Skip to main content

मोहरम : माहिती हवी आहे

लेखक दत्ता जोशी यांनी शुक्रवार, 16/10/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून मोहरम सुरु झाला. मोहरम हा एक अत्यंत महत्वाचा इस्लामिक सण / उत्सव असावा असे वाटते. अनेक वर्षे मध्यपूर्वेत काम करताना तिथे कधी लोकांना हा उत्सव करतांना पहिले नाही. तिथे दोन ईद, प्रेषित मुहम्मद जन्मदिन, इस्लामिक नव वर्ष इतक्याच इस्लामिक सणांना सरकारी सुटी असायची. इथे दिसतात त्याप्रमाणे मोहरमच्या मिरवणुका वगैरे कधी दिसल्या नाहीत. म्हणून या उत्सवाविषयी थोडे कुतूहल जागृत झाले. या उत्सवाचे औचित्य काय? तो भारतातच का केला जातो? यामागे काही धार्मिक भावना आहे, इतिहास कि फक्त सामाजिक उत्सव उर्मी? याविषयी कृपया माहिती द्यावी.

वाचने 35599
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुमालाच कळलं बगा, नायतर बाकीचे बसलेत कुटत... जाउंदे. रोख फक्त इथे होता. : त्यांच्या धर्मातच तशी शिकवण आहे. आपल्या धर्मात तशी शिकवण नाही. एक चुकीची समजूत की हिंदू एवढे काय हिंस्त्र-वैगेरे नाहीत. जातीपातीतून घडणारे हत्यासत्र, धिंडी, इत्यादी बघितले तर हिंदूंही कट्टर-हिंस्त्रपणात मागे नाहीत हे समजून येतं. जर हिंदू धर्म एवढाच ग्रेट, शांतीप्रिय, सहिष्णु वैगेरे होता तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? शैव-वैष्णवांचे रक्तरंजित इतिहास कसे विसरले जातात? कि फक्त दुसर्‍या धर्माचे लोक मारले की तेव्हाच धर्म हा कट्टर-असहिष्णु-हिंस्त्र समजला जातो? मुद्दा होता की धर्मात असलेल्या शिकवणुकीने खरंच फरक पडतो का? माणुस कट्टर व हिंस्त्र व्हायला नक्की काय लागत असावं? धार्मिक शिकवणुकीने माणसे मारेकरी झाली असती तर काही हिंदू संघटना तोडीस तोड ब्रेनवॉशिंग करत आहेत, त्यांचेही रिझल्ट्स दिसले असते. जर तसे नसेल तर डीनएमधे लोचा असला पाहिजे. कुठेतरी तर या प्रश्नाचे उत्तर असेल जे मी जेन्युइनली शोधत आहे. म्हणून खरोखर प्रश्न विचारला होता. कुत्सितपणे किंवा उपरोध म्हणून नाही. त्यासाठी दुसरे आयडी आहेत. तर्राट असलो तरी कळतं कुठे काय बोलायचे ते....!

In reply to by तर्राट जोकर

चिल्ल! मी गंमती गंमतीत बोललो हो ते. सविस्तर बोलायला आवडेल. वेळ मिळेल तसा प्रतिसाद देतो. तोवर हे वाचा... http://www.misalpav.com/node/6046 http://www.misalpav.com/node/6646

In reply to by तर्राट जोकर

गाडी कोणत्या ठेस्नाला जाणार ते माहिती होतं आम्हाला. उगीच वैचारिक वगैरे ग्राऊण्ड तयार करायची काय गरज? लिहायचे ना बिनधास्त. हिंदू लेचा पेचा नाही, सहिष्णू आहे इतकाच स्पष्ट केले फक्त. बाकी तुमची वैचारिक टिमकी चालु द्या. ---(संपादित)----

In reply to by दत्ता जोशी

खैबर्खिंडीतून बाकी लोक आत आले. त्याच खिंडीतून बाहेर जाऊन प्रदेश जिंकायला हिंदूना कोणी नको म्हटले होते का ? हा सहिष्णूपणा नव्हे , आळशीपणा आहे.

In reply to by दत्ता जोशी

श्रीयुत दत्ता जोशी, ह्या शिक्केमार वृत्तीचा संसर्ग फार वाइट हो. तस्मात् कुणास काय बोलतो आहोत याचा पाचपोच ठेवा. आपणास माझ्याबद्दल शष्प माहित नसतांना मला मियां वैगेरे संबोधणे आपल्या महान सहिष्णु संस्कारांची पातळी दर्शवते. यापुढे असल्याप्रकारे संबोधन केल्यास वैयक्तिक अपमान केल्याप्रकरणी संपादकांकडे तक्रार केली जाईल एवढे लक्षात घ्या. तसेही प्रतिसाद तुम्हाला नसून बिपिन कार्यकर्ते यांना होता. चर्चा करायची असेल तर पातळी योग्य ठेवा. राहता राहिला हिंदू लेचापेचा वा कसा आहे हे तुम्ही मला सांगण्याचा प्रश्न तर... हिंदू बलवान राज्यकर्त्यांप्रति सहिष्णु तसेच असहाय्यांप्रति कट्टर, असहिष्णु आहे. तुम्ही नुसतं हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम एवढंच बघत बसला आहात. आपल्याच हिंदूंमधे आपल्याच बांधवांवर किती अत्याचार झाले हे आपल्यास ठावूक असल्याचे दिसत नाही कारण त्याबद्दल आपणास काही रुची दिसत नाही. त्यामुळे कोण कसं आहे याबद्दल आपले कूपमंडूक विचार स्वयंमनोरंजनास उपयुक्त आहेत, त्याने सत्य सिद्ध होत नाही. याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर जरूर कळवा.

In reply to by तर्राट जोकर

"यापुढे असल्याप्रकारे संबोधन केल्यास वैयक्तिक अपमान केल्याप्रकरणी संपादकांकडे तक्रार केली जाईल एवढे लक्षात घ्या." शुभेच्छा. मी अडवू शकत नाही. प्रत्येक धाग्यावर हिंदू , हिंदू संस्कृती वर घसरून ज्या निरर्थक टिपण्या करणे हि प्रवृत्ती विशाल आणि संस्कृती उच्च आहे का? विषय काय होता आणि तुमची प्रतिक्रिया काय. चर्चाच करायची होती तर आंबेडकर, शैव वैष्णव, हिंदू- जीन्स आणि काय काय बिनकामाचे लिहायचे कारण नव्हते. तुमची हिंदू संस्कृतीच्या सुधारणेची कळकळ बघितल्यावर दुसरे कोणतेही विशेषण मला योग्य वाटले नाही. प्रत्येक धाग्यावरील तुमची "टिपिकल" मनोवृत्ती बदला आधी. तरच चर्चा होऊ शकेल. चर्चा म्हणजे उगीच आपल्या दुषित आणि विद्वेषी वृत्तीचे प्रदर्शन नव्हे हे लक्षात घ्या. तळमळ आणि मळमळ यातला फरक समजतो वाचकांना.

In reply to by दत्ता जोशी

मिस्टर जोशी, सिलेक्टीव रीडींग सोडाल तर बरं होइल. माझे बिका यांना असलेले दोन्ही प्रतिसाद वाचा. त्यात कुठे हिंदूधर्मावर निरर्थक टिप्पणी केली हे सांगू शकाल? पहिल्या प्रतिसादात फक्त मुस्लिम धर्म व धर्मामुळे येणारा कट्टरवाद चर्चेस घेतला आहे. त्यात धर्मांतरामुळे कट्टरवाद उफाळतो का कि तो व्यक्तित आधीपासूनच असतो हा प्रश्न होता. त्यात हिंदूंवर घसरून वैगेरे कुठे दिसले ते कळले नाही. तुम्हाला लेचापेचा हा शब्द फारच लागलेला दिसतोय. त्याबद्दलपण एक खुलासा करतो. सुमारे ६००-७०० वर्षे मुस्लिमांची आक्रमणे होत रहिली, राज्य होत राहिली. काय करून घेतले हिंदूंनी. त्यांना जाग यायला ६०० वर्षे जावी लागले जेव्हा शिवाजीमहाराज प्रकट झाले. तत्पूर्वी काय चाललं होतं हे तुम्हास जास्त ठावूक कारण मुस्लिम अत्याचार कहान्या तुम्हास मुखोद्गत आहेत असं दिसतंय. तेव्हा हिंदूंनी काहीच कसं केलं नाही हा विचार कधीच आपल्या संस्कारी मनात येत नाही. पण मुस्लिमांनी कसे आमच्यावर अत्याचार केले ह्या टिप्पीकल सासु-सुना छाप रडगाणी कायम गात असता. तेव्हा हिंदू आपले कट्टर जातपातवाद, पंथ-वाद, धर्मप्रचार-वाद-विवादचर्चा यात मश्गूल होते, त्यांना परकिय आक्रमणांना तोंड द्यायला जमले नाही. हे कबूल का करत नाही? आक्रमकांनी सौजन्य दाखवावे अशी तर्कदुष्ट विचारसरणी नेहमीच मुस्लिम आक्रमकांबद्दल बोलतांना इथे दिसून येते. पण सौजन्य न दाखवणार्‍या आक्रमकांना इथून हाकलून लावायला हिंदूंना कुणी अडवले होते हे काय कोणी बोलत नाही. कुणीही येतो अन् हिंदूंवर राज्य करून जातो यात हिंदूंचा सहिष्णुपणा आहे की भेकड, अल्पसंतुष्टी वृत्ती आहे हे सांगावे. मुंबै स्पिरीट म्हणून जे मिरवल्या जाते तेही याच सहिष्णुपणाच्या पठडीतले. यावर तुम्ही काय उत्तर द्याल तेही माहित आहे. त्यामुळे उत्तर द्या, मग पुढे अजून बोलायचे आहेच. दुसर्‍या प्रतिसादात धर्म हे कारण नसून माणसांच्या वृत्तीतच हिंस्त्रपणा आहे हे नमूद केले आहे. लोक सोयिस्करपणे धर्माला जोडून जो अत्याचार चालला आहे त्याकडेच लक्ष वेधतात. इतरत्रही बरेच प्रकार सुरू असतात. त्याबद्दल थोडा खुलासा होता. हुप्प्या व इतरांनी माहितीपूर्ण प्रतिसादही दिलेत. जे माझ्या प्रश्नांच्या रोखाने अगदी योग्य होते. तिथे आपण हिंदूंबद्दल निरर्थक टिप्पणी आहे असे कसे म्हणता? शैव-वैष्णव-आंबेडकर हे हिंदू धर्माच्या बाबतीत बिन्कामाचे आहे हे आपले वक्तव्य आहे ते तद्दन बेफिकिरीतून व अज्ञानातून तसेच हिंदूधर्माच्या पराकोटीच्या चुकिच्या अभिमानातून आले आहे. आपल्याच धर्माबद्दल आपणांस किती तोकडी समज आहे हेही उघड झाले, पुराण-वेद्,पोथ्या-आर्त्या, मंदीर-मठ म्हणजेच हिंदू धर्म अशी जी आपली समजूत झाली आहे त्यास माझ्या प्रतिसादांनी फार धक्का बसत असेल तर मी काय करु शकत नाही. चर्चा तुम्ही ठरवलेल्या चौकटीतच झाली पाहिजे असे तुम्हाला पाहिजे असेल तर धाग्यावर डिस्क्लेमर टाका. आणि शुभेच्छांची आपणास जास्त गरज आहे, तस्मात् असू देत तुमच्याकडे.

In reply to by तर्राट जोकर

अभ्यास हीन असंदर्भ सिलेक्टिव्ह लिखाण बंद करा. अजूनही लिखाण त्याच त्रिज्येत सुरु आहे. सुमारे ६००-७०० वर्षे मुस्लिमांची आक्रमणे होत रहिली, राज्य होत राहिली. काय करून घेतले हिंदूंनी. त्यांना जाग यायला ६०० वर्षे जावी लागले जेव्हा शिवाजीमहाराज प्रकट झाले. तत्पूर्वी काय चाललं होतं हे तुम्हास जास्त ठावूक कारण मुस्लिम अत्याचार कहान्या तुम्हास मुखोद्गत आहेत असं दिसतंय. तेव्हा हिंदूंनी काहीच कसं केलं नाही हा विचार कधीच आपल्या संस्कारी मनात येत नाही. पण मुस्लिमांनी कसे आमच्यावर अत्याचार केले ह्या टिप्पीकल सासु-सुना छाप रडगाणी कायम गात असता. हाच तुमचा का अभ्यास ... मग काय बोलावे? काश ...! .१६व्य शतकात महाराजांनी अलौकिक कार्य हाती घेई पर्यंत जवळपास ८५० वर्षे घणाघाती हल्ले करूनहि हिंदुस्तानचा मुघलीस्थान, अरबस्थान का नाही झाला..गेला बाजार अखंड हिंदुस्तांवर हे आक्रमणकर्ते राज्य का नाही प्रस्थापित करू शकले ...असा प्रश्न बुद्धिवंतांना का पडत नाही? आता मी मास्तर बनून कोणाला नाही शिकवू शकत पण ८व्य शतकापासून - १६व्या शतकापर्यंत बाप्पा रावल, राजा जयपाल, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, इ राजपूत तसेच नागा, शीख हे बुद्धिमंतांच्या खिजगणतीत नाहीत का? . बाय द वे, ६०० वर्षांपासून आक्रमणे झाली, राज्ये झाली आणि छत्रपती जन्माला आले, हिंदू जागे झाले, मग त्यांनी स्वराज्य स्थापन केले ...हे मान्य आहे तर तुम्हाला. आधीच्या बर्याच धाग्यात वेगळाच सूर होता कि...अर्थात नवीन काहीच नाही. चर्चा तुम्ही ठरवलेल्या चौकटीतच झाली पाहिजे असे तुम्हाला पाहिजे असेल तर धाग्यावर डिस्क्लेमर टाका. आता तुमचा हा प्रतिसाद बघा संपादित तजो ....'मुहर्रम ची माहिती हवी' या धाग्यावर "एक चुकीची समजूत की हिंदू एवढे काय हिंस्त्र-वैगेरे नाहीत. जातीपातीतून घडणारे हत्यासत्र, धिंडी, इत्यादी बघितले तर हिंदूंही कट्टर-हिंस्त्रपणात मागे नाहीत हे समजून येतं. जर हिंदू धर्म एवढाच ग्रेट, शांतीप्रिय, सहिष्णु वैगेरे होता तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? शैव-वैष्णवांचे रक्तरंजित इतिहास कसे विसरले जातात? कि फक्त दुसर्‍या धर्माचे लोक मारले की तेव्हाच धर्म हा कट्टर-असहिष्णु-हिंस्त्र समजला जातो? " बेशुद्धच पडलो हे वाचून ...काय संबंध आहे मुहर्रमचा आणि वरच्या या हौ वॉज दयाट अपील चा? ? याच्या आधीपण "मुसलमानांना कसे बाळकडू दिले जाते कट्टरतेचे आणि धर्मासाठी रक्त सांडायचे " वगैरे असल्या प्रतिक्रिया उगीचच टाकायची काय गरज होती? काय लिहायचे हे ठरवून सुरवात केल्याचे हेतू स्पष्ट आहेत आणि तुमच्या मान्य न करण्याने काही होत नाही. शैव-वैष्णव-आंबेडकर हे हिंदू धर्माच्या बाबतीत बिन्कामाचे आहे हे आपले वक्तव्य आहे ते तद्दन बेफिकिरीतून व अज्ञानातून तसेच हिंदूधर्माच्या पराकोटीच्या चुकिच्या अभिमानातून आले आहे. ... काय संबंध भौ? विषय काय, लिहितोय काय काही तारतम्य? माफ करा, स्पष्ट बोलतो पण मराठीत अशा बोलण्याला वेगळाच शब्द आहे. बाय द वे, तुम्ही स्वतः किती शैव- वैष्णव दंगली पहिल्यात हो? किती बॉम्ब स्फोट केले त्यांनी एकमेकांच्या देवळासमोर? किती संघटना निघाल्या एकमेकांना संपवण्यासाठी? आंबेडकरांचे नाव घेतले कि विचारवंत आणि पुरोगामी हे अधोरेखितच आहे त्यामुळे पास. आणि चेरी ऑन द केक... त्यास माझ्या प्रतिसादांनी फार धक्का बसत असेल तर मी काय करु शकत नाही. . हे म्हणजे... हाइट ऑफ अमुक... हाइट ऑफ तमुक पठडीतले जे विनोद होते ना, त्याचा शिरोमणी आहे.... हाइट ऑफ गैरसमज ..आत्मविश्वास वगैरे .. (खरच खदाखदा हसलोय). असो..लगे रहो. .. लई बिल झालं. मला इतका वेळ फुकट घालवणं परवडण्यसारखं नाही. .. -----(संपादित)------=

In reply to by दत्ता जोशी

मिस्टर जोशी, यहांसे पढना शुरु करो तो कुछ समझमे आयेगा.. मुस्लिमांच्या माहिती धाग्यावर हिंदू कुठून आले हेही कळेल "जी जात नाही ती जात' असं म्हणतातच. इथले अनेक लोकसमूह काही ना काही कारणांनी मुस्लिम झाले. पण त्यांच्या मूळ जाती चिकटून राहिल्याच. काही जाती पेशाशी निगडीत आहेत म्हणून राहिल्या. काही जाती प्रतिष्ठित आहेत म्हणून राहिल्या. भारतात अठरापगड जाती (खरे तर हजारो) आहेत हे आपल्याला माहित असते. पण काही जाती अस्तित्वात असतील असे सामान्य माणसाच्या गावीही नसते. उत्तर भारतात हुसेनी ब्राह्मण नावाची एक जात आहे. (बरखा दत्त याच जातीची आहे.) पाकिस्तानात मुस्लिम राजपूत मोठ्या संख्येने आहेत. गोव्यात सारस्वत कॅथलिक बरेच आहेत. जात संपणार नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे." यावर मी बिका यांना माझी शंका विचारली कारण ते या बाबतीत अभ्यासू आहेत असे जाणवले. बाकी तुम्हाला अंबाबाईचा गोंधळ घालायला माझी काय ना नाही. धागा तुमचा असला तरी यु आर नॉट द ओनर ऑफ धिस साईट अ‍ॅण्ड इट्स कंटेंट. तुम्हाला अवांतराचा त्रास होत असेल तर इग्नोरास्त्र आहे तुमच्याकडे. किंवा संपादकांकडे रितसर तक्रार करा. स्वतःच आकांडतांडव करून हास्यास्पद होत आहात हे लक्षात आले नाही अजून? एक राहिलंच, आंबेडकरांचं नाव घेतलं की जळफळाट का होतो हो तुमचा...? तिथे सगळी उत्तरं संपतात बहुतेक सहिष्णु मास्तरांची...

In reply to by तर्राट जोकर

तजो अगदी प्रामाणिकपणे बोलायचे तर दजोंच्या प्रतिवादात दम आहे. याच धाग्यावर तुम्ही दोन्ही बाजूंनी बोलत आहात. एका प्रतिसादात तुम्ही म्हणाला की "हिंदु हिंस्त्र आहेत / होते" दुसर्‍या प्रतिसादात तुम्ही त्यांना लेचेपेचे म्हणता, हे असे एकाच धाग्यावर दोन विरोधी प्रतिसाद देणे चुकीचे नाही काय? एक काय तो स्टॅंड ठरवा ना. किंवा मग सरळ लिव्हा की "बाबा रे हिंस्त्रे किंवा लेच्यापेच्या असले काही नसते. सगळेजण सारखेच". असे स्पष्त लिव्हा की मंग लोकांचे कन्फ्युजन नाही व्हायचे. अशी डबल ढोलकी कशी चालेल?

In reply to by मृत्युन्जय

माझा मुद्दा समजण्यात थोडी गडबड झाली आहे असे दिसते. विधान एकः बहुसंख्य हिंदूंमधे असा समज आहे की मुस्लिमांच्या धर्मातच कट्टरपणा आहे. हिंदूंमधे तसा नाही. (म्हणजे हिंदू सौम्य आहेत. कट्टर/हिंस्त्र नाहीत) विधान दोनः भारतातले बहुतेक मुस्लिम हे कन्वर्टेड हिंदूच आहेत. विधान तीनः कट्टरपणा हा धर्मात नसून व्यक्तीत असतो. विधान चारः धर्माचा आधार घेऊन हिंस्त्रपणा अजून भडकवता येतो. (हुप्प्या व इतरांच्या प्रतिसादांतून हा प्रकार जाणीवपूर्वक इस्लामी धुरिणांनी केला आहे अशी माहिती मिळाली.) विधान पाचः हिंदूंची भूमिका बलवानांप्रति सहिष्णु व निर्बलांप्रति कट्टर अशी दिसून येते. (याबद्दल मुस्लिम शासक व दलितांचे उदाहरण दिले.) आता वरील सर्व विधाने जोडून पहा. "हिंस्त्र वा लेचेपेचे असणे हे स्थल-काला-परिस्थितीनुसार बदलते, धर्मानुसार नाही" हे विधान मी माझे मत म्हणून मांडले. हे कुठल्याही धर्माला लागू होते. इथे सिलेक्टीवली हिंदूंनाच हिंस्त्र वा लेचेपेचे म्हणणे गृहित नाही. ज्याला मुभा मिळते तो अत्याचार करतोच. त्यास काहीही कारण पुरते. बाकी माझा काही गोंधळ वा सिलेक्टीव दुटप्पीपणा दिसत असेल तर जरूर कळवा. आभारी राहिन.

हुसेनी ब्राह्मणांचे पूर्वज करबलाच्या लढाईत हुसेनच्या बाजूने लढले होते असे ऐकले आहे.. याबद्दल काही जास्त माहीती आहे का..? तसेच इमाम हुसेनांनी हिंदुस्थानात शरण घ्यायची (take refuge) इच्छा व्यक्त केली होती म्हणे हे खरे आहे का..?

In reply to by सुहास

होय. हुसेनी ब्राह्मण करबलात हुसेनच्या पक्षात लढले होते असे म्हणले जाते. म्हणूनच त्यांना हुसेनी ब्राह्मण असे नाव पडले. हुसेनने हिंदुस्तानात शरण घ्यायची इच्छा दाखविली की कसे याबद्दल मला माहिती नाहीये. पण ते सर्वथा शक्य मात्र आहे.

ताबुतांची "डावी-उजवी" होणे म्हणजे नक्की काय? पुण्यात श्रीनाथ चित्रपटगृहाबाहेर एक ताबूत बसविला जातो. अजून एक ताबूत नव्या पुलापाशी असतो. या दोन्ही ताबूतांची मिरवणूक निघून नानावाड्यासमोर दोघांची "डावी-उजवी" झाली असे वृत्तपत्रात येते. म्हणजे नक्की काय होते? तसेच या प्रसंगी रेवड्या उधळल्या जातात. त्यामागचे कारण काय?

In reply to by सुहास

ते गळाभेटच असणार. पीर एकमेकांशी गळाभेट घेतात.

In reply to by श्रीगुरुजी

डावी उजवी म्हणजे गळाभेट घेणे, मिठी मारणे. दोन मुसलमान गळाभेट घेताना आधी डावा खांदा एकमेकांना भिडवून मग उजवा खांदा भिडवतात. त्यावरून हा वाक्प्रचार आला असावा.

मुंबईत भायखळा येथे नोकरीला असताना मी मुंबई सेन्ट्रलवरून पायी भायखळ्याला जात असे. मोहर्रमच्या कित्येक दिवस आधी रस्त्यावर फुकट सरबत वाटणार्यांच्या गाड्या, जागोजागी उभारलेले पाण्याचे हिरवे माठ, त्याभोवती केलेली सजावट दिसू लागे. मोहर्रमच्या दिवशी मात्र आम्हाला अन-ऑफिशियली अर्धा दिवस लवकरच सोडण्यात येई. हेतू हा की मोहर्रमच्या मिरवणुकीत कोणी चुकून सापडायला नको. मात्र संध्याकाळी ऑफिसहून परत येताना, कित्येक वेळा ह्या मिरवणुका दिसायच्या. सर्व जमाव कसल्यातरी धुंदीत (मादक पदार्थाने येणारी धुंदी नव्हे) असायचा. कित्येक तरुण, लोखंडी साखळ्याना बांधलेल्या टोकदार सुऱ्याने, किवा अश्याच अणुकुचीदार हत्याराने स्वताच्या उघड्या अंगावर, चाबूक मारावेत तसे मारून, रक्त काढत. रस्त्यावर जागोजागी रक्त पडलेलं असायचं. तो सर्व प्रकार बघवला जायचा नाहीत तरी उत्सुकतेपोटी आम्ही मित्र बघायचो. स्त्री सहकारी मात्र त्या दिवशी, भायखळ्यावरून ट्रेन पकडायच्या त्या ह्या मुंबई सेन्ट्रल भागात यायच्या नाहीत. ह्या धाग्याच्या निमित्ताने खूप माहिती मिळाली. सगळ्यांचे आभार.

बिकांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणेच वाचनीय. इराणच्याच प्रभावक्षेत्रात येणारा अझरबैजान देश आणि इराकमधला बगदादच्या दक्षिणेचा भाग हेही शिया बहुसंख्य आहेत. लेबनॉनच्या खिचडीतही शियांची संख्या लक्षणीय आहे.

In reply to by नंदन

येमेनमध्ये पण खूप शिया आहेत. येमेनमधली आत्ताची यादवी शिया-सुन्नी वाद आहे. सौदी+इजिप्त सुन्नींना मदत करतायत आणि इराण शियांना.

In reply to by नंदन

धन्यवाद नंदन. खरे आहे. अझरबैजान, इराक वगैरे देश शियाबहुलच आहेत. अझरबैजान हा इराणचाच एक ऑफशूट आहे असे म्हणता येईल. इराकमध्येही ६५% लोक शिया आहेत. आज इराकमध्ये शियांचीच सत्ता आहे. इराकमधला संहर्ष अद्याप न संपण्याचे हे ही कारण आहेच.

एकदा बाहरेनला असताना मुहर्रमच्या गर्दीत सापडलो होतो. एका फॅमिली फ्रेंडच्या घरी निघालो होतो.त्यांचे घर कट्टर शिया एरिआत.रस्त्यावर अनेक लोक अतिशय भेसूर आवाजात छाती बडवत चालले होते. मित्राच्या घरीदेखील तोच आवाज भरुन राहिला होता. अतिशय विचित्र अशी ती मिरवणूक चांगलीच हादरवून गेली होती.

In reply to by अजया

असं ऐकून आहे कि २०१२ मध्ये जो उठाव झाला त्यवेळी पाकिस्तानी सुन्नी पोलिसांना बंदोबस्तासाठी वापरले होते म्हणून जास्ती प्रोब्लेम झाले.

In reply to by दत्ता जोशी

बाहरीनमध्येही शिया बहुसंख्य आहेत. ७०%-७५% लोक शिया असावेत. अधिकृत जनगणना होत नाही त्यामुळे नेमकी संख्या दिसून येत नाही. जनतेत शिया बहुसंख्य, पण राजघराणं मात्र सुन्नी. शिवाय हे घराणं मूळचे बाहरीन बेटावरचे नाहीत. बाहरीनच्याच मालकीच्या पण थोड्या लांबवर असलेल्या एका बेटावरचं हे घराणं. (या बेटांवर कतारपण हक्क सांगतो. पण तो वाद आता मिटला आहे.) त्यामुळे, जनतेला राजा आपला वाटत नाही. ही परिस्थिती अनेक दशकांपासून चालत आलेली आहे. जनतेपासून धोका असल्यामुळे, राजाने स्थानिक पोलिसांमध्ये पाकिस्तानातून बलुची लोक आणून भरती केले. त्यांना स्थानिक नागरीकत्वही दिले. हे लोक आज अनेक पिढ्या बाहरीनमध्येच आहेत त्यामुळे, ते तिथलेच बनून गेले आहेत. पण ऊर्दू बोलतात. पण कितीही झाले तरी ते परकीयच. आणि ते भलतेच राजनिष्ठ असल्यामुळे स्थानिक शियांवर अत्याचार करताना मागे पुढे पाहात नाहीत. लोकसंख्येमधील शियांचे प्रमाण कमी करण्याकरता सरकार अजून एक युक्ती वापरत आहे. अनेक परकीयांना बाहरिनी नागरिकत्व दिले जात आहे. माझ्या माहितीत अशी काही उदाहरणे होती. एक मँगलोरी ख्रिश्चन माणूस ५०-६० वर्षांपूर्वी तिथे गेला. तो तिथेच राहिला. पुढे त्याने एका इराणी महिलेशी लग्न केले. काही काळाने त्याने एका फिलिपिनो ख्रिश्चन महिलेशी लग्न केले. त्याला एकंदर ७-८ मुलं झाली. त्यातल्या इराणी बायकोच्या मुलांचा धर्म मुस्लिम. फिलिपिनो बायकोच्या मुलांचा धर्म ख्रिश्चन (त्यापैकीच एक जण मला भेटला होता). या मुलामुलींनीही अशीच वेगवेगळ्या जातीधर्मवंशाच्या लोकांशी लग्नं केली. त्यातून बरीच मिश्र संतती निर्माण झाली. आणि हे सगळे बाहरिनी पासपोर्टहोल्डर होते पण शिया नव्हते. नंतर मला अजूनही अशी काही उदाहरणं दिसली. आखाती देशांमध्ये सहसा नागरीकत्व दिले जात नाही. सौदी अरेबिया व कुवेतमध्ये तर अगदीच अभावाने आणि ते ही केवळ सुन्नी मुस्लिमांनाच दिले जाते. ओमानमध्ये काही गैरमुस्लिमांना नागरीकत्व दिले गेले आहे. पण सरकारी धोरण म्हणून गैरमुस्लिमांना किंवा परकीयांना नागरीकत्व देणारा बाहरीन हा एकमेव आखाती देश. अर्थातच, त्यामागील कारण, शियांचे प्रमाण कमी करणे हेच आहे. या सगळ्या मुस्कटदाबीतूनच, गेल्या ४-५ वर्षांमधला बाहरीनमधील शियांचा उठाव सुरू झाला आहे. तो अत्यंत क्रूर पद्धतीने दडपण्यातही आला आहे.

इस्लाम मध्ये दाढी कंपल्सरी नाही. कट्टर मुस्लिम असलेले अनेक जण दाढी ठेवत नाहीत पण पाच वेळा नमाज पठण करतात. एक व्यक्ती सातत्यानं एका विचाराला आयुष्यभर वाहून नेत नाही. आपण आक्ख्या समाजांबद्दल विचार का करावा? सरसकटीकरण सरसकट करणं कधी थांबायचं?

कट्टर मुसलमानांना दाढी ठेवणे आवश्यक असतेच. माझ्या पोलीस मित्राला दाढी ठेवण्याच्या परवानगी साठी मुंबई कार्यालया पर्यंत पत्रव्यवहार करावा लागला तेव्हा त्यास परवानगी मिळाली होती. कट्टर मुसलमानांना जीवनात 1दा हज यात्रा कंपल्सरी कट्टर मुसलमानांना दारु वर्ज्य. कट्टर मुसलमानांना खोटं बोलणं वर्ज्य. कट्टर मुसलमानांना सुंता कंपल्सरी. बास हे सर्व त्या मुस्लिम मित्राने सांगितले आहे. अजून काही असल्यास त्याला विचारून टंकतो.

In reply to by सत्याचे प्रयोग

कट्टर मुसलमानांना खोटं बोलणं वर्ज्य
हे अशक्य आहे. बाकी दाढी ठेवण्याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत. मग जे दाढी ठेवत नाहीत ते कट्टर नाहीत का?

In reply to by खटपट्या

च्यायला ह्या भावाने तर इस्लाम स्वतः ज़ाकिर नाईक ते ओवैसी अन अबु आझमी ते आझम खान ह्या व्यक्ति तद्दन हराम असल्याचे मानायला हवे (खोटे बोलणे क्लॉज़ अनुसरुन)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आजुन 3 गोष्टी राहिल्या 1.) कट्टर मुसलमानांना फोटो काढणे वर्ज्य .(मी त्यांचे लग्न पाहिले. VDO शूटींग सोडा फोटोग्राफर सुध्दा नव्हता. 2) कट्टर मुसलमानांना व्याज घेणे वर्ज्य मग ते शेअर, बचत खाते सर्व प्रकारचे (हसायला येते ना ???) जमा होणारे व्याज कट्टर मुसलमान गरीबांना दान करतो. 3 ) 5 वेळी नमाज कंपल्सरी. वरील सर्व प्रकार कुणाला हिणवायचे म्हणून नाही सांगत पण काळाबरोबर बदला की बाबानो.

In reply to by सत्याचे प्रयोग

आयला या भावाने (सोन्याबापूंचा शब्द) 90% अल्जीरिया वाले मुस्लिम ठरायचे नाहीत. अनेक 'शेख' सुद्धा मुस्लिम नाहीत काय या अर्थानं?

In reply to by सत्याचे प्रयोग

धर्माचा उगम,स्थापना ज्या प्रदेशात,भूभागात झाली धर्माचा उगम,स्थापना ज्या प्रदेशात,भूभागात झाली तेथील परिस्थितीचा,वातावरणाचा त्या त्या धर्माच्या आचार-विचार-नियम या सर्व गोष्टींवर प्रभाव पडलेला दिसतो. हिंदू धर्म हिंदू धर्माचा उगम सिंधू नदीच्या अत्यंत सुपीक अशा त्रिभुज प्रदेशात झाला,पाण्याची मुबलक उपलब्धता,समशीतोष्ण हवामान या मुळेच धर्माचरणाचे नीती-नियम या गोष्टींचा विचार करून बनवले गेले. उदा. रोजच्या रोज स्नानसंध्या झालीच पाहिजे,त्याशिवाय देवदर्शन करता येणार नाही. शेती आधारित जीवनपद्धती असे,त्यात पशुशक्तीचे महत्व अनन्य साधारण,त्यामुळेच गोमांस भक्षण करणे निषिद्ध झाले. अशा प्रकारचे नियम बनले अशी अनेक उदाहरणे आहेत. इस्लाम धर्म या धर्माचा उगम सध्याच्या सौदी अरेबिया आणि आसपासच्या परिसरात झाला. वाळवंटातील अत्यंत विषम हवामान,मनुष्य प्राण्यास जगण्यासाठी निसर्गाशी पदोपदी लढा द्यावा लागणार, या गोष्टींचा विचार करूनच त्या धर्माचे नीती-नियम तयार केले गेले. उदा. वाळवंटात रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय असते. प्रचंड थंडीत उब मिळविण्यासाठी ते जमिनीवर एखादा माणूस झोपला असेल तर त्याच्या जवळ जाणार, झोपेत त्या माणसाचा धक्का लागला तर प्राण वाचविण्यासाठी दंश आणि त्यातूनच मृत्यू ठरलेला. म्हणूनच इस्लाम मध्ये जमिनीवर झोपणे निषिद्ध आहे. . हिम्मतराव बाविस्कारांनी कोकणात काम करताना त्यांचा या बाबतचा अनुभव सांगितला आहे. त्यांना विंचू दंशांच्या रुग्णांमध्ये मुस्लिम धर्मियांचे प्रमाण अत्यंत कमी आढळले . त्यामागच्या कारणांचा शोध घेतल्यावर त्यांना हे कारण आढळले कि गरिबातला गरीब मुसलमान पण जमिनीपासून उंच असणाऱ्या चौपाई वर झोपतो. म्हणून विंचू दंशाच्या घटना कमी असतात . गोमांस,बकर्याचे मांस भक्षण करणे. वाळवंटात अन्नाचे दुर्भिक्ष्य असते. जे मिळेल ते अन्न ग्रहण करणे आवश्यक असे. म्हणूनच धर्माने मांस भक्षण करणे धर्माचरणाशी जोडले. डुक्कराचे मांस निषिद्ध कारण डुक्कर हा प्राणी प्रामुख्याने खरकटे मानवी आरोग्यास अपायकारक अन्न खाणारा. अनुयायांमध्ये रोगराई पसरून संख्या कमी होऊ नये म्हणून डुक्कराचे मांस निषिद्ध. जुम्मे के जुम्मे नहाना कारण वाळवंटात पाण्याचे दुर्भिक्ष्य,माणसांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुष्प्राप्य तिथे अंघोळ कुठे करणार ? म्हणून फक्त(साप्ताहिक सामुदायिक प्रार्थनेच्या)मशिदीतील नमाजा आधी स्वच्छ अंघोळ वगैरे करून नमाज पढने हे धर्माचरण ठरवले गेले. दाढी- महंमद आणि त्यांच्या अनुयायांना धर्म टिकविण्यासाठी आणि नंतर प्रसारार्थ अनेक लढाया खडतर प्रवास करावा लागला. वाळवंटात दिवसा अनेक वेळा सुमारे ५५-६० कि मी वेगाने वारे वाहतात,त्या वाऱ्या मध्ये वाळवंटातील वाळू मिसळली तर घोड्यावर व पायी प्रवास करणाऱ्या माणसाच्या चेहरा ओरबाडून काढू शकते. हे कमी करण्यासाठीच दाढी वाढविणे आणि डोक्यावर काहीतरी आच्छादन असणे हे धर्माचरणाशी जोडले गेले. खिल्ली उडविण्याचा हेतू नाही, पण मागे एका लेखात वाचले होते कि हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो. हे आक्रमक भारतात आल्यावर इतर ठिकाणी न मिळणारे स्वच्छ आणि मुबलक पाणी,(त्यामुळे मिळालेली अंघोळ) सुंदर हवामान यामुळे त्यांचा कट्टर पणा कमी झाला. आणि ते याच परिसरात स्थायिक झाले. हा दाखला अनेक जणांना पटणार नाही पण अनभव घेण्यासाठी दोन दिवस अंघोळ न करून बघा, आपल्या नकळतच आपण चीडचिडे बनतो.

In reply to by lakhu risbud

हिंदू शाकाहारी असतात म्हणे ! अगदी कट्टर ब्राह्मण वगळता बहुसंख्य हिंदू मिश्राहारीच आहेत. शाकाहारी ब्राह्मणांची संख्या एकूण हिंदुंच्या ३ % तरी आहे का ? अगदी रामायण महाभारतातही मांसाहाराचे उल्लेख आहेत. हिंदू गाय खात नाहीत व मुसलमान डुक्कर. पण इतर सर्व प्राणी दोघेही सारख्याच आवडीने खातात ! मग एक कट्टर व दुसरे अ-कट्टर कसे झाले म्हणे ?

100+

उगीच सारवा सारवी करू नका. काही फायदा नाही. बिकांनी तुम्हाला अगदी योग्य उत्तर दिलंच कि मग. मी काही बोललो का? पण त्यावर तुमची खालची प्रतिक्रिया बघा. यालाच मळमळ म्हणतात. तर्राट जोकर - Mon, 19/10/2015 - 00:35 तुमालाच कळलं बगा, नायतर बाकीचे बसलेत कुटत... जाउंदे. रोख फक्त इथे होता. : त्यांच्या धर्मातच तशी शिकवण आहे. आपल्या धर्मात तशी शिकवण नाही. एक चुकीची समजूत की हिंदू एवढे काय हिंस्त्र-वैगेरे नाहीत. जातीपातीतून घडणारे हत्यासत्र, धिंडी, इत्यादी बघितले तर हिंदूंही कट्टर-हिंस्त्रपणात मागे नाहीत हे समजून येतं. जर हिंदू धर्म एवढाच ग्रेट, शांतीप्रिय, सहिष्णु वैगेरे होता तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? शैव-वैष्णवांचे रक्तरंजित इतिहास कसे विसरले जातात? कि फक्त दुसर्‍या धर्माचे लोक मारले की तेव्हाच धर्म हा कट्टर-असहिष्णु-हिंस्त्र समजला जातो? मुद्दा होता की धर्मात असलेल्या शिकवणुकीने खरंच फरक पडतो का? माणुस कट्टर व हिंस्त्र व्हायला नक्की काय लागत असावं? धार्मिक शिकवणुकीने माणसे मारेकरी झाली असती तर काही हिंदू संघटना तोडीस तोड ब्रेनवॉशिंग करत आहेत, त्यांचेही रिझल्ट्स दिसले असते. जर तसे नसेल तर डीनएमधे लोचा असला पाहिजे. याला द्वेषाने आंधळे होणे असे म्हणतात. तुम्ही तर विचारवंत आहात तुमच्या कडून हे अपेक्षित नाही. कारण, मानवतावादाच्या कळकळीने संपृक्त झालेल्या विचारवंतांचा खरा चेहरा..... असा असतो तेव्हा काळजी घ्या. मुंबै स्पिरीट म्हणून जे मिरवल्या जाते तेही याच सहिष्णुपणाच्या पठडीतले. यावर तुम्ही काय उत्तर द्याल तेही माहित आहे. हिच ती बेगडी सेक्युलारांची संवेदनशीलता. पण तुम्ही सुधा असा विचार करावा? तुमची मुबैकारांकडून नक्की काय अपेक्षा होती साहेब ? लोकांच्या धैर्याला आणि सहनशीलतेला बुळेपणा आणि भेकडपणा असे संबोधून चिथावणी देणाऱ्या आणि वर मानवता आणि समतेवर चर्चा करून नक्राश्रू ढाळनार्या विचारवंतांनी आंबेडकरांचे नाव घेवून खराब करू नये असे तुम्हाला मनापासून वाटत नाही का? आज हे असले उसने आणि दुटप्पी विचार घेवून मानवतेवर गप्पा मारणाऱ्या बेगडी विचारवंत आणि सेक्युलर लोकांची फळी आपल्या समाजाच्या एकोपा आणि विकासासाठी कट्टरवाद्यांपेक्षाहि जास्ती घातक आहेत. कितीही कळवला दाखवला तरी त्यांचा खरा उद्देश वेगळाच असतो. शाहू फुले आंबेडकर अशी नावे घेवून त्यांना काय सध्या करायचे असते हे न समजण्या इतके लोक मूर्ख राहिले नाहीयेत आता. कधी कधी त्यांचा हा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणावा असे तुमच्या सारख्या सुशिक्षित आणि संवेदनशील अशा विचारी मनाला वाटत नाही का?

In reply to by दत्ता जोशी

मुंबैतल्या लोकांच्या बुळेपणा आणि भेकडपणाला धैर्य व सहनशीलता म्हणून त्यांच्यावर रोज गुदरणार्‍या भयानक प्रसंगांना दिव्यतेची झालर लावण्याचे महान कार्य मुरलेले हरामखोर राजकारणी करत असतात. लाखो मुंबैकरांना साध्या नागरी सुविधा मिळत नाहीत, जीवाची भीती मनात ठेवून प्रवास करावा लागतो. काही घटना झाल्या की दुसर्‍या दिवशी मोर्चा-आंदोलने करून आपल्या मागण्या-हक्क यासाठी लढा द्यायचे सोडून मुंबैकर हजेरीपटावर हजेरी लावायला पळतो का तर दिवसाचा पगार बुडू नये. "मला काय त्याचे?" ही भावना मुंबैकरांचे सेकंड नेचर आहे. अशा गुणांना धैर्य व सहनशीलता म्हणून गौरवणे राजकारण्यांना शोभते, तुमच्यासारख्या देशप्रेमी लोकांना नाही. जी परिस्थिती मन मारून मुटकून जगावी लागते त्या परिस्थितीत किंचीतसाही बदल घडवण्याची इच्छा नसणे हा बुळेपणा व भेकडपणा आहे. त्यात गौरवास्पद काहीही नाही. फुले-शाहु-आंबेडकर हा पुरोगामी-बहुजन आघाडीचा आवडता शब्दप्रयोग आहे. त्यांच्या विचारधारणेशी माझा काही संबंध नाही. मी आंबेडकरांचे नाव फक्त धर्मपरिवर्तनाच्या मुद्द्यासाठी घेतले. नसेल आवडले तर त्याऐवजी असे म्हणतो की "हिंदूं धर्माचा एक मोठा भाग असलेली दलित जनसंख्या अचानक धर्म सोडून जाते ह्याला काय कारण घडले असावे ह्यावर काय विचार केला आहे का?" आंबेडकरांनी मिशनर्‍यांसारखी आमिषे तर दाखवली नव्हती, किंवा मुस्लिमांसारखे अत्याचारही नव्हते केले मग काय कारण आहे की एवढी जनता हिंदूंपासून वेगळी झाली आणि त्यावर हिंदूंनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही? बाकी तुम्ही कोणावर काय शिक्के मारता ह्याच्याशी मला काय कर्तव्य नाही. अमुक एक विचार दिसला की हा अमक्या गटाचा अशी स्वमतांध वर्गवारी करणे सध्या फॅशन आहे. तुम्हाला आवडेल ते चष्मे घाला, आमची काहीच ना नाही.

विषय : मुहर्रम माहीती हवी. या विषयावर कोणीही कट्टरपणा वार बोलणं सुरु करण्याआधीचे TJ यांचे प्रतिसाद. १. मुहर्रम चा मातम बघितला तर तर्राट जोकर - Fri, 16/10/2015 - 13:34 मुहर्रम चा मातम बघितला तर कट्टरतेची शिकवण कशी मिळते हे सोदाहरण पटतं. २. ते तर आहेच. तर्राट जोकर - Fri, 16/10/2015 - 14:42 ते तर आहेच. धर्मासाठी रक्त कसं वाहायचं याची शिकवण नकळत्या वयापासून दिली जाते ते दिसलं म्हणून आपली टिप्पणी...! ३.. तुमालाच कळलं बगा, नायतर तर्राट जोकर - Mon, 19/10/2015 - 00:35 तुमालाच कळलं बगा, नायतर बाकीचे बसलेत कुटत... जाउंदे. रोख फक्त इथे होता. : त्यांच्या धर्मातच तशी शिकवण आहे. आपल्या धर्मात तशी शिकवण नाही. एक चुकीची समजूत की हिंदू एवढे काय हिंस्त्र-वैगेरे नाहीत. जातीपातीतून घडणारे हत्यासत्र, धिंडी, इत्यादी बघितले तर हिंदूंही कट्टर-हिंस्त्रपणात मागे नाहीत हे समजून येतं. जर हिंदू धर्म एवढाच ग्रेट, शांतीप्रिय, सहिष्णु वैगेरे होता तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? शैव-वैष्णवांचे रक्तरंजित इतिहास कसे विसरले जातात? कि फक्त दुसर्‍या धर्माचे लोक मारले की तेव्हाच धर्म हा कट्टर-असहिष्णु-हिंस्त्र समजला जातो? मुद्दा होता की धर्मात असलेल्या शिकवणुकीने खरंच फरक पडतो का? माणुस कट्टर व हिंस्त्र व्हायला नक्की काय लागत असावं? धार्मिक शिकवणुकीने माणसे मारेकरी झाली असती तर काही हिंदू संघटना तोडीस तोड ब्रेनवॉशिंग करत आहेत, त्यांचेही रिझल्ट्स दिसले असते. जर तसे नसेल तर डीनएमधे लोचा असला पाहिजे. ४. मिस्टर जोशी, तर्राट जोकर - Mon, 19/10/2015 - 16:40 मिस्टर जोशी, सिलेक्टीव रीडींग सोडाल तर बरं होइल. माझे बिका यांना असलेले दोन्ही प्रतिसाद वाचा. त्यात कुठे हिंदूधर्मावर निरर्थक टिप्पणी केली हे सांगू शकाल? . सुमारे ६००-७०० वर्षे मुस्लिमांची आक्रमणे होत रहिली, राज्य होत राहिली. काय करून घेतले हिंदूंनी. त्यांना जाग यायला ६०० वर्षे जावी लागले जेव्हा शिवाजीमहाराज प्रकट झाले. तत्पूर्वी काय चाललं होतं हे तुम्हास जास्त ठावूक कारण मुस्लिम अत्याचार कहान्या तुम्हास मुखोद्गत आहेत असं दिसतंय. तेव्हा हिंदूंनी काहीच कसं केलं नाही हा विचार कधीच आपल्या संस्कारी मनात येत नाही. पण मुस्लिमांनी कसे आमच्यावर अत्याचार केले ह्या टिप्पीकल सासु-सुना छाप रडगाणी कायम गात असता. तेव्हा हिंदू आपले कट्टर जातपातवाद, पंथ-वाद, धर्मप्रचार-वाद-विवादचर्चा यात मश्गूल होते, त्यांना परकिय आक्रमणांना तोंड द्यायला जमले नाही. हे कबूल का करत नाही? आक्रमकांनी सौजन्य दाखवावे अशी तर्कदुष्ट विचारसरणी नेहमीच मुस्लिम आक्रमकांबद्दल बोलतांना इथे दिसून येते. पण सौजन्य न दाखवणार्‍या आक्रमकांना इथून हाकलून लावायला हिंदूंना कुणी अडवले होते हे काय कोणी बोलत नाही. कुणीही येतो अन् हिंदूंवर राज्य करून जातो यात हिंदूंचा सहिष्णुपणा आहे की भेकड, अल्पसंतुष्टी वृत्ती आहे हे सांगावे. मुंबै स्पिरीट म्हणून जे मिरवल्या जाते तेही याच सहिष्णुपणाच्या पठडीतले. यावर तुम्ही काय उत्तर द्याल तेही माहित आहे. त्यामुळे उत्तर द्या, मग पुढे अजून बोलायचे आहेच. कशाला सारवा सारवी करता? वाचकांना जे कळायचे ते कळले. बाय द वे, मुंबईत जावून मुंबईकरांच्या बाबतील असलं काही असंवेदनशील बोलू नका. तुमच्यावर धागा लिहायची पाळी येईल. बाकी चालुदे. मला वेळ फुकट घालवणे खरच परवडत नाही.

In reply to by दत्ता जोशी

जाऊद्या हो. काय एवढं मनाला लावून घेताय. तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे ते. राग शांत झाला की धा-बारा महिन्यांनी परत हा धागा आणि प्रतिसाद वाचा मग बोलूया.... आणि हो... साहेब, मी मुंबैतच आहे गेल्या बारा वर्षापासून. जिथे तिथे हेच बोलतो. अजुनतरी जीवंत आहे कारण मुंबैकरांना खरंच वेळ नाही हो. अहो, सुधारणा करायला वेळ नाही, माझ्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ असेल. असला तरी मी खोटे बोलत नाही हे अस्सल मुंबैकरास पक्के ठावूक आहे. कधी मुंबैत येऊन विचारा. वेळ नसेल फुकट घालवायला तर 'पेज ३' चित्रपट बघून घ्या.....

कसला राग? हिंदू विद्वेषी जळजळ तुमच्याकडे आहे. हाच तुमचा खरा चेहरा आणि प्रतीक्रीयान्माग्च इण्टेन्शन आहे हे फक्त दाखवून दिलंय. बाकी काही नाही. जिथे तिथे नाही लपून लपून आणि ठराविक लोकांपुढे हेच बोलतो असा लिहा. ते जास्ती वास्तविक आहे.

In reply to by दत्ता जोशी

हिंदू विद्वेषी जळजळ. अभी तुमने देखाही क्या है भाई..? एवढ्यातच इतके मोठे शब्द वापरायला लागलेत. आधी हिंदू म्हणजे काय याची तुम्हास किती समज आहे ते बघुद्या. मग आमची 'जळजळ' हिंदू विद्वेषी की कशी ते बघू....

In reply to by तर्राट जोकर

हिंदू विद्वेषी जळजळ. अभी तुमने देखाही क्या है भाई पडद्यामागे बसून कळ फलक बडवणे म्हणजे विद्वत्ता किंवा गेला बाजार समाज सुधारणा असे समजणारे पैशाला पासरी आहेत आंजा वर. कोणत्याहि विषयाचा अभ्यास नाही, इतिहास ठो माहिती नाही, संस्कृती ठो माहिती नाही. वृत्तपत्रे वाचत नाही ( म्हणे) ती व्ही पाहत नाही ( म्हणे) वर उगीच घिसे पिटे आन्जावरील विचारवंतांच्या उसनवारीचे विषय घेऊन संदर्भहीन गुळण्या टाकायच्या आणि वर माझ्या टांगा वर असल्या प्रवृत्तीच्या विद्वत्तेला सलामच. वेगवेळ्या संस्थळांवर वेगवेगळे आय दि घेवून टंकत सुटायचे हा तुमच्या व्यवसायाचा भाग असू शकेल माझ्या नाही. तेव्हा पुढच्यावेळी तयारी करून या. मग उंटाच्या शेपटीचा मुका घेत येतो कि नाही ते कळेल. आणि हो. विषय काय बोलतोय काय आणि लिहितोय काय संदर्भ काय हे आधी बघा. मग उत्तरे द्यायची कि नाही ते ठरवू.

या मजेशीर व्हिडोमध्ये आत्ताच्या मिडल इस्ट क्रायसीसबद्द्ल छान माहिती आहे. Is this some kind of psychological terrorism where they try to confuse us to death!

ज्यांना रूची आहे त्यांनी Constitutional Struggles in the Muslim World हा कोर्सेरा वरचा कोर्स जरूर जॉइन करा, सध्या पब्लिक डिमांड मुळे दुसर्‍यांदा चालू आहे.

In reply to by तुडतुडी

पख्तुन प्रदेशात रहाणार्‍या लोकांचा पख्त असा उल्लेख आहे. हेच आजचे पठाण लोक. तेंव्हा ते मुसलमान नव्हते ( आणि कदाचित ते वैदिक हिंदुही नसावेत . अनेक अवैदिक जमातींचा उल्लेख वेदात सापडतो. त्यापैकीच एक पख्त ही एक जमात आहे. ) दाल पख्तुनी ही डिश प्रसिद्ध आहे.

अगदी कट्टर ब्राह्मण वगळता बहुसंख्य हिंदू मिश्राहारीच आहेत.
अभ्यास वाढवा .
हिंदू गाय खात नाहीत व मुसलमान डुक्कर.
इथेही अभ्यास वाढवा . हिंदूंना गाय पवित्र आहे . मुस्लिमांना डुक्कर निषिद्ध आहे . आंबेडकरांनी अनेकांना घेवून धर्मांतर केलं हा मुद्दा काही हिंदू विद्वेषी लावून धरत आहे . त्याला मुख्य कारण म्हणजे धर्मांतर करणार्यांना हिंदू देहदंडाची शिक्षा देत नाहीत . इस्लाम मध्ये इस्लाम विरोधात चुकून जरी काही बोललं, वागलं, धर्मांतर वगेरे केलं तर सरळ मुंडकी उडवली जातात . मुस्लिम धर्मांतर करत नाही म्हणजे तो फार आवडता धर्म आहे हा गैरसमज काढून टाकावा .इराण मध्ये आज इस्लाम बद्दल इस्लामीच वैतागलेले आहेत . पुढच्या काही कळत तिथे इस्लाम विरोधात क्रांती झाली तर आश्चर्य वाटायला नको . सगळ्या मुस्लिम कट्टर गोष्टी बंद करा . मग बघू किती लोक इस्लाम ला कवटाळून राहतात ते

In reply to by तुडतुडी

नुस्ता अभ्यासवाढवा अशी चोंबडी कमेंट टाकून पळून नका जाऊ. हिंदुंच्यात शाकाहारी किती टक्के व मांसाहारी किती टक्के . काही डेटा देउ शकाल का ? मांसाहार केला तरच प्राणी बलवान होतो असा नियम नाही. बैल , हत्ती असे प्राणी शाकाहारी असुनही बलवान आहेत.

In reply to by मोगा

काय मोगादिशू (मोदी. गाय. दिसली. शूट.).... कुणाला डेटाबिटा मागताय राव..? त्यांनी बोलले ना तेच परमसत्य..बाकी जग मिथ्या.... लक्षात असू द्या. तुमचे हजार आयडी उडतील. पण ह्यांच्या एकाही आयडीला धक्कासुद्धा लागलेला दिसत नाही.

अडाण** लोकांनी हिंदू धर्माचे नाव समर्थनाच्या नावाखाली फुकट बदनाम कसे केले याचे प्रत्यंतर या धाग्यावर अगदी नीटच आले.