अमेरिकेत आलेले बहुतेक विद्यार्थी (९५%) हे अपार्टमेंट शेअर करुन राहतात. (काय करतात बिच्चारे; धीरुभाईंचा लाल अथवा तत्सम एखादाच असतो.)
त्यामधे बर्याच गोष्टी या परस्पर सामंजस्याने कराव्या लागतात (उदा. बाथरूम वर राज्य करण्याच्या वेळा, एकमे़कांच्या झोपेच्या वेळा सांभाळणे वगैरे वगैरे). यामधे महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण करण्याच्या वेळांची वाटणी.
पण कितीही सोयीस्कर वेळांची वाटणी केली तरी काही जणांना नेमक्या वेळी काम निघते (बर्याच वेळी आळस येतो) तर काही बिचार्यांच्या हातात गुणच नसतो. अशा वेळी शंभरातील नव्याण्णव वेळा केली जाणारी ही पाककृती.
पाककृतीचे नाव :- आमटी कम भाजी
साहित्यः -कांदा, कोणताही मसाला (अगदी गरम मसाला, चिकन मसाला ते चंकी चाट मसाला सुद्धा), आलं लसूण पेस्ट (नसल्यास हरकत नाही), टोमॅटो प्युरी, डबाबंद कडधान्ये (अत्यावश्यक: जर साधी कडधान्ये असतील तर उकडण्यात निम्मा वेळ जातो), मीठ, तिखट
कृती:-
प्रथम जेवणार्या तोंडांच्या संख्येनुसार २-३ मोठे कांदे (हव्या त्या आकारात) चिरुन घ्यावेत.
कढईत अंदाजे तेल घालावे (अंदाज चुकल्यास काळजी नसावी.)
(आपल्या) उपलब्ध वेळेनुसार कांदा परतून घ्यावा. (तांबूस, काळा, इ. रंगांची चिंता करु नये.)
फळीवरुन जो मसाला पहिल्यांदा हाती लागेल तो तसाच भसकन ओतावा.
त्यावर चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकावी. (नसल्यास उत्तम; वेळ वाचतो)
भरपूर ग्रेव्ही करायची आहे या उद्देशाने टोमॅटो प्युरी टाकावी.
२ मिनिटे मिश्रण हलवल्या सारखे करावे.
२-३ कॅन्ड बीन्स (छोले, राजमा अथवा चवळी) त्यात रिकामे करावे.
त्यात भरपूर* पाणी घालून १० मिनिटे उकळू द्यावे.
चवीपुरते (पुन्हा एकदा: आपल्या हातून पडेल तितके) मीठ घालावे.
*टीपः - भाजी कम आमटी रात्री केल्यास दुसर्या दिवशी दुपार पर्यंत राहील येवढे पाणी घालावे.
अवांतरः -
१. मीठ जास्त झाल्यास भात करावा; व्यवस्थित पडले तर मित्राना टॉर्टिआ भाजून घेण्यास सांगावे.
२. कॅन्ड बीन्स नसल्यास/बीन्स खाउन बोअर झालेल्या रुममेटस नी बोंब मारल्यास फ्लॉवर वापरावा व फ्लॉवरचे तुकडे वेळेची उपलब्धता अथवा आलेला कंटाळा यांच्या समप्रमाणात करावेत.
ज्यांना संजीव कपूर चे अनुयायी असणारे रुममेट्स मिळाले असतील ते भाग्यवान; पण लॉटरी फार कमी जणांनाच लागते ना!! बाकी ९०% जणांच्या नशीबी हीच भाजी (स्वतः केलेली अथवा दुसर्याने )आठवड्यातून ६ दिवस असते.
(आजच राजम्याची आमटी कम भाजी खाल्लेला)
खालिद
आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील
वाचने
7628
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह वाह,
+१
In reply to वाह वाह, by सखाराम_गटणे™
>>काही झाले
In reply to +१ by अवलिया
ओढाताण
In reply to >>काही झाले by सखाराम_गटणे™
>>दुसर्याच
In reply to ओढाताण by शेखर
झकास
आमच्याकडे
जिंकलस मित्रा...तोडलस...पार चेंदामेंदा केलास
In reply to आमच्याकडे by टारझन
यू गॉट इव्हन बेटर
In reply to जिंकलस मित्रा...तोडलस...पार चेंदामेंदा केलास by खालिद
बाथरूम वर
घरगुती डबे पुरवता का हो तुम्ही ??
खालिदभाई,
ह्म्म्म्म
हो.
In reply to ह्म्म्म्म by अनामिक
ष्टाईल आवडली मित्रा
खालिदराव
ट्रेड सिक्रेटस
In reply to खालिदराव by घाटावरचे भट
फरसबीच्या
खालीद
मस्त रे
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सूचना!!
आवडलेला पदार्थ