इश्श…" म्हणुन मान खाली
घालतच नाहित,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
"नविन ड्रेस का ग?" विचारले तर
ह्यांना येतो संशय
"नाहि रे जुनाच आहे", म्हणुन
बदलतात विषय
नकट्या नाकावर लटका राग
दिसतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे
मग तिनेही खुदकन हसावे
कशाचे काय….आजकाल गालांना
खळ्या कशा पडतच नाहि
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
उद्या घोड्यावर होऊन स्वार
येईल एक उमदा तरूण
होशिल का माझी राणी विचारेल
हात हातात घेऊन
गोड गॊड स्वप्ने यांना आता
पडतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
पोर लग्नाची झाली म्हणुन,
घरी आई-बाप काळजीत
"माझा नवरा मी कधीच शोधलाय"
त्या डीक्लअर करतील ऎटित
घरून होकारासाठी कधी
थांबतच नाहित
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत.....
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7562
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त! :)
ही कविता
सहमत
In reply to ही कविता by ऋषिकेश
जुना विनोद आठवला
va chan ahe