उलटं सुलटं (दीड शशक)
लेखनविषय (Tags)
अरुंधतीचं पाककलेत मोठं नांव झालं होतं.
परीक्षक म्हणून जेव्हां तिला बेळगावला बोलावणं आलं, तेव्हां मीहि येतो म्हणालो,
तेव्हडचं वडिलाना भेटता येत होतं.
आईच्या माघारी पण त्यानी मंबईला येण्याचं नाकारलं,
माझं मी कसंतरी भागवीन म्हणाले.
संध्याकाळी बंडू सावंत लायब्ररीत भेटला, तिथं लायब्रीयन आहे तो,माझा वर्ग मित्र.
आणि त्यानं सांगितलं आणि गोट्या कपाळात गेल्या,
तसाच घरी आलो,आणि घेतलं फैलावर वडलाना,
काय कमी आहे तुम्हाला म्हणून हे थेर सुचतायंत़ ?
काय फाडून घेताय त्या पेपर मासीकातून?
मी त्याना बोलूनच देत नव्हतो,
बघू ती चिटोरी?
टँगला लावलेला तो गठ्ठा हातात घेतला,पाहू लागलो
“दरड कोसळून ४ ठार“ “ सचिनचे शतक हुकले“
“जाहीर नोटीस“ हे काय आहे बाबा? कसली कात्रण ही? म्हणून भिरकावला तो गठ्ठा,बाबा कोपर्यात मुक उभे
सौ.नं तो गठ्ठा उचलला, न्याहाळला. पुन्हा माझ्या हातात दिला.
“मलई कोफ्ता“ पंजाबी ग्रेव्हीज् बेसिक रेसिपिज्“ चायनीज् नूडल्स विविध प्रकार“
पत्नीनं आता दिलेला गठ्ठा नीट सुलटा होता माझंच बाबांच्या बरोबरचं वर्तन उलटं होतं
पहिल्यांदाच स्वताची शरम वाटली मला
प्रतिक्रिया
छान कथा. आवडली...!
कथा आवडली
छान कथा.
छान लिहिलीय कथा. आवडली.
आवडली.!!
छान....
आईशप्पथ. भारी लिहिलीय हो.
आवडली!
आवडली. पण थोडी अजून विस्तृत