Skip to main content

(एक विडंबन_व्हॅलेंटाईन डे)

लेखक तर्राट जोकर यांनी शुक्रवार, 09/10/2015 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
संप्रेरक प्रपोज केले मला काल तू सॉरी पण तू खरंच फालतू विसरून जाण्या कुणा सांगतो दु:ख तुझे ते चुलीत घाल तू धीर ना तुला घडीभराचा गडी अजून तू लहान खुराचा उतावीळ बस पळण्या पाहिले ठोकली कुठे अजून नाल तू प्रेमाच्या कथा मनमानी अहंकाराची त्यास जोडणी लाजवाब हा नखरा घेऊन उलटी चालतो बघ चाल तू कशास धरली होती आशा जर उडवता येइना त्या माशा एकतर्फी हे मनोरथ ओढून स्वतःशी फसवले रे कमाल तू फसले नाही तुझ्या जालाशी म्हणून कैदाशीण का आज मी होतास फिरत तेव्हा मागे मागे म्हणशी अप्सरा, म्हणशी माल तू कवी: बुर्राट ठोकर (त.जो.)
लेखनविषय:

वाचने 2614
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आताच मूळ कवितेवर प्रतिसाद देऊन आलो... रॉ मटेरियल म्हणून, तोवर इथे त्यावर प्रोसेस होऊन प्रॉडक्ट हजर! थांबा, आता वाचतो!

भारी. दुसरं कडव्याबद्दल सलाम घ्या मालक. (सदस्यनाम लईच जमलय)

वैधानिक का काय तो इशारा म्हणून वर काढतोय. उद्या चौदाफेब्रारी. सव्वीस्ज्जानेवरी किंवा पंद्रागस्टच्या चालीवर...