जाहीराती पाहुन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
जाहीराती मग त्या दुरदर्शच्या विवीध चॅनलवरच्या असोत की छापील विभागातल्या, मला सहसा भुरळ पडत नाही. काही वेळा ह्या जाहीराती त्या मुळ उत्पादकाचा उद्देश काय असावा किंवा ग्राहकांनी काय घ्यावा याबाबत अनेक पर्याय सुचवुन जातात.
१) समजा तुमच्या कडे पिढीजात संपत्ती आहे किंवा आत्ताच मिळाली आहे अश्या वेळी माणसाची झोप उडते याचे कारण बँकेत ठेवलेल्या संपत्ती शिवाय घरात दागिने/रोख रकमा किंवा किमती मौल्यवान वस्तु माणुस ठेवतोच. अश्या वेळी चोरी होईल की काय किंवा दरोडा पडेल की काय अश्या कारणांमुळे झोप उडत असेल तर एक पर्याय आहे.
दोन -चार जोड्या अमुल माचो च्या खरेदी करा आणि आरामात झोपा. चोर आलाच तर त्याचाच फोन हिसकाऊन त्याच्याच आईला फोन करण्याची हिंमत तुमच्यात नक्की येईल. अगदी आरामात.
२) समजा तुम्हाला डान्सर व्हायचय. उपाय सोपा आहे. दोन -चार जोड्या अमुल माचो च्या खरेदी करा मग पहा तुम्हाला कसा उत्तम डान्स करता येतो. मग डान्स इंडिया डान्स असो की नच बलिये तुम्हीच जाणार अंतिम फेरीत.
टीप. इथे महिलांना असेच प्रश्न असतील तर त्यांनी काय परिधान करावे असे विचारु नये कारण उत्पादकांनी हे प्रश्न फक्त आणि फक्त पुरुषांनाच पडतात असे गृहीत धरले असावे.
३) समजा आपल्याला मुलांची लग्ने कुंडली पाहुनच जुळवायची आहेत अश्या वेळी जर कुंडली जुळत नसेल तर आधी मोहिनी चहाचा कप असली कामे करणारे मंडळींच्या पुढे करावा.
४) देश बदल रहा है कारण चहा उकळत आहे हे टाटा चहाचे अनुमान सोशल रिसर्च करणार्या सर्व संस्था बंद करुन वेगवेगळ्या ब्रँडच्या चहाच्या उकळण्याने आणखी काही निष्कर्श निघतात की काय हे पहाण्यास हरकत नाही.
वाचकांच्या मनात असे अजुनही काही विचार जाहिराती पाहुन येतात का ?
प्रतिक्रिया
असे लेख रोज पाडावेत असा विचार
५ स्टार ची ती बँक लुटणाऱ्या
भकवास ,
साडेसाती कधी संपणार?
मिपा प्रगल्भ होत आहे...
आयडीया ईंटरनेटच्या अॅड ही
सध्याची
:) मजेशीर आहे!!! लाईट एकदम!!!
जग जाहिरातींचे आणि दिखावूपणाचे. .
हम्म. वाईल्ड स्टोनच्या ना?
ह्म्म्म... वाईल्ड स्टोन..
एका शितपेय नामक द्रवपदार्थाची
इथे तुम्हाला या जाहिराती आठवल्या
जहिरातींबद्दल लोक खळखळ का
कॅडबरी..
जुन्या जाहिराती अनवट वाटतात
कुछ स्वाद है जिंदगीमें.....
अतिरेका मुळे जाहिरातिंचा विट