Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by एकजटा अघोरी on Mon, 10/12/2015 - 18:34
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अवघ्या ४ वर्षांची दिया आणि तिची आई वीणा कोर्टातून बाहेर पडल्या. वीणा थोडी धुसफुस करत होती, दियाला जवळजवळ खेचतच चालत होती. दुरुन तिचे वडील दुस-याच कुठल्यातरी स्त्रीबरोबर जाताना दियाला दिसत होते. तिच्या बालबुद्धीला याचं काही आकलन होत नव्हतं. अलिकडे पप्पा मम्मी सारखे भांडताहेत याची तिला जाणीव झालेली होती. पण हे सगळं काय असतं याचं मात्र तिला कोडं पडलेलं होतं. तिच्या वडिलांनी तिच्या आईला हाताने तीनची खूण केली. दर तिस-या रविवारी तिचे वडील तिची भेट घेऊन तिच्याबरोबर वेळ घालवू शकणार होते, याची ती खूण होती. कोर्टानेच तसं निकालात नमूद केलेलं होतं. दियाच्या आईचा नुसता संताप संताप झाला ते बघून. दियाला जोराने खेचतच तिने कॉर्नरवर जाऊन रिक्षाला हात केला. रिक्षा थांबल्यावर वीणाने दियाला जवळजवळ कोंबलंच आत. दिया अजूनही वडिलांच्याकडे बघायचा प्रयत्न करीत होती. पण वीणाने पुन्हा पुन्हा “पप्पा बॅड आहेत.” असं सांगितल्यावर मग ती “हो, त्यांच्याशी बोलायचं नाही.” म्हणून गप्प बसली. एव्हाना रिक्षा आनंदनगरच्या त्यांच्या प्रशस्त आरामशीर फ्लॅटकडे मार्गस्थ झाली. पण वीणाचं मन मात्र विचारांत भरकटलेलं होतं. कॉलेजमधलं सोनेरी प्रेमप्रकरण, घरच्यांचा विरोध पत्करुन लग्न करणे, दियाचं उशिरा झालेलं आगमन, तिच्या वडिलांचं बाहेरख्यालीपण, रोजचे वादविवाद, भांडणं! तिच्या हृदयात परत एक कळ उमटली. डोळ्यात आलेला एक चुकार अश्रू वा-याच्या फडफडीबरोबर कुठेतरी उडून गेला. रिक्षावाल्याने निर्विकार आवाजात “आपका घर आ गया.” अशी वर्दी दिली. कधी कधी अशा दुःखाच्या क्षणी ही अशी साधी माणसं देखील किती सुखी वाटतात नाही? यांना खरंच असेल का कुठलं दुःख? की सगळ्यांचं आयुष्य सारखंच असतं? भाडं देऊन ती खाली उतरली. दिया तेवढ्यात पाय-या चढून लिफ्टपाशी पोहोचली पण होती आणि जोरजोरात बटण दाबत होती. घर्र..घर्र.. आवाज करत लिफ्ट खाली येत होतं. आतला दिवा बंद पडला असावा बहुतेक. काळागुडुप्प अंधार. वॉचमनला एक खणखणीत हाक मारुन याचा जाब विचरावा असं तिला वाटलं. पण ‘जाऊ दे! आपल्याला इथं राहणं परवडणार नाहीये आता’ हा विचार करुन तिनं आवंढा गिळला. *** किती मानात राहिली होती ती इथं. पण गेल्या वर्ष दोन वर्षांत सगळ्याच्या अगदी चिंध्या उडाल्या होत्या. तिची चूक नाहीये हे सगळ्यांनाच पटत होतं. पण ती दिसली की लगेच दोन माना एकमेकांजवळ येऊन कुजबुजु लागत. कदाचित तिच्या नव-याच्या रंगेल गोष्टीच सांगत असाव्यात. तिच्याविषयी काय सांगून सांगून सांगणार? तिचं आयुष्य ती प्रामाणिकपणे जगत होती. एका चाकोरीत आयुष्य बंदिस्त करायला तिला फार आवडत असे. याच्या उलट त्याचा स्वभाव. अगदी खुशालचेंडू. पाण्यासारखा पैसा उडवणारा. एकेका रात्रीत महिन्याभराचा पगार उडवत असे तो. उसने मागायला आणि कर्जं घ्यायला एका पायावर तयार. इथपर्यंत ती त्याच्याशी केवळ भांडत होती. पण जेव्हा प्रकरण गुलाबी वळणं घेऊ लागलं, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्र-मैत्रिणी ‘सावध’चे इषारे देऊ लागले. पण सगळं काही हातातून सुटून गेलं होतं. एके रात्रि अगदी निर्लज्जपणे त्याने ‘ति’ला बेधुंद अवस्थेत घरी आणलं. त्या रात्री वीणा हमसून हमसून रडली. दिया शेजारी निवांत झोपलेली. तिला या सर्वाचा काहीच अर्थ कळत नव्हता. ती रात्र तिनं तळमळत घालवली. दुस-या दिवशी त्याने कोरडेपणाने वीणाला सांगितले, “मी हे घर सोडून जातोय. मला दुसरं आयुष्य सुरु करायचंय. कोर्टात भेटूच. तुझी काही अपेक्षा आहे का सांग माझ्याकडून?” वीणा कडाडली “अरे हलकट माणसा, माझ्या मुलीला सांभाळायला मी खंबीर आहे. तुझा दमडाही नकोय मला. आत्ताच्या आत्ता चालता हो बाहेर ती घाण घेऊन.” अपमानाच्या जाणीवेने त्याचा चेहरा वेडावाकडा झाला, पण तो क्षणभरच! लगेच चेहरा कठोर करुन तो आणि ‘ती’ बाहेर पडले. *** घराचं लॉक उघडून दोघी आत आल्या. दारातच लाईटचं बिल पडलेलं होतं. इथून बाहेर पडण्यापूर्वी सगळी सारवासारव करावी लागेल, याची वीणाच्या मनाने नोंद घेतली. घराच्या भिंती का कुणास ठाऊक आज फारच उदासवाण्या दिसत होत्या. वातावरणातच एक प्रकारची मरगळ होती. हातपाय धुऊन तिनं दियाला कार्टून चॅनल लावून दिलं आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली. डाळ-तांदूळ धुऊन कुकरला लावला नसेल तेवढयातच मोबाईलची रिंग वाजली. थोड्याश्या नाराजीनेच तिनं फोन उचलला. “हॅलो?” “नमस्कार वीणा मॅडम. मी चव्हाण बोलतोय. काल तुम्ही आमच्या सुप्रीम इस्टेट एजन्सीत आलेला होतात ना चौकशीला? हां, तर तुम्हाला परवडेल असा एक अगदी स्वस्त फ्लॅट आहे. तुम्ही जिथं नोकरी करता त्या शांती नगर पासून चालत अगदी वीस मिनिटांवरच आहे. जवळच एक उत्तम नर्सरी स्कूल देखील आहे. मुलीची सोय झाली जवळच्या जवळ. बाकी फ्लॅट तर तुम्हांला नक्कीच आवडेल. १०,००० रु. भाडं सांगताहेत. पण तोडपाणी होईल. कधी येताय बघायला? आत्ता येताय?” “नको! आता अंधार पडू लागलाय. उद्या शार्प ९.१५ ला येते तुमच्या ऑफिसात. तेव्हां असाल नं तुम्ही? याहून जास्त उशीर मला परवडणार नाही. मला परत ऑफिस गाठायचं आहे.” “हो, नक्कीच मॅडम. मी वेळ चुकवणार नाही. तुम्ही या बरोबर ९.१५ ला.” “ठीक आहे. धन्यवाद.” मनातला आनंद कष्टानंच दाबत वीणा कोरडेपणाने उद्गारली. ब-याचशा गोष्टी जुळून आलेल्या होत्या तिच्या मनासारख्या. भाडं पण ठीक आहे. त्यात इकडं-तिकडं होईल थोडंसं. अगदी खुशीत येऊन ती दियाजवळ गेली. प्रेमानं तिच्या डोक्यावर थोपटू लागली. टी.व्ही.वर छोटा भीम चेटकिणीला मारत होता. दिया अगदी खळखळून हसत होती. आत कुकरच्या शिट्ट्या वाजत होत्या. (क्रमशः) ***
  • Log in or register to post comments
  • 11821 views
  • टेडी (भाग-२)
  • टेडी (भाग-3)

Book traversal links for टेडी-१ (भयकथा)

  • टेडी (भाग-२) ›

प्रतिक्रिया

Submitted by एक एकटा एकटाच on Mon, 10/12/2015 - 18:47

Permalink

सुरुवात मस्त झालीय

सुरुवात मस्त झालीय
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Mon, 10/12/2015 - 19:40

Permalink

सर्वपित्रीचा मुहूर्त साधलात

सर्वपित्रीचा मुहूर्त साधलात काय???
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Mon, 10/12/2015 - 20:06

Permalink

मस्तं सुरूवात. वाचतेय.

मस्तं सुरूवात. वाचतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by इन कम on Mon, 10/12/2015 - 21:27

Permalink

इंटरेस्टिंग कथा…भयरस

इंटरेस्टिंग कथा…भयरस
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Mon, 10/12/2015 - 21:39

Permalink

वाचतेय.

वाचतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 10/12/2015 - 23:39

Permalink

वाचतोय.

पुभाप्र. ता.क. - आयडी लय भारी हाय. असल्या आयडीच्या लेखकाने प्रेमकविता लिहिली तरी लोक्सना भीती वाटेल. (ह.घ्या)
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Tue, 10/13/2015 - 19:02

In reply to वाचतोय. by बोका-ए-आझम

Permalink

हां हां हां

हां हां हां
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 10/31/2015 - 13:34

In reply to वाचतोय. by बोका-ए-आझम

Permalink

ख्या ख्या ख्या....भुतं

ख्या ख्या ख्या....भुतं रोमान्स करत नैत असं म्हणायचय का बोकोबा तुम्हाला =))
  • Log in or register to post comments

Submitted by अभय म्हात्रे on Tue, 10/13/2015 - 07:16

Permalink

मस्त लिखाण.

खुपच छाण लिहिले आहात पुढिल भाग लवकर येईल हि अपेकशा
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 10/13/2015 - 09:38

Permalink

वाचतेय.पुभाप्र

वाचतेय.पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 10/13/2015 - 09:46

Permalink

सुरवात छाने. पुभाप्र

सुरवात छाने. पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Tue, 10/13/2015 - 13:41

Permalink

इंटरेष्टिंग..

पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Tue, 10/13/2015 - 14:52

Permalink

सुरवात छान . पुभाप्र . बर्याच

सुरवात छान . पुभाप्र . बर्याच दिवसांनी भयकथा आली .
रे हलकट माणसा, माझ्या मुलीला सांभाळायला मी खंबीर आहे. तुझा दमडाही नकोय मला.
का म्हणून ? चांगला पैसा उक्लायचा त्याच्याकडून. अश्या हलकट माणसांना शिक्षा करताना इमोशनल होवून नसता अभिमान दाखवायचा नसतो . कारण तिच्या जन्माला तो सुधा जबाबदार आहे आणि त्याने जबाबदारी घेतलीच पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/13/2015 - 19:39

Permalink

चांगली सुरुवात

यातून भयकथा काय असेल याबद्दल उत्सुकता आहे. ती छोटी आणि तिच्या आईला अजून त्रास होणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by एकजटा अघोरी on गुरुवार, 10/15/2015 - 20:46

In reply to चांगली सुरुवात by पैसा

Permalink

हं! प्रश्न बरोबर आहे. पण

हं! प्रश्न बरोबर आहे. पण भयकथेचे नायक नायिका व्हायचे म्हणजे त्रास तर ठरलेलाच! पण मी हाॅलीवूड स्टाईल लिहित नाही. माझ्या कथेत मानवी प्रयत्न जिंकतातच! हाॅलीवूडची भुते काहीही करा, परत परत उठत राहतातच! मला तरी ते पटत नाही. मी मानवी प्रयत्न व ईश्वरी शक्ती श्रेष्ठ मानतो! आणि ती असतातच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रश्नलंका on Tue, 10/13/2015 - 20:11

Permalink

चांगली सुरुवात. पुभाप्र

चांगली सुरुवात. पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Wed, 10/14/2015 - 08:43

Permalink

सुरवात आवडली.

सुरवात आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Wed, 10/14/2015 - 09:14

Permalink

भयकथा आवडतातच.

तरी अजून भय वाटेल असे काही आढळले नाही, पुढे येईल ही आशा आणि अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Wed, 10/14/2015 - 10:06

Permalink

सुरवात मस्त..

वाचतोय...
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Sat, 10/31/2015 - 13:20

Permalink

पुढचा भाग कधी?

पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/02/2015 - 18:13

Permalink

अरेच्चा हे वाचायचे राहिले

अरेच्चा हे वाचायचे राहिले होते की
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com