छि _ _
छि _ ल,
पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली,
एकदा... दोनदा... अनेकदा...
मन भरेपर्यंत.
तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं.
श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि
लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता.
मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी
जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की
करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून युपी-बिहारी वाटत होते, त्यातील एकाने भरपूर घेतली
होती (सुवास पसरला होता), त्याला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, त्याचं विमान टेक-ऑफ करून ढगांपल्याड
पोचलेलं सहज कळत होतं.
हे लोक सरळ लेडिज जवळ येऊन रेलू लागले, अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय,
आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती.
तिथल्या एका मुलीने गोडीत त्यांना पुरूषांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले, तेवढयापुरतं सरकल्यासारखं
करून पुन्हा त्यांनी तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. तो पायलट यात आघाडीवर होता.
इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा त्याला
समज देत होते तर तो त्यांनाच बुढ्ढा क्या बक रहा है इ. अचकट विचकट शेरे मारायला लागला.
अशावेळेस स्त्रिया जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरचा चिडून काय करेल, बोलेल याचा नेम नसतो,
त्यामुळे मी दुर्लक्ष करत होते, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभी राहिले होते.
कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं
सरळमार्गी मत. त्या मुलीलाही मी समजावत होते की सांगून सुधारणार्यांपैकी ते लोक नाहीत,
उगीच नादी लागू नको, पण तीही हट्टाला पेटली होती. बोलता बोलताच तिने ओढणी पूर्ण चेहर्याला घट्ट बांधून
घेतली होती, माझाही स्कार्फ होताच.( साध्याशा स्कार्फ मुळेही काहीवेळेस किती आश्वासक, सुरक्षित वाटतं
ते अशा चेहर्यावर स्कार्फ, स्टोल इ. बांधणार्या मुलींना नावं ठेवणार्यांना कसं कळावं.)
तो अजून बरळतच होता, खुदको मिस इंडिया समझती है, ये कोई लडकी है क्या..
काहीही फुटकळ कमेंट्स चालू होते. तीही चिडून त्याला धडा शिकवायच्या इराद्याने काही-बाही सुनावत होती.
तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेला तो शिवी देऊन मोकळा झाला..
छि _ ल, सा _ !!
................
................
त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता.
मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी..
त्यानंतर मात्र सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कंडक्टरला त्या तिघांना खाली उतरवण्यास भाग पाडले,
एवढा वेळ मजा बघणार्या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, एकदाची बस पुढे निघाली.
ती मुलगी शेजारील मुलीला तिने अशा किती लोकांना कसं सरळ केलं त्याचे किस्से सांगू लागली होती.
माझ्या कानात मात्र राहून राहून ती शिवी घुमत होती, अंगावर अॅसिड ओतल्यावर कसं वाटत असेल
तसं काहीसं ते शब्द कानावर पडल्यावर वाटलं होतं..
याआधी फक्त चित्रपट, पुस्तके, टिव्ही इ.वर ऐकलेलं एवढया जवळून प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव पहिलाच.
इतकी वाईट शिवी देण्यामागे तसंच काही कारण असावं तर तेही नव्हतं..
कोणासाठी होती ती शिवी ?
त्याला विरोध करणार्या त्या मुलीसाठी, माझ्यासाठी, बसमधील इतर महिलांसाठी ?
पूर्ण स्त्रीजाती साठीच कदाचित..
काय नव्हतं त्या शिवीमध्ये ?
राग, तिरस्कार, विखार, वासना ?
सगळंच, त्याशिवायही अजून काही..
त्याच्यात आणि बाकी लोकांत असणार्या सामाजिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक सर्वच बाबतीतील
विषमतेमुळे आलेले, वर्षानुवर्षे साठलेले कुठले कुठले गंड त्या एका शिवीतून बाहेर पडले होते.
त्या क्षणी मनात चमकून गेलं ते १६ डिसे, निर्भया प्रकरण. त्या घटनेनंतर, एक व्यक्ति दुसर्या व्यक्तिशी
इतकं निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या कसं वागू शकते हा प्रश्न कायम पडायचा, त्याचं उत्तर थोडंफार
मिळाल्यासारखं वाटलं. दोन्ही घटनांमध्ये इतर काहीही समान नाही, फक्त एकच - मनोवृत्ती.
वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती टिपीकल पुरूषी मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं,
मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये,
जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये..
एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता.
अर्थात हे सरसकटीकरण नाही.
समाजातील काही ठराविक वर्गांतील ठराविक लोकांचीच अशी मनोवृत्ती असेल.
त्यावेळी मला अशा समाजात राहणार्या स्त्रियांसाठी वाईट वाटत होतं ज्यांच्यासाठी या आणि याहून वाईट
शिव्या ऐकणे रोजचेच असेल, नेहमीच्याच शिव्या आणि मारहाणीने ज्यांच्या संवेदना बधीर झाल्या असतील.
त्याचवेळी या विचाराने हायसं वाटत होतं की सुदैवाने आपला जन्म एका सुशिक्षित, सुसंस्कृत परिवारात झालाय,
आपण अशा समाजात वावरतो जिथे साधारणपणे अशी प्रवृत्ती लांबपर्यंत दिसून येत नाही,
जिथे आपल्याला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आहे.
जिथे आपल्याला बर्यापैकी सन्मान मिळतो, कमी लेखलं जात नाही,
जिथे पुरूष स्त्रियांबद्दल टोकाचे वाईट विचार करत नाहीत,
जिथे सामान्यतः नवरे-बायकांना, मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहिणींना, पुरूष स्त्रियांना रिस्पेक्ट देतात,शिव्या नाही.
म्हटलं तर ही एक किरकोळ घटना, पण डोक्यात खूप सारे विचार, त्रास, मनस्ताप देऊन गेली.
अर्थात हा काही एकमेव प्रसंग नाही, असे अनेक नकोसे अनुभव येतच असतात,
फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही
तो एक स्त्री असल्याबद्दलचा पश्चात्ताप एका क्षणापुरतं का होईना, जाणवून गेला..
इतकंच..
याद्या
31365
प्रतिक्रिया
225
मिसळपाव
स्त्रीत्व हा तुमचा प्रमाद
अरे वा!!
अनेकवार लिहिलेल्या विषयावरती पुन्हा लिहावे लागते
++++++++++++१
In reply to अनेकवार लिहिलेल्या विषयावरती पुन्हा लिहावे लागते by चतुरंग
अगदी मनापासुन +१११११११
In reply to अनेकवार लिहिलेल्या विषयावरती पुन्हा लिहावे लागते by चतुरंग
भारतीय समाजात मुलांना वाढवले
In reply to अनेकवार लिहिलेल्या विषयावरती पुन्हा लिहावे लागते by चतुरंग
+११११११११११११११११११११११११११
In reply to अनेकवार लिहिलेल्या विषयावरती पुन्हा लिहावे लागते by चतुरंग
:)
In reply to अनेकवार लिहिलेल्या विषयावरती पुन्हा लिहावे लागते by चतुरंग
+१
In reply to अनेकवार लिहिलेल्या विषयावरती पुन्हा लिहावे लागते by चतुरंग
चतुरंग साहेब,
In reply to अनेकवार लिहिलेल्या विषयावरती पुन्हा लिहावे लागते by चतुरंग
+११११ पेठकर बुवा!!!
In reply to चतुरंग साहेब, by प्रभाकर पेठकर
https://youtu.be/6hoLR4dE2iE
मी आधी स्वतःहून मदत करीत असे
दुसरी बाजूही येऊ द्या समोर
In reply to मी आधी स्वतःहून मदत करीत असे by कैलासवासी सोन्याबापु
थोड़े थेट शब्द लिहितो आहे,माफ़ी
In reply to दुसरी बाजूही येऊ द्या समोर by तर्राट जोकर
खरंच संतापजनक आहे. प्रसंग
In reply to थोड़े थेट शब्द लिहितो आहे,माफ़ी by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to खरंच संतापजनक आहे. प्रसंग by तर्राट जोकर
अनुभव वाईटच आहे.. आणि
In reply to थोड़े थेट शब्द लिहितो आहे,माफ़ी by कैलासवासी सोन्याबापु
अहो तै ,
In reply to अनुभव वाईटच आहे.. आणि by पिलीयन रायडर
+११
In reply to अनुभव वाईटच आहे.. आणि by पिलीयन रायडर
काय नमुना आहे!
In reply to थोड़े थेट शब्द लिहितो आहे,माफ़ी by कैलासवासी सोन्याबापु
गो ताय,
In reply to काय नमुना आहे! by पैसा
वोक्के!
In reply to गो ताय, by कैलासवासी सोन्याबापु
खरंच संतापजनक अनुभव.
In reply to थोड़े थेट शब्द लिहितो आहे,माफ़ी by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबापू,
In reply to थोड़े थेट शब्द लिहितो आहे,माफ़ी by कैलासवासी सोन्याबापु
फारच धक्कादायक अनुभव ....
In reply to थोड़े थेट शब्द लिहितो आहे,माफ़ी by कैलासवासी सोन्याबापु
"कोणी मागितली मदत तरच करतो"
In reply to मी आधी स्वतःहून मदत करीत असे by कैलासवासी सोन्याबापु
असे अनुभव धक्कादायकच. पण
In reply to "कोणी मागितली मदत तरच करतो" by बिपिन कार्यकर्ते
काही काही खुप कडु अनुभव घेऊन,
In reply to मी आधी स्वतःहून मदत करीत असे by कैलासवासी सोन्याबापु
प्रगो आणि गिरीजाशी सहमत.
In reply to काही काही खुप कडु अनुभव घेऊन, by प्रसाद गोडबोले
अनाहिता काय अन सनावृता काय
In reply to काही काही खुप कडु अनुभव घेऊन, by प्रसाद गोडबोले
आणि सनावृत्ता शब्दाचा अर्थ
In reply to अनाहिता काय अन सनावृता काय by स्रुजा
कुठे आहे सनावृत्ता ग्रुप?
In reply to आणि सनावृत्ता शब्दाचा अर्थ by बॅटमॅन
सनावृत्ता ग्रूप वत्सप्पवर
In reply to कुठे आहे सनावृत्ता ग्रुप? by स्रुजा
अहो, प्रश्न कुणाला, तुम्हाला
In reply to सनावृत्ता ग्रूप वत्सप्पवर by बॅटमॅन
त्यामुळे स्त्री काय किंवा
In reply to अहो, प्रश्न कुणाला, तुम्हाला by स्रुजा
माझ्या अल्पमतीप्रमाणे अनहित
In reply to त्यामुळे स्त्री काय किंवा by प्रसाद गोडबोले
हेच लिहायला आले होते
In reply to माझ्या अल्पमतीप्रमाणे अनहित by प्रीत-मोहर
आणि आपल्याकडे एक काना
In reply to त्यामुळे स्त्री काय किंवा by प्रसाद गोडबोले
कर्माने म्येलास अता =))
In reply to त्यामुळे स्त्री काय किंवा by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to त्यामुळे स्त्री काय किंवा by प्रसाद गोडबोले
मला एक गोष्ट इथे सिरीयसली
भापो! :) _/\_
In reply to मला एक गोष्ट इथे सिरीयसली by पिलीयन रायडर
पिरा यांच्या या प्रतिसादामधे
समारोप...