तिथे थांबतोय
जिथे थांबायचं न्हवत
ठरवलं होत
मागे वळून पहायचं न्हवत
ती अंधार खोली
पुन्हा उघडतोय
मोडलेल्या फडताळात
स्वताला शोधतोय
सोफ्यावरली धूळ झटकून
बसून क्षणभर डोळे मिटलेयत
क्षणभरातच त्यांनीसुद्धा
चुकांची चलचित्र पाहिलेयत
जगाच्या वेगासोबत धावताना
मागे खूप काही राहून गेलय
कृत्रिम आनंदाच्या हट्टापाई
निरागस हसण विसरून गेलोय
चव यशाची मिळवायला
आजवर फक्त स्पर्धा केलीय
दिखाउपणाच्या गर्दीसाठी
आपल्यांची आहुती दिलीय
आशा आहे तिरीप येईल
उजेडाची अंधारात
खांद्यावरती हात ठेऊन
कुणी दावील त्यातून वाट
अजूनही त्या अंधारात
एकाकी पडलोय
राहायचं आत्ता पुन्हा तिथे
जिथे मी घडलोय
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2829
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
वा!
छान कविता!
आवडली!
मस्त!
मस्त!
आवडली!
आवडली!
सुरेखच! जरा यमकाचा गोंधळ
सुरेखच! जरा यमकाचा गोंधळ झालाय एक दोन कडव्यात. पुढल्या वेळी तेही बघा.
परंतु कवितेतील भाव सुरेख रित्या पोचलाय. उत्तम !
मस्त!!
मस्त!!
चांगलीय
चांगलीय
मस्त
एकदम भारी कविता
धन्यवाद
धन्यवाद......
छान... :)
छान... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र
मस्त
मस्त जमलीय कविता