Skip to main content

छि _ _

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 10/10/2015 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
छि _ ल, पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता. मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून युपी-बिहारी वाटत होते, त्यातील एकाने भरपूर घेतली होती (सुवास पसरला होता), त्याला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, त्याचं विमान टेक-ऑफ करून ढगांपल्याड पोचलेलं सहज कळत होतं. हे लोक सरळ लेडिज जवळ येऊन रेलू लागले, अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय, आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती. तिथल्या एका मुलीने गोडीत त्यांना पुरूषांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले, तेवढयापुरतं सरकल्यासारखं करून पुन्हा त्यांनी तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. तो पायलट यात आघाडीवर होता. इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा त्याला समज देत होते तर तो त्यांनाच बुढ्ढा क्या बक रहा है इ. अचकट विचकट शेरे मारायला लागला. अशावेळेस स्त्रिया जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरचा चिडून काय करेल, बोलेल याचा नेम नसतो, त्यामुळे मी दुर्लक्ष करत होते, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभी राहिले होते. कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं सरळमार्गी मत. त्या मुलीलाही मी समजावत होते की सांगून सुधारणार्‍यांपैकी ते लोक नाहीत, उगीच नादी लागू नको, पण तीही हट्टाला पेटली होती. बोलता बोलताच तिने ओढणी पूर्ण चेहर्‍याला घट्ट बांधून घेतली होती, माझाही स्कार्फ होताच.( साध्याशा स्कार्फ मुळेही काहीवेळेस किती आश्वासक, सुरक्षित वाटतं ते अशा चेहर्‍यावर स्कार्फ, स्टोल इ. बांधणार्‍या मुलींना नावं ठेवणार्‍यांना कसं कळावं.) तो अजून बरळतच होता, खुदको मिस इंडिया समझती है, ये कोई लडकी है क्या.. काहीही फुटकळ कमेंट्स चालू होते. तीही चिडून त्याला धडा शिकवायच्या इराद्याने काही-बाही सुनावत होती. तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेला तो शिवी देऊन मोकळा झाला.. छि _ ल, सा _ !! ................ ................ त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता. मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी.. त्यानंतर मात्र सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कंडक्टरला त्या तिघांना खाली उतरवण्यास भाग पाडले, एवढा वेळ मजा बघणार्‍या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, एकदाची बस पुढे निघाली. ती मुलगी शेजारील मुलीला तिने अशा किती लोकांना कसं सरळ केलं त्याचे किस्से सांगू लागली होती. माझ्या कानात मात्र राहून राहून ती शिवी घुमत होती, अंगावर अ‍ॅसिड ओतल्यावर कसं वाटत असेल तसं काहीसं ते शब्द कानावर पडल्यावर वाटलं होतं.. याआधी फक्त चित्रपट, पुस्तके, टिव्ही इ.वर ऐकलेलं एवढया जवळून प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव पहिलाच. इतकी वाईट शिवी देण्यामागे तसंच काही कारण असावं तर तेही नव्हतं.. कोणासाठी होती ती शिवी ? त्याला विरोध करणार्‍या त्या मुलीसाठी, माझ्यासाठी, बसमधील इतर महिलांसाठी ? पूर्ण स्त्रीजाती साठीच कदाचित.. काय नव्हतं त्या शिवीमध्ये ? राग, तिरस्कार, विखार, वासना ? सगळंच, त्याशिवायही अजून काही.. त्याच्यात आणि बाकी लोकांत असणार्‍या सामाजिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक सर्वच बाबतीतील विषमतेमुळे आलेले, वर्षानुवर्षे साठलेले कुठले कुठले गंड त्या एका शिवीतून बाहेर पडले होते. त्या क्षणी मनात चमकून गेलं ते १६ डिसे, निर्भया प्रकरण. त्या घटनेनंतर, एक व्यक्ति दुसर्‍या व्यक्तिशी इतकं निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या कसं वागू शकते हा प्रश्न कायम पडायचा, त्याचं उत्तर थोडंफार मिळाल्यासारखं वाटलं. दोन्ही घटनांमध्ये इतर काहीही समान नाही, फक्त एकच - मनोवृत्ती. वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती टिपीकल पुरूषी मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं, मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये, जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये.. एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता. अर्थात हे सरसकटीकरण नाही. समाजातील काही ठराविक वर्गांतील ठराविक लोकांचीच अशी मनोवृत्ती असेल. त्यावेळी मला अशा समाजात राहणार्‍या स्त्रियांसाठी वाईट वाटत होतं ज्यांच्यासाठी या आणि याहून वाईट शिव्या ऐकणे रोजचेच असेल, नेहमीच्याच शिव्या आणि मारहाणीने ज्यांच्या संवेदना बधीर झाल्या असतील. त्याचवेळी या विचाराने हायसं वाटत होतं की सुदैवाने आपला जन्म एका सुशिक्षित, सुसंस्कृत परिवारात झालाय, आपण अशा समाजात वावरतो जिथे साधारणपणे अशी प्रवृत्ती लांबपर्यंत दिसून येत नाही, जिथे आपल्याला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आहे. जिथे आपल्याला बर्‍यापैकी सन्मान मिळतो, कमी लेखलं जात नाही, जिथे पुरूष स्त्रियांबद्दल टोकाचे वाईट विचार करत नाहीत, जिथे सामान्यतः नवरे-बायकांना, मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहिणींना, पुरूष स्त्रियांना रिस्पेक्ट देतात,शिव्या नाही. म्हटलं तर ही एक किरकोळ घटना, पण डोक्यात खूप सारे विचार, त्रास, मनस्ताप देऊन गेली. अर्थात हा काही एकमेव प्रसंग नाही, असे अनेक नकोसे अनुभव येतच असतात, फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही तो एक स्त्री असल्याबद्दलचा पश्चात्ताप एका क्षणापुरतं का होईना, जाणवून गेला.. इतकंच..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31410
प्रतिक्रिया 225

प्रतिक्रिया

In reply to by हेमंत लाटकर

छेड छाड झाल्यावर बस पोलिस ठाण्यात न्यायची ठरवली तर प्रत्येक बस तिथेच न्यावी लागेल . आजकाल गर्दीत कुठही जायला भीतीच वाटते मला , सतत स्वतःला वाचवत राहायचं फालतू लोकांच्या स्पर्शांपासून आणि चुकून कोणी धक्का मारला गर्दीचा फायदा घेऊन तर दुर्लक्ष करायचं ( चुकून कसले मुद्दामच करतात ) ह्या हतबलतेचा खूप संताप येतो ,भयंकर राग येतो मला स्वतःचाच तिथल्या तिथे थोबाड फोडायची इच्छा असते असल्या लोकांच ,पण सगळा राग गिळायचा आणि दुर्लक्ष करायचं

अश्या वेळी शौर्य दाखवणं खरंच कठिण असतं. शिवाय ते तिघे होते. आणि अख्खी बस म्हणजे एक गपगुमान पुरुष. मदतीला येण्याची काहीच शाश्वती नाही. आणखी काही घाणेरड्या शिव्या दिल्या असत्या तर झालेल्या अपमानाने आणि शरमेने पाणी पाणी झालं असतं. तरीही बघे लोक धावून आले असते याची खात्री नाहीच. वादावादीत कंडक्टरने बस थांबवली तर उशीर होतोय म्हणून त्यालाच शिव्या मिळतात. निर्णय घेणं अवघड. कित्येकदा रस्त्यावरच्या भाजीबाजारात भाजीवाले बायकांना पाहून भाज्यांच्या आकारावरून (वांगी, गाजर वगैरे) भयानक शेरे मारतात. मुलींच्या बाजूने बोलायला गेलं की शेजारचे भय्ये 'छोड दो ना, इनके मुंह नही लगनेका. आप दुसरी जगह भाजी ले लो' अशी वर साळसूदपणे आपली भलाई करतात. शिवाय तो नालायक माणूस 'तुम्हारी कौन लगती है वह' असं विचारायलाही कमी करत नाही. कधी बदलणार हे सारं? लेख आवडला हेवेसांनलगे.

त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा(सूज्ञ) तुम्हाला पाठिंबा मिळतो.पण तुम्ही महिला गप्प राहिलात तर आजूबाजूचेही गप्पच राहतील.

मी कॉलेज ला असतांना असा प्रसंग घडला. बस मधून स्टेशन ला निघाले होते, सकाळची गर्दी असल्याने मी लेडीज सीट जवळ उभी होते. माझ्यामागे एक मध्यम वयाचा एक माणूस येउन उभा राहिला. जेव्हा ब्रेक लागायचा तेव्हा तो मुद्दाम जोरात धक्का द्यायचा.त्याला प्रतिकार करण्यात मी कमी पडत होते.(खूप बारीक होते)मी त्याला बाजूला व्हायला सांगितलं तर थंड नजरेने बघितल… मला खूप त्रास झाला.एवढ्यात स्टेशन आलं… मी पटकन उतरायचं ठरवल.बस वळणावर स्लो झाली. ह्या वळणावर सगळे उतरतात. माझ्यापुढे तो माणूस होता. माझ डोक तापल होत,तो उतरणार तेव्हा त्याला जोरात मागून मी धक्का दिला.तो फुटपाथ वर आपटला. पुढे मी उतरले.

थोड हिंस्त्र वाटेल पण.. हातात जे मिळेल त्याने ठोकुन काढायच. आपण पहिला पवित्रा घेतला की बाकीचे लगेच मागे येतात.

In reply to by जेपी

जे पी साहेब आपण पहिला पवित्रा घेतला की बाकीचे लगेच मागे येतात. या बद्दल असहमत. बर्याच वेळेस मी एखादा माणूस स्त्रीला छेडत असेल तर आवाज चढवला आहे. दोन तीन वेळेस त्यःच्या कानाखाली आवाजही काढलेला आहे. परंतु गर्दीतील एखादा पुरुष पुढे येत असेल तर त्याच्या बायकोने, "अहो तुम्ही कशाला लफड्यात पडताय" म्हणून त्याचा पाय ओढण्याची उदाहरणे बरीच पाहिली आहेत. शिवाय प्रत्यक्ष काही कृती करण्याची वेळ आली तर ज्या स्त्रीसाठी पुढे व्हावे ती स्वतः तेथून गायब झालेली आढळली.( यात बर्याचदा तिची अगतिकता हि दिसून आली)जोवर लष्करात होतो तोवर पोलिसांच्या लफड्यात पडणे सोपे होते तुमच्या मागे अक्ख्या सरकारी यंत्रणेचा आधार असतो. परंतु निवृत्त झाल्यावर हा आधार नाही हे लक्षात आले आणि आता अशा उदाहरणा नंतर पुढे जावे कि नाही या बद्दल संदिग्धता येते. एके काळी मी फार गरम डोक्याचा होतो पण आता मी पण थंडावलो ( निर्ढावलो) आहे. मूळ प्रश्न सुटलेला नसून अधिक जटील झाला आहे हे मात्र मान्य करतो.

In reply to by सुबोध खरे

असा पुढाकार, पोलीस, लफडी अन सरकारी यंत्रणा वाचून एक नुकताच घडलेला किस्सा आठवला. यात कोणी अनाहिता नाही(क्षमस्व) लहान गावातून जाणारी एसटी होती. निम्म्यावर रिकामी होती. अगदी मागच्या सीटवर एक अपंग माणूस मोबाईलवर फुल्ल आवाजात गाणी लावून बसलेला होता. गाण्याचा चॉइस अर्थात फालतू. पुढच्या एका सहकुटुंब पुरुषाने त्याला रिक्वेस्ट केली. त्या अपंगाने लिटरली दुर्लक्ष्य केले. त्या स्द्ग्रुहस्थाने कंडक्टरला सांगितल्यावर 'पांगळं हाय. करतय जीवाची करमणूक. करु द्या" हे उत्तर दिले. त्यावर ग्रुहस्थाने पोलीसी भाषेत त्याला दम दिला. मोबाईल काढून घेऊन आवाज बंद करुन परत केला. २० मिनिटात एक लहानसे गाव आले. दणादणा १५ -२० पोरे गाडी थांबवून डायरेक्ट आत घुसली. तो पांगळा आता त्या पोरांना त्या माणसाकडे बोट दाखवून सांगत होता. काहीही न विचारता पोरांनी ग्रुहस्थाला(तो खरेच पोलिस होता) कुत्र्यासारखे मारायला सुरुवात केली. त्याची बायको मध्ये पडत असता तिला बाजूला ढकलून मारले. ५ मिन्टात पोरे गाड्यावरुन पांगळ्याला घेऊन पसार झाली. पोलीसाने उठून फोन लावले. बस पोलीस स्टेशनला न्यायला लावली. तकरार केली. रवाना झाली. सुरंगीताताईच्या लेखाची आठवण झाली. त्याप्रसंगी बसमधल्या कुणालाच काही करता आले नाही. काय होतेय. भांडण कशाचे हे कळेपर्यंत मारुन आडदांड पसार झाले होते. पोलीस त्यांना हुडकतील. करायचे ते करतील. मारामारीचा तर सिंपल रुल. सुरुवातीलाच मारामारी होते, नंतर फक्त मिटवामिटवी अन सारवासारवी. पण साध्य अन सिध्ध काय झाले यातून?

फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही
जिव्ह्रारी हे लागतं हे माहित असतं म्हणूनच वागणार्‍याची भिड चेपते. विषेशतः एखादा कंपु असा त्रास देत असेल तर त्रयस्थ स्त्रिच्या मदतीला नक्कि कसं जावं हे देखील लक्षात येत नाही. कारण सोबत नसताना मधे पडलो तर प्रकरण वाढणार, आणी ते उघड उघड इतकं वाढवं हे खरचं कोणाला अपेक्षीत असते काय ?

मला माहितीये कि आत्ता इथे काही सल्ले देणं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकनं आहे . . पण स्वानुभवावरून सांगतोय . . अश्या गर्दीत कोणीच पुढे येत नाही . पण फक्त तो पर्यंत जोपर्यंत दुसरा कोणी येत नाही . एकाने लीड घेतली कि सगळे पाठोपाठ मदतीला येतात . प्रश्न फक्त इतकाच असतो . पहिली लाथ कोण घालणार . एकदा सुरुवात झाली कि "गर्दी" ची ताकत खूप असते, आणि अश्या XXXXX लोकांना तेच वठणीवर अनु शकतं . पण असो . असे अनुभव परत तुम्हाला येऊ नयेत . हीच इच्छा :)

किळसवाणा अनुभव. अशा वेळी १०० नंबरला कॉल केला तर काही रिस्पॉन्स मिळू शकेल का?

In reply to by पैसा

कॉल करून तर पहा! नुकताच मी कंट्रोल रूम च्या दिवसभराच्या गमतीशीर किश्श्यांचा एक लेख गुंफला आहे. आज उद्यात टाकीनच! तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की... नाही नाही त्या कॉल्सना रिस्पॉंड करतात पोलीस, मग एखाद्या गंभीर कॉलला का नाही करणार? धन्यवाद! (घरातच दोन पोलीस असलेला) Sandy

In reply to by पैसा

अशा वेळी १०० नंबरला कॉल केला तर काही रिस्पॉन्स मिळू शकेल का? वाटत नाही काही उपयोग होईल असे..मी एकदा गरजेच्या वेळी सलग १० मिनिटं प्रयत्न करत होतो पण साधा कॉल उचलायची पण तसदी घेतली गेली नव्हती.

लेख पटला. पैतै, १०० चं माहीत नाही. पण वर लिहिलेल्या ड्रायवरच्या अनुभवाच्या वेळी मी मनपा बस स्टैण्डला १० वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते मला ड्रायवरचं नाव द्या नाहीतर तुमचीपण तक्रार करते म्हणून. तर मला त्या कंट्रोल रूम मधे सोडून सगळे निघून गेले भटकायला. १० नंतर पोलीस स्टेशनला जायची माझ्यात एनर्जी नव्हती आणि ते सेफपण वाटलं नाही. किमान माणुसकी हा प्रकारसुद्धा दुर्मिळ आहे. उठसूट अनाहितांना शक्य तिथे शक्य त्या शब्दांत हिणवणार्‍या महाभागांना यातले किती स्ट्रेस डेली बेसिसवर सहन करावे लागतात हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by पिशी अबोली

तर हा अनुभव डिटेल लिहा. वाटल्यास बदललेल्या नावाने सगळ्या पेपर्स च्या कार्यालयात देऊन या/पोस्ट करा. द लॉजिकल इंडीयन ला पाठवा, सोशल मिडिया चा वापर करा. असं सुचवेन.

In reply to by पिशी अबोली

" मी मनपा बस स्टैण्डला १० वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते मला ड्रायवरचं नाव द्या नाहीतर तुमचीपण तक्रार करते म्हणून. तर मला त्या कंट्रोल रूम मधे सोडून सगळे निघून गेले भटकायला." - अशावेळेस तक्रार करायला गेल्यावर काय होतं ते स्पष्ट करण्यासाठी तुमचा अनुभव प्रातिनिधीक आहे . नंतर तुम्ही तिथून गेल्यावर मनसोक्त टरही उडवली असेल त्या लोकांनी, तेवढंच जमतं त्यांना. " उठसूट अनाहितांना शक्य तिथे शक्य त्या शब्दांत हिणवणार्‍या महाभागांना " - काही गरज नसतांना, संदर्भ नसतांना नुकतेच एका धाग्यात वापरलेले काही शब्द, ट्रोलहिता, कुरणातली टोळधाड, मधमाशा इ. स्त्रियांच्या ग्रूपला हिणवणारे कोण तर पुरूषांचा कंपूच. इथेही तेच चालू आहे.

In reply to by नीलमोहर

- काही गरज नसतांना, संदर्भ नसतांना नुकतेच एका धाग्यात वापरलेले काही शब्द, ट्रोलहिता, कुरणातली टोळधाड, मधमाशा इ.
यातला "मधमाशा" हा शब्द मीच वापरलेला पण त्याचे कारण वेगळे होते....आणि ज्या अर्थाने तुम्ही घेतला ते कारण सर्वस्वी वेगळे आहे....आत्ता वेळ नाहिये....नंतर सविस्तर प्रतिसाद टंकतो (नाही टंकला तर मला आठवण करा)

In reply to by टवाळ कार्टा

आपण आणि अनाहिता मध्ये चेष्टा चालत असते माहित आहे, त्या धाग्यातही आपले प्रतिसाद बर्‍यापैकी रिजनेबल होते. त्यामुळे आपल्याबाबत फारशी तक्रार नाही. मात्र हेच इतरांबद्दल म्हणता येणार नाही.

-_- आधीचं युपी बिहार्‍यांना स्त्री ला आदराने वागवणं माहित नाही. त्यामधुन जर का सोमरसाच्या अंमलाखाली असतील तर काही पहायलाचं नको. दोन-तीन वेळा अश्या लोकांना कानफाटलेलं आहे निगडी-कात्रज रुटवर. कोणीतरी डेरिंग करुन एक भडकाउन द्याय्ला लागते नंतर गर्दीच्या अंगात जोर येतो आणि ही असली जमात वठणीवर येते.

मी साधारण 15 वर्षांपुर्वि 3 वर्ष कराड-सातारा असा एस्टीतुन दर आठवड्याला प्रवास करायचे. तेव्हा कोणी पुरुष सीटवर बसला तर त्याच्यासमोर कर्कटक काढुन हातात घ्यायचे. त्या तासाभराच्या प्रवासात त्यामुळे सेफ वाटायचं. एक दोनदा अश्या महाभागांना ढडा सद्घा शिकवला आहे. आपण थोडं धाडस दाखवलं तर अशी माकडं आपोआप तिथुन पळ काढतात.

यूपी बिहार्‍यांना पुण्यात तरी असलं काही करताना बघितलेलं नाहीये. बघितलं असतं तर मनसेचं नाव घेवून पहिलं पोटात लाथ घातली असती. पुढचं पुढे. खरं तर असं करायला काही कारण मिळत नाहीये याचंच दु:ख आहे. पीएमटी नं जायला सुरवात केली पाहीजे.

In reply to by काळा पहाड

वे टू गो काळापहाड ! गुड. खूप वाईट वाटतं की असं एकही नाव राहिलं नाही आता की ज्याच्यामुळे बाहेरून महाराष्ट्रात येणारे आणि वर उपद्रव करणारे चळाचळा कापावेत. निराशा केलीय काही मंडळींनी॑.

@ इन कम, जागेवरच हिशोब चुकता केला हे योग्यच केले. नंतर रडण्यत काहीच अर्थ नसतो. एकदा मुंबईला फोर्ट् परिसरात फूटपाथवर पुस्तकं बघत होतो, बाजुला एक परदेशी कृष्णवर्णीय महिला पुस्तक बघण्यासाठी खाली वाकली,तेव्हड्यात बाजुने जाणार्‍या एका तरुणाने त्या महिलेच्या पार्श्वभागाला स्पर्श केला, त्या महीलेने गर्रकन वळुन आपल्या हातातील बॅगने त्या तरुणाच्या चेहर्‍यावर तडाखा दिला. हेलपाटत तो खाली पडला, ती त्याच्या बाजुला उभी... तो उठला व काही न बोलता सरळ निघुन गेला. त्या परदेशी महिलेने कोणाच्याही मदतीची अपेक्षा केली नाही. शाब्दीक असो वा शारिरीक, कोणत्याही छेडछाडीला जागेवरच उत्तर दिले पाहीजे. मागे असंच फेसबूकवर मुंबईत प्रवासात महिलांच्या शारिरीक छेडछाडीत वाढ झाली,व त्याला सर्वस्वी परप्रांतीय जबाबदार आहेत अशा प्रकारची पोस्ट एकाने टाकली होती. त्यावर कॉमेंट करताना मी लिहिले होते, परप्रांतीयांमुळे असे प्रकार वाढले असतील,परंतू स्थानिकही गर्दीचा फायदा घेतातच. अव्यवहार्य वाटेल पण प्रत्येक लोकलच्या व बसच्या प्रवेशद्वाराजवळ कॅमेरे लावा, त्या चित्रणात आपल्याला आपले ओळखीचे चेहरे दिसतील. कदाचीत वडिलांचे, भावाचे किंवा आपले मित्रही दिसतील, अन्य नातेवाईकांबरोबर वडील,नवरा,सख्खे काका,मामा,भाऊ, किंवा स्वतः तुम्हीही दिसल्यास आश्चर्य वाटून घेवू नका. शेवटी मला ब्लॉक केले गेले..
म्हटलं तर ही एक किरकोळ घटना,
किरकोळ घटना? अहो ही सुरसुरणारी वात चिरडून विझवून नाही टाकली तर बाँब जवळच फूटून शारिरीक व मानसिक इजा होण्याचा धोका संभवतो.

In reply to by मार्मिक गोडसे

वर्मावर लाथ मारणे डोळ्यात बोट घालणे गळ्यावर बुक्का देणे काही उपाय. या क्रियांनी किमान मिनिटभरासाठी तरी त्या व्यक्तीची वाट लागू शकते. यू कॅन बाय टाईम. असो. सांगणं सोपं आहे. त्या वेळी करणं कठीण.

"आपल्याला काय करायचे" ही मानसिकता जोपर्यंत आहे. तोपर्यंत हे असेच चालणार. अंवातर: गाडीतील बहुतेक युवक, पुरूषांनी कधीतरी हेच केलेले असते.

स्वसंरक्षणाचे बेसिक धडे मुलींना शाळेतच कंपल्सरी करायला हवेत. डोकंचं फिरलं हा लेख वाचून.

प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार. वर काही प्रतिसादांत अशा प्रसंगी प्रतिकार करावा, कानाखाली खेचावे, ठेचावे, लाथ घालावी, शौर्य दाखवावे, हिशेब चुकते करावे इ. उपाय सुचवले आहेत. इथे आपण काही उदाहरण पाहू, तुम्ही रस्त्याने जाताय,समोरून एक दारूडा/मनोरूग्ण येत असतो. तो आपल्याच धुंदीत बरळत चाललाय, मध्येच शिव्याही देतोय, तुम्ही समोरून जात असता एखादी शिवी तो जनरल टाकून देतो, काय कराल तुम्ही ?? वरीलपैकी कोणता पर्याय निवडाल ? की दुर्लक्ष कराल.. आपल्याला दिसतंय की समोरचा माणुस शुध्दीवर नाहीय, तो काय करतोय बोलतोय त्याचं त्याला समजत नाहीय. तरीही समजा तुम्ही त्याला कानाखाली खेचून द्याल, एखादा फटका माराल, तो हेलपाटत जाऊन पडेल.. तुम्हाला काय मिळेल, त्याक्षणी जवळ जवळ बेशुध्द असलेल्या त्याला धडा शिकवल्याचे समाधान ? त्याक्षणी समोरची व्यक्ति आपल्या पातळीवर नसतांना, दोघांपैकी सूज्ञ आपण दिसत असतांना, उगाच रिकामे वाद घालण्यात अर्थ नसतो. त्यावेळेसाठी दुर्लक्ष हा वाजवी, तर्कशुध्द पर्याय असतांना त्याच्या नादी लागायला जाणे, हा आपलाही मूर्खपणा होऊ शकतो. अजून एक उदाहरण, तीच जागा, तोच रस्ता, समोरून एक कुत्रा येतो, बळंच तुमच्यावर भुंकतो. तुम्ही त्याला हाड करून पुढे जाल की त्याच्यावर धावून जाल, त्याला लाथा-बुक्क्या घालत बसाल ? आणि असे केल्यावर तो जर तुम्हाला चावला तर जवाबदार कोण.. सरकारच्या जाचक धोरणांना काही पक्ष मूक मोर्चा, निदर्शने इ. करून विरोध करतात, काही तोडफोड, बंद, जाळपोळ इ. करून. प्रत्येकाला आपला मार्ग योग्यच वाटतो, यातील कोणता मार्ग बरोबर, कोणता चूक कोण ठरवणार ? कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करण्याचे मार्ग व्यक्तिसापेक्ष राहणार. त्या त्या वेळेस, त्या त्या परिस्थितीनुसार आपलं अंतर्मन, सिक्स्थ सेन्स सांगेल त्याप्रमाणे आपण वागत असतो. लेखात लोकांच्या बघ्याची भूमिका घेण्याबद्दल फक्त लिहीले आहे, कोणाकडून मदतीची अपेक्षा नसतेच, तसे अनुभवही नाहीत, कुठल्याही परिस्थितीत आपली मदत आपणच करू शकतो हे माहित आहेच. काही वर्षांपूर्वी एका महिलेला, नाव विद्या बहुतेक (ठिकाण आठवत नाही), एका माणसाने भर रस्त्यात पेटवून दिलं होतं, जमाव पहात राहिला, तिचा जीव वाचवायला कोणी पुढे आलं नाही. मी शांतता, अहिंसा प्रिय, कातडीबचाव मध्यमवर्गीय आहे, राहणार. वर स्रुजा यांच्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे गेलेला जीव, अब्रू काहीच परत येत नाही. हे फार टोकाचे परिणाम आहेत, पण असं घडणारच नाही याची खात्री कोण देणार.. नंतर कोणी उदो उदो करून, कँडल मार्च वगैरे काढून उपयोग नाही, बळी गेलेल्यापर्यंत पोचत नाही ते..

In reply to by नीलमोहर

तुमच्या लेखासाठी आणि या प्रतिसादासाठी +१ स्वतःच्या मनगटात ताकद असेल तरच समोरच्याच्या आरे ला कारे म्हणावे. ती घटना जमत असेल तर विसरुन जावी आणि पुन्हा कामाला लागावे. अगदिच अशक्य असेल तर जेव्हा संधी मिळेल तेव्हा थंड डोक्याने सुड घ्यावा. (संधीच्या शोधात राहिले की संधी मिळतेच) तेव्हा दया वगेरे दाखवायच्या फंदात पडू नये. उगाच डोक्यात राख घालुन घेउन इंन्स्टंट रिअअ‍ॅक्शन देण्याच्या फंदात अजिबात पडू नये. त्याने आपलेच नुकसान होते. पैजारबुवा,

In reply to by नीलमोहर

एवढं जर तुम्हाला आधीच समजतं तर पहिलेछूट हे जे लेखातले विचार तुमच्या मनात आले ते का आले मग? तिथेच का सोडून दिले नाही त्याच्या वागणूकीला आणि मानसिकतेला? इथे काही जणांनी स्त्रियांना स्वसंरक्षण, चाकू, मिर्चीपूड वैगेरे ठेवा याबद्दल म्हटले आहे. मला कायम वाटत आले आहे यापेक्षा जास्त काहितरी स्त्रियांना शिकवणे आवश्यक आहे. चाकू, बंदूक, रणगाडा, मिसाइल सोबत असणे व तो चालवण्याची मानसिकता असणे ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. वरच्या प्रतिसादातून ते स्पष्ट दिसतंय. कधी विचार केलाय की असलं वागणं का फोफावतं? कारण त्याला ग्राउंड मिळतं म्हणून. ग्राउंड मिळालेच नाही तर हे प्रकार बंद होतील. ''कोणीच उलटून प्रतिकार करत नाही" या मानसिकतेतूनच हे प्रकार फोफावले. "प्रतिकार होतो" हे जेव्हा क्लिअर होइल तेव्हाच सगळं बंद होइल. छेडछाड करणं, अपमान करणं, विनयभंग करणं हे खून पाडण्याइतकंच गंभीर आहे हे कधी समजणार बायकांना? नाहीतर उद्या कुणी खून पाडायला आलं तरी तुम्ही वरचेच विचार पाजळत बसाल. आय अ‍ॅम वेरी मच सॉरी. पण वरचे विचार अजिबात पटले नाहीत. "माझं काही बरंवाईट झालं तर काय" ह्या विचारांमुळे ही परिस्थिती आहे. पण "हे जे होतंय हेच बरंवाईट घडतंय, याला ताबडतोब संपवलं पाहिजे" हा विचार महत्त्वाचा. प्रत्येकाला जीवाची भिती असते, तुम्ही फक्त आपल्या जीवाची भीती बघता. समोरच्याचाही जीव असतो व त्याला ही तो तेवढाच प्यारा असतो. भेकड मानसिकता असणार्‍यांनी सन्मानाने जीवन जगण्याची अपेक्षा नक्कीच करू नये मग. तुम्ही वाघाला काही करणार नाही म्हणून वाघाने तुमच्यासोबत काही करू नये ही अपेक्षा पुस्तकात ओके. जंगलात नाही. मी लोकलमधे दारु पिऊन दंगा करणार्‍यांना, डोकं उठवणार्‍यांना तिथल्या तिथे चोपले आहे. त्यांच्या उपद्रवाने झालेला त्रास, स्ट्रेस घरी घेउन जाणे, बायकामुलांवर काढणे पटत नाही. असो, ज्याचे त्याचे विचार. आपलं काय जातंय. एकच सांगतो माझ्यासमोर असला काही प्रकार झाला तर 'योग्य तोच उपाय' केला जाइल. मग माझे काय व्हायचे ते होवो. माझ्यासारखे लाखो मरतील, मरायला-मारायला तयार होतील तेव्हा तरी सूर्य उगवेल की नाही...? रोज बलात्कार होत आहेत. एक तरी केस अशी आहे का जिथे बलात्काराचा प्रयत्न स्त्रीने पुरुषाचा खून करून हाणून पाडला आहे? जेव्हा अशा बातम्या यायला लागतील तेव्हा आपोआप दुसर्‍या बातम्या कमी होतील. आमेन!

In reply to by तर्राट जोकर

रोज बलात्कार होत आहेत. एक तरी केस अशी आहे का जिथे बलात्काराचा प्रयत्न स्त्रीने पुरुषाचा खून करून हाणून पाडला आहे? जेव्हा अशा बातम्या यायला लागतील तेव्हा आपोआप दुसर्‍या बातम्या कमी होतील. आमेन! >>
आमेन!

In reply to by तर्राट जोकर

रोज बलात्कार होत आहेत. एक तरी केस अशी आहे का जिथे बलात्काराचा प्रयत्न स्त्रीने पुरुषाचा खून करून हाणून पाडला आहे?
आमच्या ऑफिसमध्ये स्वसंरक्षणासाठी एक २ तासाचे सेशन झाले होते. कराटे शिकवणारे २ गुरुजी आणले होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला कुणी काही केलं तर सरळ जीवच घ्यायचा. सोडायचं नाही. कोण कोण घेऊ शकेल असा जीव?? तर फार कमी हात वर आले. अनेक मुलींनी हे अर्ग्युमेंट केलं की जर मी त्याला फक्त जखमी करुन स्वतःचा जीव वाचवु शकत असेल तर का कुणाचा जीव घ्यायचा. मुद्दा हा नाहीये की कोणता अ‍ॅप्रोच चुक किंवा बरोबर.. मुद्दा हा आहे की मुलींची मानसिकताच नसते कुणाचा जीव घेण्याची. त्यासाठी जे क्रौर्य किंवा अ‍ॅग्रेशन लागेल ते फार कमी जणींमध्ये असतं. आपण कमजोरच आहोत हेच त्यांनी स्वतःला पटवलेलं असतं. त्यामुळे रागाच्या भरात जे अ‍ॅग्रेशन निर्माण होऊ शकतं ते होत नसावं असं मला वाटतं.

In reply to by अत्रे

माझ्या शरीराला स्वतःच्या मलाकीची वस्तु समजुन वाट्टेल ते करण्याची मनिषा बाळगणार्‍याचा जर मी खुन केला तर ती मुळात "हिंसा" कशी? आणि अवास्तव कशी?

In reply to by पिलीयन रायडर

१.
काही केले तरी
समजा अंगाला धक्का मारला तर खून करायची काय गरज? थोबाडीत मारले , बास झाले. खून करणं वाटणं ठीक आहे, पण प्रत्यक्षात? म्हणून अवास्तव. २. एखादी क्रिया "हिंसा" आहे की नाही हे तिच्या कारणांवर अवलंबून असते का?

In reply to by अत्रे

अहो अंगाला धक्का मारला तर खुन करा असा अर्थ घेतात का? पण येस्स.. आवेश "साल्या मुडदाच पाडिन तुझा" असाच हवा. पण त्याहुन जास्त कुणी काही करत असेल तर मग नक्की पाडावा मुडदा. एक लक्षात घ्या, कुणी कुणाला मारु शकेल की नाही हा फार पुढचा प्रश्न आहे. किमान आपण तेवढ्या ताकदीचा प्रतिकार तरी करु शकतो.. रादर केलाच पाहिजे हे बिंबवणं जास्त महत्वाचं आहे. शिवाय जशा घटना आजुबाजुला घडत आहेत, अश्याच रिअ‍ॅक्शन्स आल्या शिवाय त्याला चाप बसणार नाही. कुणी आपलं काहिही घोडं मारु शकत नाही हा विश्वास, मुलीला तिच्या घरचेच "जाउ दे.. कशाला पोलीसात जा.." पासुन ते "तुझीच चुक आहे" पर्यंत करत असणारा "सपोर्ट" आणि "जीव घ्यावा की घेऊ नये" ह्या तात्विक चर्चा इतपतच समाजाचे सहकार्य... कसं काय थांबणार हे सगळं? २. हो.. मला तरी तसंच वाटतं. धर्माच्या नावाखाली एखाद्याचा जीव घेणं आणि स्वसंरक्षणासाठी एखाद्याचा जीव घेणं ह्यात फरक असतो तसंच.

In reply to by पिलीयन रायडर

माझं समर्थन. स्ट्राईक हार्ड अ‍ॅन्ड स्ट्राईक टू किल. ही हिंसाच आणि जस्टीफाईड हिंसा. बाकी वरच्याप्रमाणे 'का मारावे' टाईप लोक मानवाधिकारवादी संस्थेत जातात किंवा मिपावर सर्वधर्मसमभावाचे मत मांडतात. इगनोअर.

In reply to by काळा पहाड

बाकी वरच्याप्रमाणे 'का मारावे' टाईप लोक मानवाधिकारवादी संस्थेत जातात किंवा मिपावर सर्वधर्मसमभावाचे मत मांडतात. इगनोअर.
अत्रे साहेब, हे तुमच्यासाठी नव्हे, तर त्यांच्या ऑफिसमधल्या बायकांसाठी आणि हाफथ्रॉटल साहेबांसाठी आहे. गैरसमज नसावा.

In reply to by पिलीयन रायडर

आपण कमजोरच आहोत हेच त्यांनी स्वतःला पटवलेलं असतं. त्यामुळे रागाच्या भरात जे अ‍ॅग्रेशन निर्माण होऊ शकतं ते होत नसावं असं मला वाटतं. प्रतिकार न करण्याच्या मुळाशी हेच कारण आहे. घराघरांतून मुलींना 'अबला'पणाचं जे बाळकडू दिलं जातं ते बदलणे आवश्यक आहे हे अनेक वेळा वाटतं. सगळे दोषारोप मुलींवरच करत असतात. त्यातूनच विरूद्ध पार्टीला लायसन्स दिल्यासारखं होतं. अशीच शिवीगाळ कुणा पुरुषाला दुसर्‍या पुरुषाने केली तरी ते एकमेकांची-स्वतःची देहयष्टी विसरून आरे ला कारे करतातच. स्त्रियांनी हा पवित्रा घेणे हेच सर्वात आवश्यक. simple hairpin can be a fatal weapon. पण जीव घेण्याइतकं मन तयार असणे महत्त्वाचं, आपला जीव/सन्मान जाण्यापेक्षा जगात जास्त काही नाही हे शिकवणे जास्त महत्त्वाचं.

In reply to by तर्राट जोकर

त्यांच्या उपद्रवाने झालेला त्रास, स्ट्रेस घरी घेउन जाणे, बायकामुलांवर काढणे पटत नाही.
अतिशय सहमत!

निमोताई, स्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नका. 1 जेव्हा एक मुलगी त्यांच्याविरुद्ध बोलत होती तेव्हा जर आपणही तिला मदत करायच्या एवजी गप्प राहिलो तर"इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते" या इतरांमध्ये आणि आपल्यात काय फरक? २ तुम्ही जी उदाहरणे दिलीत ती उदाहरणे म्हणून ठिक आहेत. आडरस्त्यावर, किंवा आडवेळेला विरोध करू नये मान्य पण दिवसा pmt बस मध्ये जिथे मध्यमवर्ग आहे तिथे निदान आवाज चढवायला घाबरू नये. माझा अनुभव असा आहे की आपण जर विरोध केला तर लोकं मदतिला येतात. आपणच गप्प राहिलो तर इतरांनी का बरे मध्ये पडावे. पैजारबुवा म्हणतात ते मान्य,पण मग गप्प बसावे, गिळगिळीत वाटते, समाज असा का वागतो असं म्हणण्यापेक्षा मला विरोध करता आला नाही याबद्दल वाईट वाटले हा सूर जास्त genuine वाटतो. 3 माझा एक अनुभव, ज्यामुळे माझा हा दृष्टिकोन झाला. पंधरा वर्षांपूर्वी एका संध्याकाळी स्टेशनवरून घाईघाईत क्लिनिकवर जात असताना समोरून एकजण आला आणि अत्यंत गलिच्छ शिवी देऊन धक्का मारून गेला.प्रचंड संताप आला,पण सुशिक्षित, सुसंस्कारीत मी गप्प बसले. क्लिनिकवर पोचल्यानंतर दहा एक मिनिटात तोच माणूस "मॅडम से माफी मांगनी है" आत आला आणि फटाफटा गालावर मारून घेत माफी मागू लागला. मला काय प्रकार आहे ते कळेना. त्याच्यामागून अजून एक वयस्करवव्यक्ती आत आली. आणि " वापस मैडम को तकलिफ दिया तो याद रखना " असे रागवत त्याला बाहेर पाठवले. ही व्यक्ती (जी माझी पेशंट होती )तो प्रसंग घडला तेव्हा मागेच गाडीत बसली होती.आत्ता पर्यंत मी तिला केसपेपर वरच्या नावाने ओळखत होते. पण तेव्हा बोलताना कळले की ती मुंबई मध्ये ज्याने गँगवॅारला प्रथम सुरवात केली तो कुख्यात गुंड होता. पुढे ती म्हणाली," कभी चुप मत बैठना,आप जैसेपढेलिखे लोग चुप रहते हैं इसलिए तो हमारा राज चलता हैं नही तो गिनेचुने पुलिस हमारा कुछ नही कर सकती!" असो. म्हणून म्हणते तुम्ही निदान त्या मुलिच्या बाजुने बोलायला हवे होते.

In reply to by प्राची अश्विनी

तुमच्या बराचशा मुद्द्यांचे उत्तर माझ्या http://www.misalpav.com/comment/753738#comment-753738 वरील प्रतिसादात दिलेले आहे, त्यावर अजून काही बोलणे म्हणजे रिपीटीशन होईल फक्त. तरीही, १. जेव्हा एक मुलगी त्यांच्याविरुद्ध बोलत होती तेव्हा जर आपणही तिला मदत करायच्या एवजी गप्प राहिलो... इतरांमध्ये आणि आपल्यात काय फरक? - तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बहुतेक, तुम्ही समजताय की तो त्या मुलीला शिव्या देत होता आणि मी इतरांप्रमाणे गंमत बघत होते. तर ते तसं नाही. मी लिहीलंय की शिव्या स्पेसिफिक तिच्या - माझ्यासाठी नव्ह्त्या. तो त्या निमित्ताने त्याचे फ्रस्टेशन काढत होता, आणि तिच्या उलट बोलण्याने तो अजून चिथावले जात होता, त्याला प्रोत्साहन मिळत होते, ती गप्प बसली असती तर तोही गप उभा राहिला असता, विषय तिथेच मिटला असता. एका अर्धवट शुध्दीत असलेल्या माणसाशी वादात पडण्याची इच्छा, गरज त्याक्षणी मला वाटत नव्हती हे परत सांगेन. जिथे भांडणाची गरज नाही दुर्लक्षानेही काम चालते तिथे भांडण करून विषय वाढवणे आपला मूर्खपणाही ठरू शकतो. वाद वाढवण्याचा नाही तर वाद मिटवण्याचा माझा प्रथम प्रयत्न असतो. तो चुकीचा असेल तर तसं. २. 'मला विरोध करता आला नाही याबद्दल वाईट वाटले' - मी माझ्या पद्धतीने विरोध केला. अहिंसेने केलेला विरोध खरा की हिंसेने, मौनाने केलेला खरा की आक्रस्ताळेपणाने, कोणता मार्ग बरोबर, कोणता चूक कोण ठरवणार ? 'गप्प बसावे, समाज असा का वागतो' - हे कुठल्या संदर्भात लिहीलंय लक्षात येत नाहीये. समाजातील खालच्या स्तरावरील लोकांसाठी काही गोष्टी लिहील्या आहेत. 'गिळगिळीत वाटते' - अशी शिवी ऐकून कोणा संवेदनशील व्यक्तिला नाही वाटणार? ते इथे लिहीलं ते चुकलं का, तसं असेल तर पूर्ण लेखच चुकीचा आहे म्हणता येईल. कितीतरी गोष्टींवर ऑब्जेक्शन घेता येईल हे का लिहीलं, ते का लिहीलं म्हणून. काहींनी घेतलंही आहे वर तसं. ३. "आप जैसेपढेलिखे लोग चुप रहते हैं इसलिए तो हमारा राज चलता हैं नही तो गिनेचुने पुलिस हमारा कुछ नही कर सकती!" - " The trouble with the world is that the stupids are full of confidence and the intelligent are full of doubts." हे सत्य आहेच. एकटीने पूर्ण समाज बदलवण्याची स्वप्नं मी तरी पहात नाही. इथे हेही सांगेन, हेच जर तो विषय वाढला असता, नंतर काही अनावस्था प्रसंग आला असता तर लोकांनी तुम्हाला काय गरज होती वाद घालायची, शहाणपणा दाखवायची, बसायचं ना गप असं म्हणायलाही कमी केलं नसतं. लोक असेही बोलणार आणि तसेही बोलणार, घोडयावरही बसू देणार नाहीत आणि चालतही जाऊ देणार नाहीत, त्यामुळे लोकांचा विचार करणं केव्हाच सोडून दिलंय. त्याक्षणी आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करावं.

In reply to by नीलमोहर

१ गैरसमज बिलकुल नाही. चार पाच मुलींना कुणी त्रास देतय, त्यातली एक विरोध करतेय आणि आपण जर गप्प बसलो तर आपण्सुद्धा गर्दीतलेच एक होतो. कारण दुर्लक्ष करण्याची बहुतांश मानसिकता याला मी "गर्दी" म्हणतेय. २ "एका अर्धवट शुध्दीत असलेल्या माणसाशी वादात पडण्याची इच्छा, गरज त्याक्षणी मला वाटत नव्हती हे परत सांगेन. जिथे भांडणाची गरज नाही दुर्लक्षानेही काम चालते तिथे भांडण करून विषय वाढवणे आपला मूर्खपणाही ठरू शकतो. वाद वाढवण्याचा नाही तर वाद मिटवण्याचा माझा प्रथम प्रयत्न असतो. तो चुकीचा असेल तर तसं." हाच विचार इतर बघ्यांनीही केला असेल नाही का? मग "इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते "हे म्हणयचा आपल्याला नैतिक अधिकार रहात नाही. ३ "कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं सरळमार्गी मत" एवढी माणसं असताना , त्यातील एक आजोबा आणि एक मुलगी अन्यायाचा विरोध करताना सुद्धा जर आपण दुर्लक्ष करायचा तर मग झाशीची राणी कधी बनायचे याचे एक उदाहरण द्याल का? ४ "मी माझ्या पद्धतीने विरोध केला. अहिंसेने केलेला विरोध खरा की हिंसेने, मौनाने केलेला खरा की आक्रस्ताळेपणाने, कोणता मार्ग बरोबर, कोणता चूक कोण ठरवणार ?" आवाज उठवणे म्हणजे हिंसा करणे किंवा आक्रस्ताळेपणा देखील नव्हे. पण असो. कोणी अशावेळी मनातल्या मनात एखादे संकट्नाशन स्तोत्र वगैरे म्हणेल वा बाहुबलीला हाक मारेल आणि म्हणेल की मी माझ्या पद्धतीनी विरोध केला खरे आहे ईथे चूक बरोबर कोण ठरवणार. हा तुमचा मुद्दा पटला बरं का . ५ पूर्ण समाज बदलण सोडा हो, आपण आपली मानसिकता बदलली तरी खूप झालं. पण "शिवाजी जन्मावा पण दुसर्‍याच्या घरी, मी तर मावळा पण होणार नाही" हा विचार यात असेपर्यंत समाज बदलणं अशक्य आहे. मग कुणालाच दुसर्‍याल बोलायचा अधिकारच रहात नाही. कारण आपण जसं लोकांचा विचार करणं सोडून दिलं तसंच लोकांनीही आपला विचार करणं सोडून दिलेय नाही का? ६ लेखाचा हेतू माझ्या संवेदनाशील मनाला काय काय वाट्लं हे सुंदर भाषेत लिहिणे हे असेल तर वरील सगळ्या मुद्द्यान्चा संबंध येतच नाही. लेख खूप छान लिहिलाय. इति लेखनसीमा .

In reply to by नीलमोहर

तो त्या निमित्ताने त्याचे फ्रस्टेशन काढत होता, आणि तिच्या उलट बोलण्याने तो अजून चिथावले जात होता, त्याला प्रोत्साहन मिळत होते, ती गप्प बसली असती तर तोही गप उभा राहिला असता, विषय तिथेच मिटला असता.
यूपी बिहार्‍यांना अधिकार नसतात हे एक सूत्र लक्षात ठेवा. जिथे दिसतात तिथे ठेचायचे असतात ते. त्याचं फ्रस्ट्रेशन वगैरे जे काही आहे पाटण्याला जावून काढायचं असतं. तुमच्या सारख्या "विचारांच्या" लोकांमुळे हे लोक इथे रहातात आणि मान वर करून बोलतात. यांच्या डोक्यात बाटल्या फोडूनच त्यांना हाकलायचं असतं. आता ते कसं करायचं ते तुम्हाला शिकावं लागेल. पण आजूबाजूला जे असेल ते डोक्यात घालणं हा महाराष्ट्र धर्म आहे हे तरी ध्यानात असू दे तेव्हा.

माझं एकच स्पष्ट मत. मग याला कुणी निराशावादी म्हणा की अजून काही. तुम्ही प्रतिकार करा, वा नका करू हा विषय वेगळा. पण या देशातील लोक, त्यांची मेंटॅलिटी, कधीही; आय से इट अगेन, कधीही सुधारणार नाही. मार्क माय वर्ड्स.

In reply to by वेल्लाभट

पण या देशातील लोक, त्यांची मेंटॅलिटी, कधीही; आय से इट अगेन, कधीही सुधारणार नाही. मार्क माय वर्ड्स.
ते ढोल-डिजे वगैरे संदर्भातही हे लागू होतं का हो?

In reply to by वेल्लाभट

एका संदर्भात तुम्ही जे म्हणताहात ते दुसर्‍या संदर्भात लागू होतं किंवा नाही इतकेच विचारतोय. त्याला संबंध जोडणे म्हणत असाल तर मजाच आहे.

In reply to by बॅटमॅन

म्हटलं ना, तुमचा प्रश्न आहे. आणि जे म्हणायचं ते स्पष्ट म्हणा उगाच मी फक्त हे विचारतोय, मी फक्त असं म्हणतोय हे असले आडून आडून हात लावल्यासारखे प्रकार कशाला?

In reply to by वेल्लाभट

स्पष्टच विचारतोय हो. "अमुक विधान तमुक संदर्भात लागू होते" असे विधान केलेले नाही, तर "ते तसे लागू होते का" असा प्रश्न विचारला आहे. त्याला "तो तुमचा प्रश्न आहे" हे उत्तर अपेक्षित नाही तर हो किंवा नाही असे उत्तर अपेक्षित आहे. झालं पुरेसं स्पष्ट की अजूनही आडून आडूनच आहे?

In reply to by बॅटमॅन

मग दोन गोष्टींचा संबंध नाही. याचा अर्थ लागू होत नाही. हेही तितकंच स्पष्ट आहे माझ्या मते. असो. याहून अधिक कमेंट करण्याची इच्छा नाही. ढोल पथकांना असभ्य असंस्कृत विकृत चीप म्हणायचंय का तुम्हाला? ती कधीही सुधारणार नाहीत असं म्हणायचंय का? खुशाल म्हणा. एन्जॉय.

In reply to by वेल्लाभट

पण या देशातील लोक, त्यांची मेंटॅलिटी, कधीही; आय से इट अगेन, कधीही सुधारणार नाही. मार्क माय वर्ड्स.
अगदी हे सार्वजनिक सण, अमक्याचं व्रत म्हणून तमक्याने मासळी खाणं बंद करावं, अमक्याने बीफ खाल्लं म्हणून तमक्याने मारावं, अमक्याने तमक्याला पर्सनल गोष्टीवर कमेंट करुन मग साळसूद आव आणावा, धर्मासाठी अमक्याने साडेपाच वाजता बांग द्यावी आणि तमक्याने ढोल बडवत टाळ कुटत हिंडावं, देव निराकार आहे म्हणून अमक्यातमक्या राजापुढे भक्तांची गर्दी लोटावी अगदी सगळ्या सगळ्या बाबती लोकांची मानसिकता बदलणं अशक्य आहे.

हे असं वाचून हात प्रचंड शिवशिवतात. माझाही एक अनुभव सांगतो. एकदा एक माणूस गर्दी असलेल्या बसमधे एका बाईजवळ जात होता. हे तेंव्हा कळलं जेंव्हा ती बाई तिथून बाजूला सरकून उभी राहिली. मी केवळ त्या माणसाकडे रोखून बघत उभा राहिलो. काहीही बोललो नाही की काही केलं नाही. पण माझा पवित्रा ओळखून तो माणूस नजर चोरत शिस्तीत तिथे उभा राहिला आणि स्टॉप आल्यावर उतरला. इतकं केलं तरीही पुरतं अनेकदा. पण येस; हात शिवशिवतात. आणि याच्याशीही सहमत की अनेकजण दुर्लक्ष करणं पसंत करतात. जे पूर्णतः चूक नाही म्हणता येत; विरोध करून आपल्याला कायद्याचं पाठबळ मिळेल असा विश्वास देऊ शकेल का कुणी? ही शंका येतेच. माझ्या रोजच्या रस्त्यावर परवा एका मुलीची अ‍ॅक्टिव्हा वळण घेताना घसरली, पडली. फार वेगात नव्हती त्यामुळे लागलं नाही. मी रस्त्याच्या पलिकडच्या बाजूस गाडीची वाट बघत होतो. तिला स्कूटर उचलता येईना. तिथून दहा गाड्या गेल्या पण कुणीही तिला मदत करायला आलं नाही. मी शेवटी धावत पलिकडे जाऊन स्कूटर उचलून दिली लागलंय का विचारलं. मुद्दा हा की पडलेल्या मुलीची स्कूटर उचलायला कुणी आलं नाही, पण अडलेल्या मुलीच्या अंगचटीस जायला लांडगे टपलेलेच असतात. चीप कंट्री ऑफ चीप पीपल विथ चीप माईंड्स. नेव्हर विल धिस चेंज. नेव्हर.

१. मी स्वत: पुरूष असल्यामुळे, अशा वेळी स्त्रीला नक्की काय वाटतं, तिने कसं वागायला हवं वगैरेंबद्दल मला जे काही वाटतंय ते कायमच डिस्काउंटेड असणार. असायलाही पाहिजे. पण, त्रास होतो हे असलं काही वाचलं की. २. गेल्या काही वर्षांमध्ये जालावर खूप प्रगल्भ व्यक्ती भेटत गेल्या. त्यांच्याशी बोलल्याने माझेही विचार बदलत गेले. चारचौघात फिरताना नीट वागण्याचे उत्तरदायित्व मुलींवर टाकण्यापेक्षा नीट वागण्याचे कर्तव्य मुलांनी / पुरूषांनी पार पाडावे, आणि त्यांना तसे वळण बालवयापासूणच लावणे आवश्यक आहे, असे आता माझे मत आहे. ३. या संदर्भात दोन आठवणी लिहिण्याचा मोह टाळता येत नाहीये. पहिली आठवण अशी: (हे मध्यंतरी फेसबुकवर लिहिले होते ते तसेच इथे टाकतो आहे.) ही घटना १९८३ / ८४ च्या सुमाराची आहे. आईबाबा इंदौरला आणि मी मुंबईला राहत होतो. सतत येणेजाणे चालू असायचे. तेव्हा विजयंत ट्रॅव्हल्स नावाची ट्रॅव्हल कंपनी जोरात होती. एकदा मी आणि आई मुंबईहून इंदौरला जात होतो. रात्री महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या बॉर्डरजवळ कुठे तरी होतो. थंडीचे दिवस होते. सगळे झोपेत होते. अचानक बस थांबली आणि बसमधे आरडाओरडा सुरू झाला. जाग आली. आधी काही कळलेच नाही. नंतर लक्षात आले... बसमधे २ तरूण मुली शेजारी शेजारी बसल्या होत्या. त्यांच्या मागे दोन मध्यमवयीन पुरूष बसले होत. पन्नाशी चाळिशीचे. रात्री गाडी जिथे जेवायला थांबली होती तिथे बहुधा दोन चार बिअर प्यायले होते. तर रात्री सगळी सामसूम झाल्यावर त्यांनी मागून या मुलींना हात वगैरे लावायला सुरूवात केली. आधी खालून पाय लावले. मुली घाबरून गप्पच राहिल्या. यांची हिंमत वाढली. मग हात लावणं सुरू झालं. तरीही मुली गप्पच. काय करावं कळत नव्हतं. अगदीच लहान वय होतं त्यांचं. बहुधा एकट्याने फ़िरणं नुकतंच सुरू केलं असावं. असा अनुभवही पहिलाच असावा. त्या गप्प बसल्या तर यांचं अजून अजून वाढत राहिलं... मजल हात लावण्याच्या पुढे गेली. मग एकीने हिंमत करून ड्रायव्हर / क्लीनरला तक्रार केली. त्यांनी गाडी थांबवली आणि त्या दोघांना बडव बडव बडवलं. अक्षरश: भुस्काट पाडलं त्यांचं. "साले, यह विजयंत की गाडी है. तेरी हिंमत कैसे हुई?" ... त्या क्लीनरचे शब्द अजूनही माझ्या कानात आहेत... ते दृश्य अजूनही समोर दिसतं. अक्षरश: त्या मुलींच्या पाया पडत होते ते दोघे हरामखोर. माफ करा म्हणून विनवत होते. काही उपयोग नाही झाला. खूप मारल्यावर तिथेच थांबला नाही तो क्लीनर. त्याने त्या दोघांना तसंच, त्या भयानक थंडीत, जंगलसदृश भागात, रात्रीच्या किर्र अंधारात खाली उतरवून दिलं. सामान फेकलं आणि बस पुढे नेली. त्या दोघांचं पुढे काय झालं माहित नाही. मी मात्र त्या ग्रोइंग अप वयात बरंच काही शिकलो. ४. दुसरी आठवण आहे ती, याच धाग्यावर पिरा आणि तर्राट जोकर यांच्यामध्ये झालेल्या संवादाशी निगडीत आहे. मुद्दा असा होता की, स्वसंरक्षणाची साधने शिकणे आणि ती अंमलात आणायची वृत्ती अंगी बाणवणे असे काहीसे. पिरा यांनी किती मुली जीव घ्यायला तयार झाल्या ते ही लिहिले आहे. आम्ही ९वी / १०वीत होतो तेव्हाची गोष्ट. माझा एक शाळकरी मित्र आहे. त्याचे एक नातेवाईक मुंबईतील बर्‍यापैकी प्रतिष्ठित आणि तसे सभ्य राजकारणी. खर्‍या अर्थाने समाजसेवक वगैरे. त्यांना दोन मुले होती. मोठा अगदी काडीपैलवान तर धाकटा मुंबईत बर्‍यापैकी नाव असलेला बॉडीबिल्डर. एकदा आम्ही मित्राबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. हे दोघेही आमच्या मित्राचे दादा तसे आमचेही दादाच. मोठा दादा वडिलांच्या कामात त्यांच्या बरोबर असणारा. लोकसंग्रह मजबूत. नेतृत्वगुण उत्तम. नजरेत जरब, अंगात प्रचंड रग होती त्याच्या. धाकटा बॉडीबिल्डर मात्र अगदीच शांत, शामळूच म्हणावा अगदी असा. पण अनोळखी लोकांना त्याचीच खूप भीती वाटायची. आम्ही तिथे असताना, त्यांच्या वाडीत काहीतरी 'मॅटर' झाला. बाहेरची पोरं येऊन काही राडा घालायला लागली. बॉडीबिल्डर आतल्या खोलीत निघून गेला. मोठा दादा मात्र त्याच क्षणी बाहेर गेला. दोन चार, त्याच्यापेक्षा बर्‍यापैकी आडदांड असलेल्या, पोरांना अक्षरशः कुत्र्यासारखं मारलं त्याने. बाकीचे पळून गेले. 'मारायला शक्ती नाही, जिगर लागते', हा बहुमोल धडा त्यादिवशी शिकलो. जिगर असली तर कोणतीही वस्तू हत्यार होते, कोणताही माणूस इफेक्टिव्ह होतो. ५. 'निर्भया' प्रकरणानंतर बरीच राळ उडली होती. त्यावेळेस, 'स्त्रियांना चारचौघात त्रास होऊ नये या करता मुलांना वळण असणे गरजेचे आहे' या विचाराने आजवर काही केले गेले आहे का, याची चौकशी करत होतो. काही वर्षांपूर्वी धारावीत असा काही प्रयोग झाल्याचे कळले होते. तेथील मुलींना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. एका स्वयंसेवी संस्थेने त्या भागातील मुलांना 'सेन्सिटाइझ' करायचा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आणि मुलींचा त्रास संपला. दुर्दैवाने मला तपशील मिळाले नाहीत, अन्यथा त्यावर एक लेख लिहायचा विचार होता. ६. या सगळ्याचा परिपाक म्हणजे, स्त्रियांना होणार्‍या त्रासात तिची चूक नसते (कपडे कसे घालते, किती वाजता कुठे जाते, कोणाबरोबर असते इ.), तर केवळ आणि केवळ पुरूषांचीच चूक असते असे आता ठामपणे वाटू लागले आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुमचे मुद्दे पटले. पुरुषांची चूक पेक्षा ही समाजाची चूक जास्त वाटते. आपल्या समाजात बाय डिफॉल्ट स्त्रीला अबला समजणं इतक्या खोलवर रुजलेलं आहे की शिक्षण असूनही तुमच्यासारखा विवेकी विचार करणं म्हणजेही स्त्रियांना डोक्यावर बसवणं असं कदाचित बऱ्याच लोकांना वाटत असावं. हे 'सेन्सिटाइज़' करणं किती आवश्यक आहे असं बर्‍याचदा वाटतं. याच्यावर जमल्यास कृपया खरंच लेख लिहा. या दृष्टीने केल्या गेलेल्या विधायक कामाची माहिती जाणून घ्यायला आवडेल.