✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असेही मार्केटिंग

आ
आशु जोग यांनी
Tue, 10/13/2015 - 10:27  ·  लेख
लेख
परवा काहीतरी विकणारा एक पोरगा दारावर आला. म्हणाला आमच्याकडे एक स्कीम आहे. अमुक इतके पैसे भरायचे. तुम्हाला हा प्लॅस्टिक जार मिळेल. तो तुम्ही फ्रीजमधेही ठेवू शकता आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमधेही ठेवू शकता. याचबरोबर पुढील २ वर्षे आमचा पेपरही मिळेल. त्याच्या रद्दीचेही पैसे तुम्हाला मिळतील. एकूण काय तुम्ही फायद्यात रहाल. सगळंच चक्रावून टाकणारं होतं... त्याला विचारलं नेमकी काय स्कीम आहे, काय विकतो आहेस. तेव्हा म्हणाला आम्ही एका दैनिकाचे प्रमोशन करतो आहे. मोठा प्रश्न पडला... पेपरचे प्रमोशन करणारा पोरगा "प्लॅस्टिकच्या जारचे कौतुक का करतो आणि जो पेपर आपण रोजच्या रोज वाचायला घेणार आहोत त्याच्या रद्दीच्या पैशाच्या गोष्टी का करतो" त्याला म्हटलं, "बाळा जरा समोर बस. मला सांग मला तूझ्या पेपरमधे इंटरेस्ट आहे,या प्लॅस्टिक जारमधे मला काडीचा इंटरेस्ट नाही. प्लॅस्टिक जार वगळून, तेवढे पैसे कमी करून पेपर विकण्याची काही स्कीम आहे का तेवढी मला सांग" तर म्हणाला, " असं विचारणारे तुम्ही पहिलेच. सगळ्यांनी प्लॅस्टिक जार पटापट घेतले" मग त्याला म्हटले, "तू अमुक एक पेपर विकतो आहेस. सध्या त्याचे संपादक कोण आहेत ?" तर म्हणाला," आमचा फक्त मार्केटींग डिपार्टमेंटशी संबंध येतो. संपादकीय विभागाशी नाही" जी वस्तू आपण विकतो आहे ती नेमकी काय आहे याची काडीचीही माहिती या मुलांना का नसते. मूळात चांगले ग्राहक बनल्याशिवाय चांगले मार्केटिंग करता येइल का...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
7114 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

लोकमत का?

आनंदराव
Tue, 10/13/2015 - 11:13 नवीन
लोकमत का?
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Tue, 10/13/2015 - 12:12 नवीन
होय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

बिल्डिंगला सिक्युरिटी नसली कि

जातवेद
Tue, 10/13/2015 - 11:17 नवीन
बिल्डिंगला सिक्युरिटी नसली कि गमतीशीर लोक भेटतात. वेळ छान जातो.
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 10/13/2015 - 11:40 नवीन
नविन गोष्ट प्रमोट करण्यासाठी हे सगळे करावे लागते रे आशू.एखादा नविन राजकारणी,पक्ष येतो जनतेत.. अर्थकारण्,समाजकारण,देश सुधारणार असे सांगून पण प्रत्य़क्षात धर्म्,खाण्याच्या पद्धती,ईतिहास उकरून काढणे.. असल्या गोष्टी करत बसतो.
  • Log in or register to post comments

ढम्म..

प्रदीप
Sat, 10/17/2015 - 18:08 नवीन
दणकून गाजावाजा करून लिव्हरपूलने नवा म्यॅनेजर आणला. त्यानंतरची त्यांची पहिली म्यॅच पहातोय, टोटेनहॅम बरोबरची. आता हाफ टाईम झाला, अजून एकही गोल नाही! कुठे गेला नव्या म्यॅनेजराचा परिणाम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

.

dadadarekar
Tue, 10/13/2015 - 11:51 नवीन
त्यात चुकीचे काय आहे ? वर्तमानवत्र विकणारा फक्त पाने किती किती पुरवण्या आहेत वगैरे माहिती देइइल. संपादक कोण आहे , त्याची मते नि:पक्षपाती असतात का वगैरे माहितीशी त्याचा संबंध नसतो.
  • Log in or register to post comments

दादुसशी सहमत

सौंदाळा
Tue, 10/13/2015 - 12:29 नवीन
दादुसशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

पेपरचे प्रमोशन करणारा पोरगा

असंका
Tue, 10/13/2015 - 15:41 नवीन
पेपरचे प्रमोशन करणारा पोरगा "प्लॅस्टिकच्या जारचे कौतुक का करतो आणि जो पेपर आपण रोजच्या रोज वाचायला घेणार आहोत त्याच्या रद्दीच्या पैशाच्या गोष्टी का करतो"
ठसका लागला हसून हसून!!!!
  • Log in or register to post comments

तो भैय्या ऐसा है....

तर्राट जोकर
Tue, 10/13/2015 - 16:04 नवीन
तो भैय्या ऐसा है.... पेपरवाल्यांचा धंदा गेले दोन-तीन वर्ष मस्तपैकी बसलेला आहे. ना सदस्य वाढत आहेत, ना रेव्हेन्यु वाढत आहे. आता माध्यमांच्या जगात सबस्क्रायबरसंख्या म्हणजे बंदा रुपया, ब्लॅण्क अँड बेअरर चेक. कुठल्या पेपरला किती ग्राहकसंख्या आहे त्यावरून त्याच्या जाहिरातीचे दर ठरतात. जाहिरातीचे दर वाढवायचे तर ग्राहकसंख्या वाढवायची, फुगवायची सरळ सरळ. ह्या क्लृप्त्या दहा वर्षांआधी वापरल्या जायच्या. आता जाहिरातदार हुशार झालेत. त्यांच्याकडे ऑथेंटीक नंबर्स असतात. थर्ड पार्टीने केलेया सर्वे नुसार आलेले आकडे खरे मानले जातात. आता झाली ना गोची वर्तमानपत्रांची. यावर उपाय काय...? सबस्क्रायबर बढाव... कागद पे नही.... कागद देके. म्हणजे लोकांच्या घरी जायचे, त्यांना पेपर मधे अजिबात इंटरेस्ट नसतो. तुमच्या घरी आधीच दोन तरी पेपर असतात. त्यात तिसर्‍याची गरज नसते. पण जवळ जवळ फुकट पडणारी वस्तू तर कुणी नको म्हणत नाही. मग काय जार दे, भांडी दे, लकी ड्रॉ कूपन दे, वाढदिवसाच्या जाहिरातीचे कूपन दे असले काय प्रकार करून पेपरवाले सबस्क्रायबर करून घेतातच. मुंबैत, मिरर टाइम्ससोबत फुकट, मटाही फुकट द्यायचे. पण जाहिरातदारास काय सांगणार ... आमचा खप बघा, एक लाखाचा ३ लाख झाला, द्या वाढीव दर. तिन्ही पेपर जातात एकाच घरी. पण सबस्क्रायबर तीन दिसतात कागदावर. मार्केटींग वाले एक वर्षाचा पेपर फुकटातच (रद्दी विकून जास्त पैसे मिळतील हो..) पडतोय असं आमीष दाखवतात. सबस्र्कायबर फुकटच्या पेपर वर जारही मिळाला ह्याच्या आनंदात पेपर्वाल्याचा ताळेबंदात एक वर्षासाठी एक वाढलेला आकडा म्हणून बंदीस्त होतो, तेवढ्यावरच थांबत नाही तर वर्षभर वेगवेगळे इव्हेंट आयोजित करत वर्तमानपत्र चालवणारे एक इवेंट कंपनी होउन बसले आहेत. कारण नुसतं कागदावर सबस्क्रायबर दाखवून भागत नाही तर ते प्रत्यक्षातही आहेत हेही दाखवायचे असते. राजकारणी लोकांचे जसे शक्तीप्रदर्शन असते तसे हे इवेंट्स वर्तमानपत्रांचं शक्तीप्रदर्शन. एक वर्तमानपत्र जे ५० वर्षांआधी व्रत होतं, प्योर धंदा झालाय. चौपाटीवरली भेळ झालीय, फिका, तेज, मीडीयम सब मिलेगा. सगळ्यांच्या दाढ्या कुरवाळून मिळतील, सगळ्यांच्या दुखर्‍या नसा झाकून मिळतील. वर्तमानपत्रवाले जाहिरात छापण्याचे व बातम्या न छापण्याचे चिक्कार पैसे उ़कळतात. काय करणार धंदा है भाय.. गंदा हुवा तो क्या हुवा...
  • Log in or register to post comments

बाब्बो, लै हानलाय.

बाबा योगिराज
Tue, 10/13/2015 - 16:34 नवीन
बाब्बो, लै हानलाय. एक वर्तमानपत्र जे ५० वर्षांआधी व्रत होतं, प्योर धंदा झालाय. चौपाटीवरली भेळ झालीय, फिका, तेज, मीडीयम सब मिलेगा. सगळ्यांच्या दाढ्या कुरवाळून मिळतील, सगळ्यांच्या दुखर्‍या नसा झाकून मिळतील. वर्तमानपत्रवाले जाहिरात छापण्याचे व बातम्या न छापण्याचे चिक्कार पैसे उ़कळतात. काय करणार धंदा है भाय.. गंदा हुवा तो क्या हुवा... ठ्ठो. हां हां हां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

जोकरसाहेब, एकच नंबर.

बॅटमॅन
Tue, 10/13/2015 - 18:01 नवीन
जोकरसाहेब, एकच नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

...

आशु जोग
Tue, 10/13/2015 - 18:38 नवीन
वर्तमानपत्र चालवणारे एक इवेंट कंपनी होउन बसले आहेत. हेही तुम्ही म्हटल्यावर लक्षात येऊ लागले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

एक वर्तमानपत्र जे ५०

बोका-ए-आझम
Tue, 10/13/2015 - 20:28 नवीन
एक वर्तमानपत्र जे ५० वर्षांआधी व्रत होतं, प्योर धंदा झालाय.
५० वर्षांपूर्वी म्हणजे १९६५ साली? नाही. वर्तमानपत्र हा धंदा त्याच्याही आधी झाला.खरं सांगायचं तर १५ आॅगस्ट १९४७ या दिवसापासून. त्याआधी ते व्रत होतं. नक्कीच. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर एक अत्यंत महत्वाचा हेतू संपुष्टात आला आणि त्यामुळे व्रत संपून धंद्याला सुरुवात झाली.
पेपरवाल्यांचा धंदा गेले दोन-तीन वर्ष मस्तपैकी बसलेला आहे. ना सदस्य वाढत आहेत, ना रेव्हेन्यु वाढत आहे
English पेपरवाल्यांना नक्कीच फटका बसलेला आहे पण भाषिक पेपर चालताहेत. टीव्ही आणि इंटरनेट यांची स्पर्धा असूनही चालताहेत कारण अजूनही सकाळच्या चहाबरोबर अॅपवर पेपर वाचण्याची सवय लोकांना लागलेली नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये वर्तमानपत्रांचा खप हा वाढतोय. भारतातील सर्वाधिक खपाची वर्तमानपत्रं ही भारतीय भाषांमध्ये आहेत - जागरण, भास्कर, अमर उजाला आणि मल्याला मनोरमा. (संदर्भ - राॅबिन जेफरीज - India's Newspaper Revolution)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अजून -

बोका-ए-आझम
Tue, 10/13/2015 - 20:35 नवीन
दिनकरण(तामिळ), ईनाडू(तेलगू), मातृभूमी (मल्याळम), आनंद बझार पत्रिका (बंगाली), राजस्थान पत्रिका (हिंदी). दुर्दैवाने या यादीत मराठी वर्तमानपत्रं खूप नंतर येतात. मराठी माणसाला बातम्या आणि त्यावर चर्चा करणं यात रस असला तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

त्यामुळे तुम्ही त्या पोराला

तर्राट जोकर
Tue, 10/13/2015 - 16:08 नवीन
त्यामुळे तुम्ही त्या पोराला संपादक कोण हा प्रश्न विचारला आहे तो त्याच्या दृष्टीने व मालकाच्याही दृष्टीने अतिशय क्षुद्र, बिनमहत्त्वाचा आहे. तुम्ही पेपर घेणार की नाही? हाच त्यांच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

कारण नुसतं कागदावर

अभ्या..
Tue, 10/13/2015 - 16:22 नवीन
कारण नुसतं कागदावर सबस्क्रायबर दाखवून भागत नाही तर ते प्रत्यक्षातही आहेत हेही दाखवायचे असते.कारण नुसतं कागदावर सबस्क्रायबर दाखवून भागत नाही तर ते प्रत्यक्षातही आहेत हेही दाखवायचे असते.
राईट बॉस. सर्क्युलेशनवर जाहीरातीचे दर डिपेंड असतात. दिव्य मराठीने ट्बबारड्या अन थर्मास देऊनच जम बसवला. अजूनही स्कीम असतात. लक्की कूपन, विक्रेत्यांना आमिषे. हे चालूच असते. सखीमंच, तनिष्का, म्धुरिमा अशा इव्हेंट्स मधून करोडोंचा बिझ्नेस होतो. तेथे तर पेन्ड्राईव्ह्ज, गिफ्ट हॅम्पर देतात. जाहिरातदारांना आयता डॅटाबेस अन होलसेल ग्राहक मिळतो. ते पण खुष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

व्रत नाही धंदा

गामा पैलवान
Tue, 10/13/2015 - 16:30 नवीन
आशु जोग, आज वृत्तपत्र चालवणे हे पत्रकारितेचे व्रत नसून धंदा झाला आहे. याबाबत एका अनुदिनीवरील हे विचार पटले : http://jivanmulya.blogspot.co.uk/2011/09/blog-post.html भांडवलदार नुकसान सोसून एका रुपयात सोळा पाने का देतात, हा प्रश्न विचारला पाहिजे. कारण त्यातून त्यांना वाचकांची दिशाभूल करायची असते. ही मार्गदर्शक पत्रकारिता नसून दिशाभूलीचा धंदा आहे. या धंद्याचं उद्दिष्ट बातम्या देणे वा त्यायोगे प्रबोधन करणे हे नसून वाचकांची दिशाभूल करणे हे आहे. यातून पुढे बदनामीची धमकी देऊन कोंडीत पकडायचे मार्ग उपलब्ध होतात. असा एकंदरीत कारभार चालतो. तुमचा अनुभव याचाच परिपाक आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

नुकसान सोसून

बोका-ए-आझम
Tue, 10/13/2015 - 20:11 नवीन
याच्याशी असहमत. नुकसान कुणाचंही होत नाही. पेपरमधल्या जाहिरातींनी हा तोटा भरून काढला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

एक करा

बिहाग
Tue, 10/13/2015 - 17:49 नवीन
कुठलाहि पेपर घ्या. त्यातला जाहिराती सोडून फक्त वाचायाचा मजकूर शोधा. २५% सुद्धा सापडत नाही यातच सगळे आले. एक अपवाद होता , THE HINDU
  • Log in or register to post comments

:)

जव्हेरगंज
Tue, 10/13/2015 - 18:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments

काही दिवसांपूर्वी हपीसच्या

आदूबाळ
Tue, 10/13/2015 - 21:12 नवीन
काही दिवसांपूर्वी हपीसच्या कामानिमित्त एका जगद्विख्यात दैनिकाच्या मालकाला भेटायचा योग आला होता. त्याने एका वाक्यात वृत्तपत्राचं बिझिनेस मॉडेल उलगडून सांगितलं: "कंटेंट मेक्स यू पॉप्युलर, अ‍ॅडव्हर्टायजिंग इज हाऊ यू मेक मनी". बरण्या वगैरे देऊन सर्क्युलेशन वाढवणं खुळचटपणा आहे. अगदी मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी म्हणूनही बावळट आहे.
  • Log in or register to post comments

बरण्या वगैरे देऊन सर्क्युलेशन

अभ्या..
Tue, 10/13/2015 - 21:40 नवीन
बरण्या वगैरे देऊन सर्क्युलेशन वाढवणं खुळचटपणा आहे. अगदी मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी म्हणूनही बावळट आहे.
कबूल. पण नोर्मली लोकानी घरात ऑल्रेडी येत असलेला पेपर बंद करुन दुसरा लावायला दुसरे एफेक्टिव्ह कारण सापडले नसावे. अजून बरीच कारणे येथील लोकल आहेत. सवडीने टायपतो. आता पळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

चांगला विषय.

एस
गुरुवार, 10/15/2015 - 00:43 नवीन
वर्तमानपत्र मार्केटिंग मध्ये अल्पसा अनुभव असल्याने प्रतिसाद देतो. एखादे वृत्तपत्र कोणी का वाचतो? तर ते वाचणं ही त्या व्यक्तीची सवय असते म्हणून. केवळ कंटेंट बदलूनही फारसा फरक पडत नाही. काही अगदी डबघाईला आलेली वृत्तपत्रे अजूनही तग धरून आहेत ती त्यांच्या अशा निष्ठावान वाचकांमुळे. एकच बातमी, एकाच वृत्तसंस्थेकडून आलेली असली तरी ती बातमी आपल्या आवडीच्याच वृत्तपत्रात वाचल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. मग भलेही ओळ न ओळ सारखी असो. तेव्हा वृत्तपत्र विकताना, विशेषतः नव्या वाचकाला आपलं वृत्तपत्र वाचायला लावताना त्या वाचकाला आपल्या वृत्तपत्राची सवय लागली पाहिजे. त्यासाठी सर्वात मोठा अडथळा हा त्याच्या आधीच्या वृत्तपत्राचाच असतो, कारण 'तुम्ही जो पेपर वाचताय त्यापेक्षा हे बघा, आमचा पेपर किती चांगला आहे! तो बंद करा आणि आमचा पेपर घ्या' असे कुणाला म्हणायला गेलात तर त्या वाचकाची अस्मिता दुखावून तुमचा अपमान व्हायचीच शक्यता जास्त असते. तेव्हा अशा छोट्यामोठ्या फुटकळ आमिषांचा मार्केटिंग करताना जास्त उपयोग होतो. त्या आमिषांचा उपयोग फक्त नवीन घरात शिरकाव करण्यासाठी होतो. वाचक दीर्घ कालावधीसाठी टिकवून ठेवण्यासाठी 'कंटेंट', 'स्टाईल' याबरोबरच चक्क जाहिराती कसल्या आहेत त्याचाही विचार करावा लागतो. उदा. काही प्रकारच्या जाहिरातींवर विशिष्ट वृत्तपत्रांचे वर्चस्व असते असे दिसून येईल. एक सेल्समन म्हणून आपण जे उत्पादन विकतोय त्याची तर सर्व माहिती आपल्याला असणे आवश्यक आहेच, परंतु प्रतिस्पर्धी उत्पादनांचीही सखोल माहिती असणे गरजेचे असते, त्याशिवाय आपले उत्पादन इतर उत्पादनांपेक्षा चांगले कसे हे आपण ग्राहकांना कधीच पटवून देऊ शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वृत्तपत्र वाचनाच्या सूत्राशी सहमत

गामा पैलवान
गुरुवार, 10/15/2015 - 01:49 नवीन
एस, तुम्ही केलेल्या विवेचानाशी सहमत आहे. मलाही रोज मटा, सकाळ आणि लोकसत्ता जालावर वाचल्याखेरीज चैन पडत नाही. अगदी हातात कागद असला तरी जालावर वाचायची मौज वेगळीच असते. सवयीचा परिणाम! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

...

आशु जोग
Sat, 10/17/2015 - 00:09 नवीन
एस खरे आहे तुमचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

...

आशु जोग
Mon, 10/19/2015 - 00:45 नवीन
माझ्या मित्राचा अनुभव आहे. तो कुठली तरी परीक्षा देत होता. दिवसभर अभ्यास केल्यावर संध्याकाळी निवांत असे. एका पेपरच्या प्रमोशनसाठी संध्याकाळी काम करू लागला. काही ठिकाणी फिरताना काही लोक त्याला खोपच्यात घेण्यासाठी म्हणून आत बोलावत. दारावर आलेला पोरगा त्याला काय माहीत असणार अशा समजूतीने आपले ज्ञान पाजळण्यासाठी त्याच्याशी चर्चा सुरु करीत आणि हाही विजय कुवळेकर, अरुण टिकेकर सगळ्यांची एक करीत असे. त्याच्या टिममधे तो सर्वाधिक ग्राहक जोडत असे. त्याने मला एकच गोष्ट सांगितली होती. इतर लोक नॉनस्टिक तवा विकायला जातात. हा मात्र चक्क पेपर विकायला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

...

आशु जोग
गुरुवार, 10/15/2015 - 00:16 नवीन
पेपर हे एक उदाहरण म्हणून दिले आहे. समजून उमजून केले तर अधिक यश येते.
  • Log in or register to post comments

छान विवेचन.

सौन्दर्य
गुरुवार, 10/15/2015 - 04:10 नवीन
चांगली माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments

आणि आपल्याला वाटते पेपरात आलय

palambar
Sat, 10/17/2015 - 00:38 नवीन
आणि आपल्याला वाटते पेपरात आलय म्हण्जे सगळ खरच असेल. किति हा भोळ्सट पणा .
  • Log in or register to post comments

नाल घोडा इ इ इ आठवले.

शिव कन्या
Sat, 10/17/2015 - 17:37 नवीन
नाल घोडा इ इ इ आठवले.
  • Log in or register to post comments

विपुकाले

आशु जोग
Fri, 04/29/2016 - 09:48 नवीन
परवा रस्त्यात एकाने गाठले म्हणाला आमचे मेम्बर व्हा. दर महिन्याला हवी ती पुस्तके मिळवा आणि वाचा वगैरे, वगैरे. बोलता बोलता त्याने विपुकाले यांचे विपुर्वाई असा उल्लेख केला. त्याला विचारले असता म्हणाला यातले एकही पुस्तक त्याने वाचलेले नाही. विपुकाले वगैरे कोणीही त्याला माहीत नाही. पुन्हा तोच प्रश्न पडला. हे मार्केटिंग करणारे फक्त भारवाही असतात का... आपण जे विकतोय त्या प्रॉडक्टची नीट माहिती घेण्याची त्यांना गरज का वाटत नाही.
  • Log in or register to post comments

विपुकाले कोन?

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 17:39 नवीन
विपुकाले कोन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

...

आशु जोग
Sat, 04/30/2016 - 20:14 नवीन
तर्राट जोकर अहो जो विपुकाले आणि विपुर्वाई असे शब्द उच्चारतो त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत. आपण जे विकतो त्याची पूर्ण नाही पण किमान माहितीही या लोकांना नसते हेच दु:ख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा