठवायला लागल्यामुळे पुरवठा कमी झालेला आहे. एखादी वस्तू पुढील काही काळ मिळणार नाही हे समजल्यावर घरात सुद्धा आपण त्या वस्तूचा साठा करून ठेवतो. इथेही तेच होत आहे. पूर्वी जेव्हा साखरेचे रेशनिंग होते तेव्हा ज्यांच्या घरात लग्नकार्य वगैरे असायचे ते नागरिक मिळेल तिथून साखर आणून घरी साठवून ठेवायचे. आता पुरवठा मुबलक असल्याने साखरेचा साठा घरी करायची गरज नाही. पावसाने ओढ दिल्याने तुरीचे उत्पादन कमी होणार पण मागणी तेवढीच राहणार. त्यामुळे भाव वाढणारच. अर्थात त्यामागे नफेखोरी हाही भाग असणारच. पाऊस नेहमीसारखाच पडला असता तर भाव वाढण्याचे कारणच नव्हते. त्यामुळे हे निसर्गनिर्मितच कारण आहे.

In reply to by श्रीगुरुजी

२०१६ मधे म्हणा की नैसर्गिक कारण नाही कोण म्हणतो बुआ? आजच्या संदर्भात तुमची जी वाक्य पाहिल्या परिच्छेदा च्या शेवटी शेवटी आहेत ती पाहता तुम्ही "आत्ता साठेबाजी होते आहे" हे मानता आहात काय? (नसेल वाटत तसे तर हट्टाग्रह अट्टहास वगैरे नाही फ़क्त नंतर तोंडी वाक्य घातले असे नको म्हणुन स्पष्ट तोंडावर विचारतो आहे)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुटवडा होणार हे नक्की आहे. त्यामुळे साठेबाजी होणारच. आणि चतुर व्यापारी याचा फायदा उठविणारच. मुंबईत टॅक्सी किंवा बेस्टचा संप होतो तेव्हा रिक्षावाले अवाच्या सवा भाडे उकळतात. कारण तेच. पुरवठा कमी. इथेही कमी पुरवठ्याचेच कारण आहे, पण कमी पुरवठ्यामागे नैसर्गिक कारण आहे.

In reply to by श्रीगुरुजी

परत तेच! अहो तुम्ही २०१६ बद्दल बोलत असाल तर मान्य आहेच की पण सद्धयाची भाववाढ ही नैसर्गिक लारणास्तव नाही शुद्ध नफेखोरी मधुन आलेली आहे असे मी म्हणतो आहे! आता २०१५ किंवा साध्यस्थिति अन २०१६ ह्याच्यातले नेमके काय समजले नाही आपणांस?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

परत तेच! अहो तुम्ही २०१६ बद्दल बोलत असाल तर मान्य आहेच की पण सद्धयाची भाववाढ ही नैसर्गिक लारणास्तव नाही शुद्ध नफेखोरी मधुन आलेली आहे असे मी म्हणतो आहे! आता २०१५ किंवा साध्यस्थिति अन २०१६ ह्याच्यातले नेमके काय समजले नाही आपणांस?
भारतात तूरडाळीची वार्षिक मागणी अंदाजे २ कोटी ३० लाख टनांच्या आसपास आहे. भारतात २०१४ मध्ये तूर डाळीचे एकूण उत्पादन १ कोटी ७३ लाख टनांच्या आसपास झाले. म्हणजे मागणीच्या अंदाजे ७५% टक्केच उत्पादन झाले व एकूण तूट ५५ लाख टनांच्या आसपास आहे. २०१५ मध्ये दुष्काळामुळे हे उत्पादन अजून कमी होऊ शकते. तुमच्या कोष्टकाप्रमाणे २०१५ मध्ये कमी उत्पादन होणार असल्याने त्याचा भावावर परीणाम २०१६ मध्ये दिसायला हवा. त्याच गणिताप्रमाणे २०१४ मधील कमी झालेल्या उत्पादनाचा भावावर होणारा परीणाम २०१५ मध्येच दिसणार ना.

In reply to by श्रीगुरुजी

काय गुरूजी, तुम्ही कोष्टक कोष्टक करताय नुसते मनःपूर्वक वाचलेले दिसत नाही तुम्ही ते अन्यथा अश्याप्रकारे 2015 मधे आपण जो डाळ साठा खातो आहोत तो 2013 च्या पेर्याचा आहे. हे वाक्य का मिस केले असते आपण ? क्लियर बोललोय एक वर्ष जवळपास गॅप असते मधे मग २०१४ चा माल १५ मधेच कसा येणार मार्केट ला? २०१४ च्या दुष्काळ परिस्थिती मुळेच २०१६ मधे कमी पुरवठा असेल हे मान्य केले आहे त्यात, ओढून ताणुन त्याचा संबंध ह्या वर्षी च्या जमाखोरी ला काय म्हणून लावता आहात देवानु? शिवाय, २०१४ मधल्या दुष्काळ मुळे २०१५ मधे डाळ महाग झाली हे तुमचे विधान ग्राह्य धरले (चुक वरती दाखवणेत आली आहे तरी) तरी भाववाढ़ एकाच आठवड्यात रु १५५/किलो ते रु २१०/किलो अशी ५० पंचावन्न रूपये एकदम कशी वाढली? ह्यावर काही विचारमौक्तिके?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गेली ३ वर्षे पाऊस सरासरीपेक्षा बर्‍यापैकी कमी प्रमाणात पडलेला आहे. या तिन्ही वर्षात जून व जुलै महिने जवळपास कोरडेच गेले. यावर्षी तर पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. तूर डाळ व साधारणपणे जवळपास सगळ्याच डाळींच्या देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे. त्यामुळे भाववाढ होणे अपरिहार्य आहे. सध्या तूर डाळ आयात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा भाव खूप वाढलेले आहेत व आंतरराष्ट्रीय भावात व भारतात विकल्या जाणार्‍या भावात जेमतेम २०-३० रू. प्रति किलो इतकाच फरक आहे (भारतातला तूर डाळीचा आजचा भाव १५०-१८० रू. प्रति किलो धरला तर दोन्ही भावात फारसा फरक नाही). त्यामुळे तूर डाळ आयात करूनसुद्धा भावात फारसा फरक पडणार नाही. २०१३, २०१४ आणि २०१५ अशी लागोपाठ ३ वर्षे कमी पावसाचा फटका बसल्याने भाववाढ अपरिहार्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा कॅमेरावरच बॉल दाणकन आदळलाय. बेल्स उडून ग्राउंडच्या बाहेर आहेत. तरीही गल्ली क्रिकेटमधल्या ब्याटमालक पोरासारखं "मी आउट नाहीच" असं म्हणणं कसं जमतं हो तुम्हाला? जावा घरी. क्लीन्बोल्ड झाला आहात. कमी पुरवठ्यामागे तुमचे च'तुर' व्यापारी आहेत, निसर्ग नाही. तुमच्या सरकारला ह्या च'तुर' व्यापार्‍यांच्या चतुराईला मोडता घालायला वेळ नाही. जनतेचे हाल होऊ देत. तुम्ही फक्त भाजपाचे कपडे सांभाळा. @बापुसायेब. एक सल्यूट खाटकन. तुरीची शेंग कोणत्या रंगाची असते हे गुगलून पाहणारास यापेक्षा अधिक समर्पक उत्तर शक्य नव्हते.

In reply to by तर्राट जोकर

गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा कॅमेरावरच बॉल दाणकन आदळलाय. बेल्स उडून ग्राउंडच्या बाहेर आहेत. तरीही गल्ली क्रिकेटमधल्या ब्याटमालक पोरासारखं "मी आउट नाहीच" असं म्हणणं कसं जमतं हो तुम्हाला? जावा घरी. क्लीन्बोल्ड झाला आहात.
हा प्रतिसाद वाचून करमणूक झाली. इथे मला सोन्याबापू गोलंदाजी करीत नाहीत किंवा ते माझी गोलंदाजी खेळत नाहीय्येत. त्यामुळे त्यांनी मला किंवा मी त्यांना बाद करण्याचा किंवा आम्ही एकमेकांची गोलंदाजी फोडून काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु तरीसुद्धा माझा त्रिफळा उडालाय अशी तुम्ही स्वतःची समजूत करून घेत असल्यास माझी अजिबात हरकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्यामुळे साठेबाजी होणारच. आणि चतुर व्यापारी याचा फायदा उठविणारच. साठेबाजी करणार्‍या ह्याच "चतुर" व्यापार्‍यांबद्दल २००९-१० किंवा २०१२-१३ साली श्रीगुरूजी, तुमचं मत काय असलं असतं बरं? आणि अर्थातच तेंव्हा ते मत फक्त व्यापारी नाही तर सरकार बद्दल पण असलं असतं. तेच मत आत्ताच्या सरकारला लागू होतं का? स्वतःच्या खिशाला कात्री लागत असतांना (खरंतर दरोडाच घातलाय) व्यापार्‍यांना "चतुर" म्हणणार्‍या श्रीगुरूजींच्या भाजप प्रेमाला सलाम :) असाच चतुरपणा भाजपच्या राज्य सरकारने दुधाच्या भावात ४०% पैसे "चतुर" व्यापर्‍यांच्या घशात घालून केला आहे. व्यापारी खरंच "चतुर" आहेत :)

In reply to by श्रीगुरुजी

आणि चतुर व्यापारी याचा फायदा उठविणारच. चतुर व्यापारी?????????????????????????????????????// बोह करे तो कॅरेक्टर ढीला, हम करे सो रासलीला?? :) ;) बात कुछ हजम नही गुर्जी. बाकी या धग्यावर ही एक गंमतच आहे. २०१२ - १३ मध्ये जे लोक प्राणपणाने ज्या सगळ्या गोष्टींची पाठराखण करत होते तेच आता त्याच गोष्टींसाठी भाजपावर आणि गुर्जींवर टीका करत आहेत आणि जे लोक त्यावेळेस तुटुन पडले होते ते आता इतरांच्या चतुरपणाचे आणि नैसर्गिक आपत्तीचे रडगाणे गात आहेत. त्याहुन गंमत म्हणजे सध्या कावीळीची खूप मोठी साथ पसरली आहे. लाल रंग दिसला तरी लोक भगवा भगवा म्हणुन आक्रोश करुन राहिले बाप्पा.

सद्धया २०१५ मधे जे आठवड्या ला ५० रूपये भाव एकदम वाढले आहेत ते साठेबाजी वगळता अजुन कुठल्या संभाव्य कारणास्तव वाढलेली नाहीत, हे मात्र मी म्हणतो आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ओये बापुसाब, का कर रहा ससुरा? काहे अपने गुरुजनोंसे जबान लडा रहाहो? कह दिया ना उत्पाद कम है तो है. बातही खतम. हमार गांव मा घर का पडोस मे बडा ब्यापारी है. इत्ता बडा गोदाम है उसका. राजमा, मूंगफली, दाल ना जाने का का भर के रखता है. किसानोंसे खरीद खरीद कर रख देता है और पता नहि कब अचानक से बडा बडा गाडी लाकर भेज देता है.... लेकीन गुरुजी ने कहा ना उपज कम है तो है बुडबत.

In reply to by प्यारे१

पहले कहा गायब थे भैबा!ससुरे पहिले बताइबे करते तो हम पहले ही माफ़ी मांग कर कन्नी न काट लेते रे!

सुप्रीम कोर्ट तसेच देशातील २४ हायकोर्टांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने संमत केलेला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा शुक्रवारी सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने घटनाबाह्य ठरविला. त्यामुळे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी २२ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली कॉलेजियम पद्धत पुनर्स्थापित झाली आहे

In reply to by dadadarekar

भाजपला दणका? दोन्ही सभागृहात भाजपचे २/३ बहुमत आणि २० राज्यात भाजपची सरकारे??

तूर डाळ पिक कमी येणार हे सरकारला आधीच माहित होते. मग आयात का केली नाही वेळेत ? आणि आत्ता तरी कुठे करतायत ? पाच हजार टन आयात . फक्त इतकीच ? हे म्हणजे दर्या मी खसखस आहे. बहुतेक आयात न करण्या मागे काही तरी ठोस विचार असलाच पाहिजे. जसा - निवडणूक फंड ची परस्पर परतफेड .. जनतेच्या खिशातून ..

In reply to by अभिजित - १

तूर डाळ पिक कमी येणार हे सरकारला आधीच माहित होते. मग आयात का केली नाही वेळेत ? आणि आत्ता तरी कुठे करतायत ?
India set to import tur dal from Africa amid high domestic prices http://articles.economictimes.indiatimes.com/2015-08-19/news/65592393_1…

लेबल ------------------------------------------------------------------------------ मेक इन इंडियाचं स्वप्न केवळ भारतीयांनाच नाही तर जगभरातल्या उद्योजकांना दाखवणा-या नरेंद्र मोदींच्या लाडक्या म्हणजे जगातल्या सगळ्यात उंच ठरणा-या १८२ मीटरच्या सरदार पटेलांच्या पुतळ्याचे काम चिनी फाउंड्रीला देण्यात आल्याचे आउटलूक मॅगेझिनने म्हटले आ

In reply to by अभिजित - १

Govt inaction, commodity trading behind spiraling prices of pulses Prajakta Kunal Rane, Hindustan Times, Mumbai | Updated: Oct 17, 2015 00:23 IST http://www.hindustantimes.com/mumbai/govt-inaction-commodity-trading-beh...
वरील प्रतिसाद व त्यात दिलेली लिंक वाचून आआपभक्त नांदेडिअन यांची आठवण आली. ते अशाच लिंक्स न वाचता फक्त शीर्षक वाचून देतात आणि आतल्या लेखात नेमकं त्यांच्या अपेक्षेविरूद्ध लिहिलेलं असायचं. या लेखात खालील परिच्छेद आहेत. People reeling under the skyrocketing prices of essential commodities can blame the state government. The reason: its failure to extend the stock limit validity. Prices of tur dal and urad dal, two of the most commonly consumed pulses, have significantly increased. Experts blamed this on commodity trading and the state government’s failure to revive the stock limit. The state government failed to revive the stock limit for pulses even after receiving three circulars from the Union government in June and July. In the first circular dated June 17, Surendra Singh, deputy secretary to the government of India, asked the state chief secretary to revive stock limits and take effective steps against hoarding under Essential Commodities Act, 1955 with respect to pulses, edible oil and oil seeds. Hindustan Times was the first to report about these circulars and the state government’s inaction. अर्थ उघड आहे.

In reply to by श्रीगुरुजी

घाईत असल्याने पेज पूर्ण वाचले नव्हते. तरी हि खालील भाग जो गुरुजीनीच लेखातून टाकला आहे तो सरकारची अकार्यक्षमता दाखवायला पुरेसा आहे. commodity trading हे केंद्राच्या अखत्यारीत येते. आणि देवेंद्र किवा नरेंद्र हे शेवटी एकच पक्षाचा भाग आहेत. त्या मुले देवेंद्र ची चूक असली तरी तुम्ही सुटू शकत नाही. कि तुमची सुपारी फक्त नमो करताच आहे ? आणि हो अजून एक. हे वेब पेज आता गायब आहे. मानले गुरुजी तुम्हाला .. गुरुजी के हात बहोत लंबे है !! " Experts blamed this on commodity trading and the state government’s failure to revive the stock limit. The state government failed to revive the stock limit ..."

In reply to by अभिजित - १

आपणांस असे का वाटले कुणास ठावूक... तुमचा दुवा गंडला नाही हेच सांगायला आलो होतो राव... जिसका करो भला वो कहता माझंच खरा... (तर्राट तर हम है पण दुनिया क्युं झूम रही है रे मौला.....)

In reply to by तर्राट जोकर

ते तुम्हाला नव्हते. राज्य सरकारचा दोष असे सांगून गुरुजी तिथून पळ काढतायत . त्यांना आहे ते. त्यांनी हाय लाईट केलेय वरच्य प्रतिसादात - "the state government’s failure to revive the stock limit." बहुतेक गुरुजीची सुपारी नमो आणि केंद्र सरकार इतकीच आहे. भाजप राज्य सरकारशी त्यांना काही देणेघेणे नाही.

In reply to by अभिजित - १

अभिजित - १, मोदींचा पाठीराखा असणे आणि भाजपचा पाठीराखा असणे या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. मी मोदींचा चाहता आहे भाजपचा नाही. तसेच श्रीगुरुजी असावेत. १९७७ च्या निवडणुकींत मतदान करणारे लोकं इंदिरा गांधींचे चाहते असतीलही, पण ते इंदिरा काँग्रेसचे चाहते नव्हते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ते त्यांनाच सांगू दे ना .. आणि राज्य सरकारचा म्हणजे राज्य भाजप चे पाप आहे डाळी चे भाव वाढण्यात हे कबूल करू दे. पण मी आत्ताच सांगतो, ते वेगवेगळे शब्दच्छल करून या सगळ्या तून पळ काढणार .. बाकी मन मोहन पण खूप ज्ञानी आणि स्वच्छ होतेच नाही का ? बाकी तुम्ही कधी शिवसैनिक / कधी भाजप वाले असताच नाही का ( नाही तर मग इथे समर्थन कशाला करता भाजपचे ) ? टोपी फिरवावी तर ती अशी .. आणि हो .. मी नेहमीच भाजप ला मत देत आलो आहे. लोकल आणि राज्य पातळी वर नेहमीच भाजप ला मत देणार हे नक्की.

In reply to by अभिजित - १

ते त्यांनाच सांगू दे ना .. आणि राज्य सरकारचा म्हणजे राज्य भाजप चे पाप आहे डाळी चे भाव वाढण्यात हे कबूल करू दे. पण मी आत्ताच सांगतो, ते वेगवेगळे शब्दच्छल करून या सगळ्या तून पळ काढणार ..
मी कोठेही पळून जात नसतो. मिपावरचा एकतरी धागा दाखवा जिथून प्रतिसाद न देता मी पळून गेलो आहे. बाकी भागाबद्दल म्हणजे डाळीचे भाव वाढण्यात राज्य सरकारची जबाबदारी यावर मी आधीच्या प्रतिसादात उत्तर दिले आहेच.

In reply to by अभिजित - १

ते तुम्हाला नव्हते. राज्य सरकारचा दोष असे सांगून गुरुजी तिथून पळ काढतायत . त्यांना आहे ते.
मी पळ बिळ काढत नसतो. राज्य सरकारचा दोष हे मी म्हणत नसून तुम्ही दिलेल्या बातमीतच हे ३-४ ठिकाणी लिहिलेले आहे. बातमी न वाचताच तुम्ही बातमीची लिंक इथे दिली हा माझा दोष आहे का? असणार बहुतेक, कारण माझे हात बहोत लंबे है असं तुम्हीच वर लिहिलं आहे.
त्यांनी हाय लाईट केलेय वरच्य प्रतिसादात - "the state government’s failure to revive the stock limit." बहुतेक गुरुजीची सुपारी नमो आणि केंद्र सरकार इतकीच आहे. भाजप राज्य सरकारशी त्यांना काही देणेघेणे नाही.
आधीच्या प्रतिसादात यावर स्पष्टीकरण दिलेले आहे.

In reply to by अभिजित - १

घाईत असल्याने पेज पूर्ण वाचले नव्हते.
ते मला माहितच होतं. इथे काहीजण इतके कट्टर मोदी/भाजप विरोधक आहेत की ते कोणत्यातरी बातमीचे नुसते शीर्षक वाचतात आणि आत काय लिहिलं आहे ते न बघताच घाईघाईत इथे येऊन ती लिंक देतात. माध्यमे बातम्यांचा मथळा कसा फसवा देतात हे यांच्या का लक्षात येत नाही ते समजत नाही. उदा. एखाद्या बातमीचा मथळा असा असतो. "प्रथमदर्शनी मोदींचा भ्रष्टाचारात हात असल्याचे दिसते : न्यायालय". लगेच ही मंडळी बातमी न वाचतात "मोदींचा भ्रष्टाचारात सहभाग सिद्ध झाला" अशी प्रतिक्रिया देऊन इथे लिंक देतात. प्रत्यक्षात आतील बातमी ही ललित मोदी संदर्भात असते. असो.
तरी हि खालील भाग जो गुरुजीनीच लेखातून टाकला आहे तो सरकारची अकार्यक्षमता दाखवायला पुरेसा आहे. commodity trading हे केंद्राच्या अखत्यारीत येते. आणि देवेंद्र किवा नरेंद्र हे शेवटी एकच पक्षाचा भाग आहेत. त्या मुले देवेंद्र ची चूक असली तरी तुम्ही सुटू शकत नाही. कि तुमची सुपारी फक्त नमो करताच आहे ? भारतात महाराष्ट्र हे एकच राज्य आहे का? आणि तूरडाळीची भाववाढ फक्त महाराष्ट्रातच झाली आहे का? अवांतर - मी कोणाची सुपारी बिपारी घेतलेली नाही आणि घेणार नाही..
आणि हो अजून एक. हे वेब पेज आता गायब आहे. मानले गुरुजी तुम्हाला .. गुरुजी के हात बहोत लंबे है !! बापरे! हे अति होतंय. तुम्ही दिलेल्या लिंकवरील वेब पेज गायब झाले तर तुमच्या म्हणण्यानुसार ते मीच केले कारण माझे हात खूप लंबे आहेत म्हणून!!!!! काय बोलायचं आता.

In reply to by श्रीगुरुजी

वरचा प्रतिसाद जरासा गंडला. मधला भाग असा हवा होता.
तरी हि खालील भाग जो गुरुजीनीच लेखातून टाकला आहे तो सरकारची अकार्यक्षमता दाखवायला पुरेसा आहे. commodity trading हे केंद्राच्या अखत्यारीत येते. आणि देवेंद्र किवा नरेंद्र हे शेवटी एकच पक्षाचा भाग आहेत. त्या मुले देवेंद्र ची चूक असली तरी तुम्ही सुटू शकत नाही. कि तुमची सुपारी फक्त नमो करताच आहे ?
भारतात महाराष्ट्र हे एकच राज्य आहे का? आणि तूरडाळीची भाववाढ फक्त महाराष्ट्रातच झाली आहे का? अवांतर - मी कोणाची सुपारी बिपारी घेतलेली नाही आणि घेणार नाही..

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एकदा का गुरुजी नि ठरवलं म्हणजे ठरवलं च .. मग ते कोणालाही मूर्ख ठरवायला मागे पुढे बघत नाहीत .. आता या हिंदुस्तान times ला कसे ते चुकीचे ठरवतील ते बघण्या सारखे असेल !!

क्या रे ये घोडा-चतुर, घोडा-चतुर बोला, एक पे रहना या घोडा बोलो या चतुर बोलो... गाओ शब्दार्थः घोडा=निसर्ग, चतुर = व्यापारी

आखिर इस बेचारे को थप्पड़ क्यों मारा..?

Posted by Surendra Grover on Friday, March 27, 2015