नुकताच छी_ _ हा धागा वाचनात आला. सर्वांनी अगदी पोटतीडकीने प्रतिसाद दिले आणि आपापले अनुभव ऐकवले. पण कधी कधी चुकीचे घडतंय हे माहीत असूनही पुरुष बोटचेपी भुमीका घेतात हे पाहण्यात आले आहे. असाच मला आलेला एक अनुभव मी येथे देत आहे.
१९९८ साली मी एका ८/९ माणसे असलेल्या कंपनीत कामाला होतो. मेडीकल प्रेझेंटेशन आणि जाहीराती मधे लागणारे अॅनिमेशन बनवणारी ही कंपनी होती. मोठमोठ्या औषधाच्या कंपन्या आमच्या क्लायंट होत्या. मार्केटींग साठी दोन लोक होते आणि बाकी सहा जण ऑफीसमधे बसून अॅनिमेशनचे काम करत असत. ज्या दोन व्यक्ती मार्केटींगसाठी होत्या त्या क्लायंटकडे जाउन काम समजून घेणे, बनवलेले काम दाखवणे/प्रेझेंट करणे, झालेल्या कामाचे पैसे आणणे/पाठपुरावा करणे ही कामे करत असत. मी अॅनिमेशन क्षेत्रात जायचे असे ठरवून तेथे उमेदवारी करत होतो. ज्या दोन मार्केटींगसाठी व्यक्ती होत्या त्यात एक मुलगी होती.
बर्याच वेळेला क्लायंट्बरोबर ज्या मीटींग असत त्या दुपारी सुरु होउन संध्याकाळी उशीरापर्यंत चालत. त्या मीटींगला मार्केटींगवाली मुलगी जायला टाळाटाळ करत असे. टाळाटाळीचे कारण विचारता तीने सांगीतले की बर्याच वेळेला एकट्यादुकट्या माणसाबरोबर मीटींग असते जी उशीरापर्यंत चालते त्यामुळे तीला असुरक्षीत वाटते. यावर उपाय म्हणून संध्याकाळच्या मीटींगला बॉसने मला तीच्या बरोबर जायला सांगीतले. जेव्हा जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी तीच्याबरोबर जात असे. जेव्हा मला काम असे तेव्हा मी स्पष्ट नाही म्हणून सांगत असे.
एकदा मी काही कारणास्तव रजेवर असताना, तीला नाईलाजास्तव एक संध्याकाळची मीटींग अटेंड करावी लागली. क्लायंट साईडच्या माणसाने ही संधी साधून तीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ती तीथून पळाली आणि खाली येउन मला माझ्या घरी फोन केला आणि झाला प्रकार सांगीतला. मी तीच्या घरी जाउन तीला धीर दीला आणि आपण उद्या हे बॉसच्या कानावर घालू असे सांगून तीथून निघालो. निघतना तिच्या आईने विनाकारण मला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला.(ज्याकडे मी संपूर्ण दुर्लक्ष केले)
दुसर्या दीवशी ऑफीस मधे आम्ही झाला प्रकार बॉसच्या कानावर घातला आणि क्लायंटवर कारवाइ करण्यास सांगीतले. यावर बॉसने जे भाष्य केले ते ऐकून मी सर्द झालो. बॉस तीला म्हणाला की "तू जर बस मधून प्रवास करत असतीस आणि तुझा कोणी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याविरुद्ध तू कोणाकडे दाद मागीतली असतीस?"
त्या मुलीने क्लायंट आहे म्हणून काहीही न बोलता तीथून पळ काढला, क्लायंट्ला कानफाडात नाही मारली. हे तीने बरोबर केले की वाईट केले मला समजेना. बॉस म्हणू लागला की "मी क्लायंट्ला काहीच बोलू शकत नाही कारण आपला ७०% बिजनेस त्याच्याकडून येतो. जर हा क्लायंट गेला तर तुमच्या पगाराचे वांधे होतील." मी ज्युनीअर असुनसुध्दा म्हणालो की, "सर, ज्या माणसाने अतीप्रसंग करायचा प्रयत्न केला तो कीतीही मोठ्या पदावर असला तरी आपण त्याची एचारकडे तक्रार करू शकतो." त्यावर बॉसने मला यात लक्ष न घालण्याबद्दल बजावले.
माझा आणि त्या मुलीला काय करावे कळेना. नुसते संतापण्याशिवाय आम्ही काही करु शकत नव्हतो. शेवटी ती मुलगी बॉसला म्हणाली, "सर, जर माझ्या ठीकाणी तुमची बायको असती आणि तीच्याबरोबर असे झाले असते तर तुम्ही काय केले असते?" यावर बॉस निरुत्तर झाला पण काहीही न बोलता बाहेर निघून गेला.
संपूर्ण विचारांती एकूण चार जणांनी तो जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही घेतलेला निर्णय बरोबर होता की नाही ते तुम्हीच सांगा.
वर्गीकरण
वाचने
8944
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
घृणास्पद अनुभव
विषण्ण अनुभव
जॉब सोडण्याचे निश्चितच कौतुक
बॉसचा ७०% बिजनेस त्या
मुळात असं काही होऊ शकतं हेच
In reply to बॉसचा ७०% बिजनेस त्या by तर्राट जोकर
जी गोष्ट घडल्याचे चारचौघात
काळजी नको. जॉब काय, एक सोडला
बायकांनी खूप खबरदारी घेणे
कजलीगड
In reply to बायकांनी खूप खबरदारी घेणे by फुलथ्रॉटल जिनियस
सर्व प्रतिसादकांचे आभार.
भयानक प्रकार.
झाला प्रकार बॉसला
In reply to भयानक प्रकार. by पद्मावति
तुम्ही तुमच्या वतीने अगदी
In reply to झाला प्रकार बॉसला by खटपट्या
@ खटपट्या,
In reply to तुम्ही तुमच्या वतीने अगदी by पद्मावति
जबाबदारी घ्यावी तर पूर्ण (...
In reply to झाला प्रकार बॉसला by खटपट्या
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद
In reply to जबाबदारी घ्यावी तर पूर्ण (... by असंका
घाबरल्यामुळं वगैरे
असे प्रसंग सिध्द करणे मुश्कील
तिने एकटीने मीटिंगला जाणे
अत्यंत वाईट!
तुम्ही घेतलेला निर्णय पटला
तुमचा निर्णय पटलाच.चतुरंग
च्यामारी, सगळे बाॅस खलनायकच असतात काय?
काळे कपडे घालून एक बुरखा
क्लायंटची मान १८० अंशात काडकन
In reply to काळे कपडे घालून एक बुरखा by काळा पहाड
चाणक्य नीतीने काम करायला
बरोबर आहे
In reply to चाणक्य नीतीने काम करायला by पाटीलअमित
त्या मुली बाबत तीची कणव येते,
अशा माणसांचे पब्लिक शेमिंग
सिद्ध करणे फार कठीण काम.
परत एकदा सर्व प्रतिसादकांचे
त्या मुलीने हे करायला हवे
असं का...?
घटना घडण्याआधी काळजी घेणे
In reply to असं का...? by तर्राट जोकर
पोलिसांना त्या क्लायंटशी
In reply to असं का...? by तर्राट जोकर
थोड़े विषय सोडून होईल का
:(
सर्व प्रतिसादकांचे पुन्हा
मिपावर कोणी " द गर्ल विथ द
होय.
In reply to मिपावर कोणी " द गर्ल विथ द by प्रसाद गोडबोले
पाहिला नसेल असे व्हील का...!
In reply to मिपावर कोणी " द गर्ल विथ द by प्रसाद गोडबोले
ओहो !!
In reply to पाहिला नसेल असे व्हील का...! by द-बाहुबली
तुमचे हार्दिक अभिनंदन!!!!