Skip to main content

कविता

लेखक माहीराज यांनी शुक्रवार, 09/10/2015 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय चिऊताई... तु जिंकून घे जगाला, परी सावरुन मनाला, सांभाळुन ठेव पिलांना तु उंच उंच उडताना... सारी रात ही वैर्याची,नजर तिथे बहीर्याची, जाणिव नसे जिवांना धैर्याची अन् शौर्याची.. सांभाळुन ठेव पिलांना तु उंच उंच उडताना, तु जिंकून घे जगाला, परी सावरुन मनाला... किती उंच उंच ही शिखरे,गाठशिल छान उडताना, पाहता इंद्रधनुची मखरे आवरशिल का स्वत:ला, त्या चिमुकल्या जिवांना तुझी साथ हवी जगताना.. जाणिव ठेव जराशी तु उंच उंच उडताना, तु जिंकून घे जगाला, परी सावरुन मनाला.. ( जी आई आपल्या लहान मुलाला निर्दयपणे अनाथ आश्रमात सोडून जाते ..तिला उद्देशुन माझी ही पहीली कविता )

वाचने 4862
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया