मूलभूत गरजां पैकी शेवटची पण महत्त्वाची गरज म्हणजे निवारा. आदिमानवाच्या गुहेपासून ते आताच्या प्रचंड आलिशान घरांपर्यंत खरंतर घर म्हणन्यापेक्षा महाल, राजवाड़े किंवा आपल्या भाषेत 'पॅलेस' म्हणावं अशा अनेक इमारती निवारा याच सदरात येतात. निवाऱ्याबरोबरच आणखी काही गरजा भागवण्यासाठी करावं लागणारं तात्पुरतं बांधकाम ते त्याच गरजेचं आपल्या सत्ता, संपत्ति, सामर्थ्याच्या अभिव्यक्ती करता वापरल्या जाणाऱ्या दृश्य रुपाला कदाचित स्थापत्यकला मानलें जावं. मी कुणीतरी मोठा, लोकोत्तर म्हणून काहीतरी अचाट घडवेन या भावनेतून जगातली काही स्थापत्य शिल्पं बनली. काही संरक्षणाच्या दृष्टीनं, काही दिखावा म्हणून तर काही व्यापारासाठी, बरीच गरज म्हणून देखील घडली. चीनच्या भिंतीपासून अनेक गड़किल्ले, भव्य पुतळे, धरणं, कालवे, पूल, बोगदे याचीच प्रतिकं.
आता एवढ्या मोठ्या पातळीवर विचार न करता सध्याच्या स्थापत्याबाबत विचार करावा इतपत साधा प्रयत्न आहे. सहजसाध्य वाटल्यानं आणि भरघोस आर्थिक उत्पन्न मिळू शकल्यानं शिरलेल्या अपप्रवृत्तीनी भरपूर बदनाम झालेल्या या क्षेत्राकड़े योग्य प्रकारे पाहिल्यास एक समाधानाची भावना निश्चित दिसू शकेल.
वर सगळीकडं मी स्थापत्य कला म्हणतोय कारण त्यात मला कला दिसते जाणवते. अगदी साध्यातल्या साध्या इमारतीच्या उभारणीमध्ये देखील कला असते. सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा आपल्या घराच्या रचनेचा विचार केला तरी आपल्याला ते पटेल.
एक घर किंवा एक इमारत कशी बनते हे आता पाहू. काही इंग्रजी शब्द येतील ते सोपे करण्याचा प्रयत्न करेन. कुठल्याही इमारतीमध्ये सगळ्यात वरुन खालच्या आणि तिथून आणखी खालच्या बाजूला वजन (लोड) स्थानांतरीत होत असतं. यात सुद्धा लाईव्ह लोड म्हणजे व्यक्ति किंवा वस्तू ज्या एका जागेवरून दुसरीकडे हलू शकतात तर डेड लोड म्हणजे बांधकामाचं स्वत:चं वजन असे प्रकार असतात. स्वत:च्या वजनात लोखंड, खड़ी,वाळू,सिमेन्ट,विटा, टाईल्स यांच्या घनतेनुसार वजन गृहीत धरलं जातं. इमारतीचा आराखडा नि सांगाडा बनवताना याचा एका अधिकच्या संरक्षक आकड्यासहीत (सेफ्टी फैक्टर) विचार होतो. याबरोबर भूकंपामुळे येऊ शकणारे हादरे, उंच इमारतीमध्ये वाऱ्याचा दाब, पाणथळ किंवा दलदलीच्या जमिनीच्या जागी इमारतीच्या वजनामुळे वरुन आलेल्या वजनाला विरोध करणारा खालच्या बाजूनं येणारा दाब, मातीची क्षमता असे अनेक विषय इमारत बनवण्या आधी विचारात घ्यावे लागतात. हे सगळं व्यवस्थित विचारात घेऊन बनतो इमारतीचा सांगाडा. कुठेही भिंत घातली, कुठलाही खांब काढला किंवा कुठेही slab ला छिद्र पाडलं असं चालत नाही त्याबरोबरच कुठल्याही नाल्याशेजारी अथवा नदीशेजारी पाया रचून देखील.
वरील गोष्टीन्चा विचार करून इमारतीचा सांगाडा बनवणं हे निष्नात आणि अधिकृत व्यक्ति किंवा संस्थेकडून केलं जातं त्याला स्ट्रक्चरल इंजीनियर म्हणतात. मातीची आवश्यक क्षमता पारखण्याचं वेगळंच क्षेत्र स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये आहे त्याला सॉइल इंजीनियरिंग म्हणतात तर इमारत उभी राहताना नेमकी कशी उभी राहील हे आर्किटेक्ट पाहतो.
आर्किटेक्टच्या अचाट नि अतर्क्य स्वप्नाला स्ट्रक्चरल इंजिनीयरच्या ताकदवान सांगाड्यासहीत असेल त्या मातीच्या पायात उभा करतो तो कंत्राटदार/कॉंट्रॅक्टर.
लक्षावधी इमारती व्यवस्थित उभ्या असताना नि संपूर्ण मानवजातीचं रक्षण करताना आपण त्या उभ्या करण्यामागचे कष्ट सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत.
सध्या एवढंच. आवडलं तर पुढे लिहीन.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11630
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका नवीन विषयाच्या लेखाला
वा! आवडीचा विषय!!
मस्त विषय...
मस्त !! माझ्या आवडीच्या
@ कंजूस काका, मुवि, खटपट्या
वाचतोय.
मस्तंय विषय! बाकी हेच
In reply to वाचतोय. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
लोड बेयरिंग चा अर्थ जसं शब्द
In reply to मस्तंय विषय! बाकी हेच by मांत्रिक
भिंती छपराचं वजन तोलून
भोवऱ्या सारखा दिसणारा पण
In reply to भिंती छपराचं वजन तोलून by मांत्रिक
उपयुक्त माहिती
प्यारे साहेब
लिखो भैबा! हम पढ़ैबे कर रहैस!!
पुभाप्र.
उत्तम लिहिलंय. या विषयावर
उत्तम
होय.
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
वाचतो आहे, येऊ द्या पुढील भाग
प्यारेसर, आपके पास अणुभव का
सर-पण देऊ नका मालक.
In reply to प्यारेसर, आपके पास अणुभव का by तर्राट जोकर
आवडलं
सुरुवात आवडली
आवडला. अजून येवू द्या.
उत्तम :)
प्यारे धागा लेखक ? म्हंटलं
आर्किटेक्चर आणि सिव्हिल मधला
आर्किटेक्ट बायको उवाच...
In reply to आर्किटेक्चर आणि सिव्हिल मधला by कॅप्टन जॅक स्पॅरो
आर्किटेक्चर = झकास पोरी
In reply to आर्किटेक्चर आणि सिव्हिल मधला by कॅप्टन जॅक स्पॅरो
हां हां हां
In reply to आर्किटेक्चर = झकास पोरी by कैलासवासी सोन्याबापु
स्ट्रक्चरल इंजीनियरिंग ( संरचनात्मक अभियांत्रिकी )
फार मस्त आरोह
In reply to स्ट्रक्चरल इंजीनियरिंग ( संरचनात्मक अभियांत्रिकी ) by आरोह
पुभाप्र
खोलात माहिती नसताना नेहमी बर्
माझी मेडिकलची बॅकग्राउंड
वा आज दुग्धशर्करा योग जुळून आला आहे
फ़ार बाळबोध नको
मे बी तुमच्यासाठी स्पुन
In reply to फ़ार बाळबोध नको by दिवाकर कुलकर्णी
रच्याकने एक प्रश्ण आहे. समजा
फार चांगला प्रश्न आहे
In reply to रच्याकने एक प्रश्ण आहे. समजा by कॅप्टन जॅक स्पॅरो
याबरोबर तापमानात खूप जास्त
In reply to फार चांगला प्रश्न आहे by एक एकटा एकटाच
बरोबर
In reply to याबरोबर तापमानात खूप जास्त by प्यारे१
आमच्या यंत्रतोडीमधे आम्ही
In reply to याबरोबर तापमानात खूप जास्त by प्यारे१
मस्त लेख आहे. लिहीत सुटा आता
प्यारे भाय,
"किंवा कॅपिटल बिल्डिंग
वेळ काढून वाचण्यासाठी लेख
आवांतर..
फार आधीपासुन एक नतद्रष्ट जोक
In reply to आवांतर.. by 'पिंक' पॅंथर्न
सध्याच्या भाषेत आर्किटेक्ट
In reply to फार आधीपासुन एक नतद्रष्ट जोक by कॅप्टन जॅक स्पॅरो
चला म्हणजे पौराणीक भारतीय लोक
In reply to सध्याच्या भाषेत आर्किटेक्ट by प्यारे१
आर्किटेक्चर च्या आभासक्रमात
In reply to फार आधीपासुन एक नतद्रष्ट जोक by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्यात अजिबातच तथ्य नाही.
In reply to फार आधीपासुन एक नतद्रष्ट जोक by कॅप्टन जॅक स्पॅरो
वास्तुविशारद
In reply to आवांतर.. by 'पिंक' पॅंथर्न
माझा दादा आरकिटेक्ट आहे.
च्यामारी प्यारेलाल. हुशार
आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं
In reply to च्यामारी प्यारेलाल. हुशार by अभ्या..
सहमत :)
In reply to आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं by प्यारे१
आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं
In reply to आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं by प्यारे१
;)
In reply to आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं by बॅटमॅन
खूप हाणामारी झाली आता एकेक
नाहीतर मी लिहू का?
ऑलवेज वेलकम काकाश्री.
In reply to नाहीतर मी लिहू का? by कंजूस