प्रिय चिऊताई...
तु जिंकून घे जगाला, परी सावरुन मनाला,
सांभाळुन ठेव पिलांना तु उंच उंच उडताना...
सारी रात ही वैर्याची,नजर तिथे बहीर्याची,
जाणिव नसे जिवांना धैर्याची अन् शौर्याची..
सांभाळुन ठेव पिलांना तु उंच उंच उडताना,
तु जिंकून घे जगाला, परी सावरुन मनाला...
किती उंच उंच ही शिखरे,गाठशिल छान उडताना,
पाहता इंद्रधनुची मखरे आवरशिल का स्वत:ला,
त्या चिमुकल्या जिवांना तुझी साथ हवी जगताना..
जाणिव ठेव जराशी तु उंच उंच उडताना,
तु जिंकून घे जगाला, परी सावरुन मनाला..
( जी आई आपल्या लहान मुलाला निर्दयपणे अनाथ आश्रमात सोडून जाते ..तिला उद्देशुन माझी ही पहीली कविता )
वर्गीकरण
वाचने
4857
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिऊ ताई मुलाला अनाथ आश्रमात सोडतेय आणि
तिला जागा जिंकायचं आहे
In reply to चिऊ ताई मुलाला अनाथ आश्रमात सोडतेय आणि by विवेक ठाकूर
तिला जग जिंकायचं आहे. .आणि
तरी काही चुकले असल्यास माफी
जग जिंकायचंय तर
In reply to तरी काही चुकले असल्यास माफी by माहीराज
ही कविता आहे. इथे सारं काही