हिशोब
पोटापाणयाची मोठी चिंता होती मला.पैशासाठी काय पडेल ते करणं भागच होत
त्यामुळं,त्यांचा तो प्रस्ताव मी ताबडतोप मान्य केला.आणि सरकारी दवाखान्याच्या
व्हरांड्यात टाकलेल्या अमरला आणलं मी ऊचलून घरात.एड्स पेशंटला कोण थारा देणार?
तो मी दिला.पैशाची चिंता करू नका ते बोलले,आणि 5000 रु. माझ्या हातावर ठेवले.
किती दिवसानी एव्हडी मोठी रक्कम मी पाहिली हाती.पण ती सर्व आपली नव्हे मी स्वताला बजावलं.
केवळ तिशी पस्तीशीचा अमर हाडाचा नुसता साफळा उरला होता.झिंज्या दाढी एव्हडी
वाढलेली,किती दिवसआंघोळ केली नव्हती कोण जाणे?
न्हयाव्याला बोलावला ,पूर्ण भादरून काढला,न्हवू घातला,झुळझुळीत कपडे अंगावर चढवले,.
लापशी, कणेर माझ्या हातानं भरवत असे मी त्याला.त्याचा प्रातिर्विधी पण मीच आटपायचो.अर्थात बायको आणि मुलगा पण साथ
देत होते त्यामुळं सगळं बर्यापैकि निभत होतं.त्याला आईस्क्रीम आवडायचं म्हणून मुलगा त्याला गाडीवरचं आईस्क्रीम द्यायचा.
सगळं सुरळित चाललं होतं,एका महिन्यात चांगलं दोन किलो वजन वाढलं त्याचं.
ऊठायचे तर नव्हतेच पण बोलायचेहि त्राण नव्हते त्याच्यात, सतत झोपूनच असे तो.जीवा गोळा करून कांही तरी
बोलायचा प्रयत्न करायचा तो,कर्नाटकात त्याची कांही प्राँपर्टी असल्याचं बोलला तो. सतत डोळ्यतून टीपं काढायचा,
स्वताला दोष द्यायचा.़मला वाचवा तुमच्यासाठी कांही तरी करीन म्हणायचा.पण दुसरा महिनाही कांहीं ऊलटला
नाही, आम्हाला कळून चुकलं त्याचं वाढलेलं वजन हे फसवं होतं.रक्ताची ऊलटी झाली एके िदवशी त्याला.
कळवलं त्याना.संध्याकाळी दोन मारुती दरात.चांगले 5/6जणं ऊतरले त्यातून, एक काळा कोटवाला, शिवाय एक
डॉक्टरहि त्यात असावा,कुठं कुुठं आंगठे घेतले त्यानी त्याच ेे[ सही तर तो करूच शकत नव्हता].
आणि आले तसे निघून गेल े ते.
पुढं कसेबसे आणखीन दोन दिवस गेले,मरणाला आडवी येणारी रात्र पण तिसरे दिवशी सरली नाही.
रात्री साडेतीनलाच, अमरत्वाला मरण आलं, माझ्या मांडीवर.
त्याना फोन केला. अंत्य विधी तुम्हीच ऊरका म्हणाले.
पुढं दोन दिवसानी दोघंच घरी आले.20 डिसें.ते 31जाने.,41 दिवस झाले म्हणाले,
महिना 4000च्या हिशोबानं5300 होतात, म्हणाले,माझ्या हातावर 300रू. टिकवले.हिशोब चुकता झाला म्हणाले.
अमरच्या अखेरच्या दिवसातल्या कांहीं आठवणी सांगाव्यात असा विचार होता,पण त्याना वेळच कुठं होता.
हिशोब चुकता करायला ते आले होेते ,आणि तो त्यानी केला होता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
सत्यकथा ?
होय
बापरे