Skip to main content

गांधीजयंती निमित्त गझल

लेखक चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू यांनी रविवार, 04/10/2015 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
बापू जिकडे तिकडे हिंसा आता दिसते बापू जनतेला या गरिबी अजून पिसते बापू जेव्हा जेव्हा लूट पाहतो मी सत्याची तुझीच प्रतिमा मनात माझ्या वसते बापू शेतीचाही कणा मोडला दुष्काळाने शेतकय्रांचे जीवन झाले सस्ते बापू मातीमोल रे तुझी अहिंसा झाली आता सदा मनाला चिंता याची डसते बापू भिंतींवरचे फोटो नुसते नावापुरते जनता तुजला जयंतीलाच पुसते बापू खोटे नाटे सारे हे व्यवहार चालती कुठे कुणीही आज कसे रे फसते बापू? खरेच जर तू आठवला असता देशाला खून, दरोडे, बलात्कारही नसते बापू चुकलो आम्ही घे पदराला गुन्हे आमचे दाव खर्‍याचे सर्वांना तू रस्ते बापू मला दिलासा नको कुणाचा जगण्यासाठी हेच मला आधार जगाचे "हसते बापू" अजून देशोन्नतीच झाली असती जर का पुन्हा महात्मा बनून आले असते बापू गझलकार:चिमणराव वरवंटे(निवृत्ती पांडूरंग हागे)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2610
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छानच गजल!! :)

वा!

In reply to by दमामि

मालाअवरील बांधकाम पाहण्यास उत्सुक. हा टका कुठेय आणि जेपी दिसेना !!!! शोधू कुठं . प्रतिक्षार्थी नाखु

सगळ्याईचे मनापासून आभार मानते हा चिमणराव