लोकांना आपल्याच वागण्यातली विसंगती कळते का कधी..? दोन अॅक्टीवास्वार, एक युवती व एक म्हातारे काका वीसफुटी रस्त्याचा डावा अर्धा भाग आवरून गप्पा हाणित उभे.. मी सरळ त्येंच्या अंगावर फोर-वीलर घातली. बाकी रस्ता मोकळा असूनही वळसा घातला नाही. ते हटेपर्यंत शांतपणे कार त्यांच्यासमोर उभी ठेवली. त्यांच्या आरामाच्या गप्पांमधे खंड पाडल्याने माझ्या कडे भयंकर क्रुद्ध नजरेने पाहत होते. जणू मीच मोठ्या गाडीची मस्ती दाखवत होतो. हे आपल्या भारताचे सुशिक्षित सुसंस्कृत मध्यमवर्गीय नागरिक, जे जाता-येता 'इस देश का कुच नै हो सकता' आळवत असतात, दुसरे कसे चुकीचे वागतात यावर धीर-गंभीर चर्चा झाडत असतात. रस्त्यातच उभे राहून 'लोक कसे ट्रॅफीकचे नियम पाळत नाहीत' असल्या चर्चा हिरिरीने करत असतील....
असे अनेक आठवतात. रस्त्यावर पिचकार्या घालणारे सिग्नल तोडणार्याला शिव्या घालतात. गाडीला कट मारणारे हॉर्न वाजवणार्याला शिव्या घालतात. फोनवर बोलत ड्रायविंग करणारे अचानक रस्ता क्रॉस करणार्याला शिव्या घालतात. अचानक रस्ता क्रॉस करणारे कचरा टाकणार्याला शिव्या घालतात. कचरा टाकणारे भरधाव गाड्या हाकणार्यांना शिव्या घालतात. भरधाव गाड्या हाकणारे ट्रॅफिक जॅमला शिव्या घालतात. आणी असंच बरंच....
तुम्हाला अजून काही आठवतं का...? किंवा आपणच असं कधी विसंगत वागतो असं जाणवतं का...?
आजवर दुसर्यांकडे बोट दाखवणे केलंय. आज आपल्या स्वतःकडे बघणार का?
वर्गीकरण
वाचने
5435
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला विषय आहे. मांडणी योग्य
दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान ...
बिलकुल सही ।
मस्तं विषय. छान मंडलाय.
मस्तं विषय. छान मांडलाय.
हिपोक्रसी इझ इन्सेपरेबल पार्ट
छान विषय!लिहावे तितके कमी!
टोल
नाव बदल श्यान्या, धागा झोपलाय
तुला रं का काळजी...? झोपू दे
In reply to नाव बदल श्यान्या, धागा झोपलाय by भैड्या
शनिवारी रात्री एशियाडने