कोकम माहिती
कोकण प्रदेश निसर्गाने समृध्द आहे. प्रत्येक ऋतूत विविध फळे, भाज्या, फुले मुबलक प्रमाणात होतात. परंतु सुरवातीला शिक्षणाच्या अभावामुळे किंवा आहे त्यात समाधान मानण्याच्या वृत्तीमुळे कोकणी माणसाने स्वत:च्या उपजिविकेसाठी निसर्गाचा फार वापर केला नाही. आता मात्र परिस्थिती बदलते आहे. उन्हाळ्यात येणार्या करवंद, जांभुळ, फणस, आंबा, काजू, कोकम यासारख्या विविध फळांपासून अनेक टिकाऊ पदार्थ मोठया प्रमाणावर बनवले जाऊ लागले आहेत. आधीच्या पिढीतील शेतकरी नैसर्गिकपणे उगवणार्या झाडांवरच अवलंबून होता. परंतु आता व्यावसायिकदृष्ट्या या फळ्झाडांची लागवड करून त्यापासून जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी कोकम या फळाची माहिती देताना कोकण कृषी विद्यापिठाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या माहितीचे संकलन केले आहे.
हे कोकमचे झाड.
कोकमाची फुले
लागवडः कोकम फळासाठी उष्ण दमट हवामान व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागते. कोकमाची लागवड पावसाच्या सुरवातीला करावी लागते. कोकमामध्ये रोपापसून लागवड केल्यास ५०% नर आणि ५०% मादी झाडे येतात. मादी झाडे जास्त येण्यासाठी त्याची कलमे लावणे आवश्यक आहे. लागवडीमध्ये ९०% मादी झाडे आणि १०% नर झाडे असावीत. कोकण कृषी विद्यापिठाने काही चांगल्या उत्पन्न देणार्या जाती विकसित केल्या आहेत. लागवड केल्यावर पहिली दोन वर्षे उन्हाळा व हिवाळयात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते.
कोकमची फळे: फोटो आंतरजालावरून साभार
कोकमाच्या फळापासून विविध प्रकारे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. कोकमाच्या फळाची आतून रचना अशी असते.
लेख लिहायला घेतला तेव्हा सिझन संपल्याने हे फोटो मिळू शकले नाहीत.
फोटो आंतरजालावरून साभार.
कोकम सोलं किंवा आमसुलं: आमसुलांसाठी ताजी, लाल तयार कोकम फळे घ्यावीत. फळांच्या साली आणि आतील गर वेगवेगळे करावे. गराचे वजन करून एक किलो गरासाठी १०० ग्रॅम मीठ घ्यावे. गरात हे मीठ पूर्ण विरघळवून गाळून घ्यावे. सालींचे तुकडे गाळलेल्या रसात रात्रभर बुडवून ठेवतात. सकाळी बाहेर काढून परडीवर निथळत ठेवतात. निथळून आलेला रस झाकून ठेवावा. रस निथळला की साली उन्हात वाळवाव्यात. ही प्रक्रिया सात दिवस केली जाते. यालाच कोकणात फुट देणे असे म्हणतात. सात फुटांची काळीभोर आमसुले कडक उन्हात वाळवून प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये भरली जातात. आमसुलाचे सार, चटणी केली जाते. भाजी आमटीतही त्यांचा वापर केला जातो. आमसुले दोन दोन वर्षे चांगली टिकतात.
कोकम तेलः विविध पदार्थ तयार करण्यासाठी गर वापरून झाल्यावर कोकमच्या बिया स्वच्छ केल्या जातात. कडक उन्हात वाळवल्या जातात. वाळवल्यानंतर त्यावरचे जाड आवरण काढून टाकतात. त्यानंतर या बिया दळणीयंत्रातून बारीक करून आणतात. उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ उकळवतात. पाणी चांगले उकळून गार झाले की तेल वर येऊन घट्ट होते. यातेलाचे गोळे बनवतात, वाळवतात. कोकम तेल सौंदर्य प्रसाधने, औषधे, साबण यासाठी वापरतात. थंडीत पायाला भेगा पडणे, ओठ फुटणे यावर कोकम तेल रामबाण उपाय आहे. कोकम तेल खाण्यासाठीही वापरतात.
कोकम सरबत(अमृत कोकम): कोकम सरबतासाठी तयार टणक कोकम फळे झाडावरून उतरवून काढली जातात. ही फळे स्वच्छ करून त्यातील गर, बिया बाजूला करून सालाचे ४/६ तुकडे केले जातात. एक किलो सालांसाठी दोन किलो साखर आणि ५० ग्रॅम मीठ असे प्रमाण घेतले जाते. सालांमध्ये साखर, मीठ एकत्र करून प्लॅस्टीकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ८ ते १० दिवस ठेवतात. अधुनमधुन हे मिश्रण हलवावे लागते. पूर्ण साखर विरघळल्यावर तयार झालेले अमृत कोकम प्लॅस्टीकच्या बाटलीत किंवा कॅनमध्ये पॅक केले जाते. सरबत करताना १:५ या प्रमाणात पाणी, थोडी जीरे पावडर आणि लागल्यास मीठ मिसळून ताजे सरबत कोणत्याही मोसमात तयार करता येते. कोकम सरबत पित्तशामक आहे.
कोकम आगळः कोकम आगळ तयार करण्यासाठीही पक्व टणक फळे झाडावरून उतरवून काढली जातात. फळे स्वच्छ धुवून गर, बिया वेगळ्या कराव्या लागतात. सालींचे तुकडे करावेत, साली आणि गर यांचे एकत्रीत वजन करून एक किलोसाठी १५० ते २०० ग्रॅम मीठ घ्यावे. साली आणि गराच्या मिश्रणात मीठ मिसळून चार दिवस झाकून ठेवावे. चार दिवसांनी मिश्रणातील रस गाळून बाटल्यामध्ये भरावा. कोकम आगळची सोलकढी बनवली जाते.
अशा अनेक गोष्टींसाठी उपयोगी असे हे गुणी फळ मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास नक्कीच फायदेशीर आहे. आपणही आपल्या घरासमोर अशोकाची झाडे लावून शोभा वाढवतो, त्याऐवजी कोकमची झाडे लावल्यास तीही सरळ वाढतात, आकर्षक दिसतात आणि उत्पन्नही देतात, बघा विचार करून!
लागवडः कोकम फळासाठी उष्ण दमट हवामान व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागते. कोकमाची लागवड पावसाच्या सुरवातीला करावी लागते. कोकमामध्ये रोपापसून लागवड केल्यास ५०% नर आणि ५०% मादी झाडे येतात. मादी झाडे जास्त येण्यासाठी त्याची कलमे लावणे आवश्यक आहे. लागवडीमध्ये ९०% मादी झाडे आणि १०% नर झाडे असावीत. कोकण कृषी विद्यापिठाने काही चांगल्या उत्पन्न देणार्या जाती विकसित केल्या आहेत. लागवड केल्यावर पहिली दोन वर्षे उन्हाळा व हिवाळयात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते.
कोकमची फळे: फोटो आंतरजालावरून साभार
कोकमाच्या फळापासून विविध प्रकारे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. कोकमाच्या फळाची आतून रचना अशी असते.
लेख लिहायला घेतला तेव्हा सिझन संपल्याने हे फोटो मिळू शकले नाहीत.
फोटो आंतरजालावरून साभार.
कोकम सोलं किंवा आमसुलं: आमसुलांसाठी ताजी, लाल तयार कोकम फळे घ्यावीत. फळांच्या साली आणि आतील गर वेगवेगळे करावे. गराचे वजन करून एक किलो गरासाठी १०० ग्रॅम मीठ घ्यावे. गरात हे मीठ पूर्ण विरघळवून गाळून घ्यावे. सालींचे तुकडे गाळलेल्या रसात रात्रभर बुडवून ठेवतात. सकाळी बाहेर काढून परडीवर निथळत ठेवतात. निथळून आलेला रस झाकून ठेवावा. रस निथळला की साली उन्हात वाळवाव्यात. ही प्रक्रिया सात दिवस केली जाते. यालाच कोकणात फुट देणे असे म्हणतात. सात फुटांची काळीभोर आमसुले कडक उन्हात वाळवून प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये भरली जातात. आमसुलाचे सार, चटणी केली जाते. भाजी आमटीतही त्यांचा वापर केला जातो. आमसुले दोन दोन वर्षे चांगली टिकतात.
कोकम सरबत(अमृत कोकम): कोकम सरबतासाठी तयार टणक कोकम फळे झाडावरून उतरवून काढली जातात. ही फळे स्वच्छ करून त्यातील गर, बिया बाजूला करून सालाचे ४/६ तुकडे केले जातात. एक किलो सालांसाठी दोन किलो साखर आणि ५० ग्रॅम मीठ असे प्रमाण घेतले जाते. सालांमध्ये साखर, मीठ एकत्र करून प्लॅस्टीकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ८ ते १० दिवस ठेवतात. अधुनमधुन हे मिश्रण हलवावे लागते. पूर्ण साखर विरघळल्यावर तयार झालेले अमृत कोकम प्लॅस्टीकच्या बाटलीत किंवा कॅनमध्ये पॅक केले जाते. सरबत करताना १:५ या प्रमाणात पाणी, थोडी जीरे पावडर आणि लागल्यास मीठ मिसळून ताजे सरबत कोणत्याही मोसमात तयार करता येते. कोकम सरबत पित्तशामक आहे.
वाचने
38610
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
उत्तम माहिती!
उत्तम माहिती दिलीस
फार छान माहिती,
कोकम सरबत फेवरेट आहे
माहितीपूर्ण लेखन. कोकमाची
छान माहिती. फळ एक, उपयोग अनेक
कोकमला इथे भिंड म्हणतात.आणि
In reply to कोकमला इथे भिंड म्हणतात.आणि by प्रीत-मोहर
लेख मस्तच हे लिहायचे राहूनच
माहितीपूर्ण लेख.मस्तच.
छान माहिती. कोकमच्या तेलाने
मस्त माहितीपुर्ण लेख.कोकम फूल
लहानपणच्या सुरेख आठवणीत नेऊन
मस्त माहितीपुर्ण लेख अनन्न्या
तुझ्यामुळे अशा कित्त्येक नवीन
सुरेख लेख.
माहितीपूर्ण लेख, छानच!
मस्त माहितीपुर्ण लेख
कोकम विषयी अगदी नवी माहिती
आईग्ग … आता परत असं शुध्द
खुप छान माहिती
वा, मस्त लेख. बालपणीच्या काही
नवी माहितीमिळ्म्ली .
रातांब्याची कोवळी पालवी खायला
छान माहिती
छान झालाय लेख. कोकम सरबत माझे
वावा..
उपयुक्त लेख...आवडला. फोटो
तुझ्यामुळे खूप नवं नवं कळतंय!
कोकम सरबत, सोलकढी म्हणजे जीव
अतिशय माहितीपूर्ण लेख आवडला !
उत्तम माहिती!
सर्वांचे आभार!
मस्त माहीती गं, आमसुलांचा
In reply to मस्त माहीती गं, आमसुलांचा by कविता१९७८
तु पुणे कट्ट्याला दिलेले कोकम
In reply to तु पुणे कट्ट्याला दिलेले कोकम by कविता१९७८
+१ छान माहिती एकदम..
सुरेख