Skip to main content

आठवण...

लेखक सतिश गावडे यांनी शुक्रवार, 02/10/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारपासून धो धो पाऊस पडतोय अगदी कोकणातल्या पावसासारखा तसा मी इथे आहेच कुठे मी आता कोकणातच पोहचलो आहे, त्या हिरव्यागार डोंगर टेकडयांवर, दुथडी भरुन वाहणार्‍या ओढयांकाठी सर सर तीरासारखे पाणी कापत जाणारे तुम्ही अन तुमच्या पाठोपाठ मी किती छान होतं ना आपलं आयुष्य फक्त आपणच होतो आपल्या आयुष्यात फक्त तुम्ही आणि मी गाव सोडलं आणि त्याबरोबर मी तुम्हालाही सोडलं आज तुमच्या आठवणींनी मन व्याकुळ झालंय डोळे भरून आलेत तुमच्या आठवणींनी आजुबाजूला कुणी नाही म्हणून बरं आहे नाही तर मला थेट पावसातच जाऊन उभं राहावं लागलं असतं कुठे असाल तुम्ही सारे आता, खरं तर तुम्ही नसालच आता, गाई म्हशींना कुठे वीसेक वर्षांपेक्षा अधिक आयुष्य असतं...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4293
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

वाह! अगदी सहज व्यक्त झालंय.. (आमच्या घरच्या गंगा गायीची आणि तिच्या वासरांची आठवण आली.)

मस्त धनाजीराव. सुटलेल्या अशा किती अन काय काय गोष्टींची खंत बाळगायची अन कमावलेल्या कशाचा माज करायचा तेच कळेना सध्या. :( असो, तुम्हासाठी केलेले टीशर्टचे डिझाईन बरोबर होते म्हणजे. d

गायी निदान २० वर्षं तरी रहातात. मांजरं तर नालायक ३/४ वर्षं, काही तर ६ महिन्यातच निघून जातात. :(

In reply to by पैसा

आमच्या मोठ्ठ्या बोक्याला ३ आठवड्यापुर्वी कोणीतरी विष घालुन मारलं :/!!!

आपण शांत बसलोय. आजूबाजूच्या वातावरणामुळे उगाचच भकास वाटू लागतं. एकटेपणा अंगावर येतो आणि अचानक जुन्या काही आठवणी अचानक डोक्यात गर्दी करू लागतात. आणि मग जखमेवरची खपली निघते, भळभळून रक्त व्हायला लागतं. होतं असं राव कधी कधी. :(