Skip to main content

(माझी) जाssssssssssssssssssड बाईल

लेखक दमामि यांनी बुधवार, 14/10/2015 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना खास प्रचेतस साठी, झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव आता जाई चरावयासी हाटेलात हा जीव रोज रोजची पुरी भाजी खाऊन झाली जाssssssssssssssssssssssssssssssssssड जुनाSSssट पोलकं मनगटी अटकी त्याला धरुनी फाड मस्कापावचे ढीग आणति कितीते वेटर भाऊ बटरवाली पाव भाजी ?तरी किती मी खाऊ!!!? श्रिखंडाचा क्षणात फडशा .. शेवयाची अन् खीर कंबर परी लवचिक इतुकी..शिट्ट्या मारिती पोरं ना हे अन्न , जणू परब्रम्ह, जरी म्हणा जाsssssssssssssssssssड बाईलं जीभ चालते म्हणता म्हणता जिरून ते जाईल चला सख्यांनो मिटती डोळे दिवस आजचा बंद!!! थकले मी या पुरी-पाठांना मूळव्याधीचा छंद! झाले आता वंगण भरुनी कविताहि लिहून झाली ह्यांची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
लेखनविषय:

वाचने 4673
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

प्रचेतस राव, तुमच्यासाठी खास कशी ही कविता काही कळले नाही ब्वा. काही रेफरन्स आहे का विषेष? डूआयडी विषयी वगैरे?

In reply to by प्रचेतस

खव उचकणार नाही. तरीपण असो. छानच ग. मस्तच ग. कसे जमते तुला. हे प्रतिसाद देऊन ठेवतो तूर्तास.

सांगारचा प्रयत्न करतो, "प्रिय पतीची पाठ ठोकून ठोकून बायलीचा इवलुसा जीव दमून गेलेला आहे आणि ती हादडायला जात आहे