Skip to main content

माझा गाव

लेखक लवंगी यांनी मंगळवार, 16/12/2008 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मनकोन्यात दडलय गाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| माडांच्या पानात सुरुच्या रानात वार्‍याची गाणी घुमती कानात देवळाच्या घंटेत श्रद्धाभाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| पाउलवाटेवर धुळीशी कुस्ती बैलगाडीतील मित्रांशी मस्ती पावसाच्या सरीत भिजलाय गाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| चमचमत्या वाळूत ओलीशी पावल आबांच्या राईत आभाळ मावल आजीची हाक घेते काळजाचा ठाव सागरलाटांवर डुलतेय नाव||
लेखनविषय:

वाचने 3452
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कविता आवडली. :)

पहिलीच कवीता आहे. इथे दूरदेशी राहून खूपच आठवण येत होती म्हणून ४ ओळी खरडल्या..

छान कविता! मुमुक्षु

कविता आवडली ! माडांच्या पानात सुरुच्या रानात वार्‍याची गाणी घुमती कानात देवळाच्या घन्टेत श्रद्धाभाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| .............मस्तच

अतिशय सुरेख कविता...! तात्या.

वाह वाह, छानच आहे, आवडले पुले शु ---- सखाराम गटणे