आमचा पण बिग बॉस भाग २
व. पू . ….
ह्यांनी बहुतेक सनी लिओन चा उल्लेख "सखी "म्हणून केलाय
ह्यांच्या अनुदिनी वरती ह्यांचा मनिला घातलेला आणि टक्कल पडलेला फोटो आहे .
"भाई कडे बघून "आपण सारे पी. एल." असं रंजलेल्या 'गांजलेल्या पुरुषां वरती असं खास एखादं पुस्तकं लिहायला पाहिजे . असो .
सखी आज सकाळीच दिसली . आमच्या पोरी असले कपडे घालत नाहीत म्हणून ह्यांच्या सारख्यांच फावत .
फिक्कट लिंबू कलर ची शिफॉन साडी ;माने पर्यंत रुळणारे दाट केस .अगदी किरण सारखी .
फक्त केसांवर सोन चाफ्याची कमी .अशा सौंदर्याला सुगंधाच कोंदण हवंच .
हि पोरगी म्हणजे वाऱ्याची झुळूक . अंगावरून जाते ; अमाप सुख,प्रसन्नता देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही .
माझं अस्तित्वच सखीमय झालंय .
Mr. काळे जागे व्हा . एक क्षण भाळण्याचा . बाकी सांभाळण्याचे .
she is certainly made for Apte's ; Garware's and कीर्लोस्कर्स ….
तसेही सुंदर बायकांचे नवरे सुखी नसतातच . रस्त्या वरून जाताना इतर कोणी आपल्या बायको कडे बघत नाही ना ?ह्याच्याच कडे ह्यांच लक्ष . म्हंजे ह्यांच्या डोळ्या पुढे सुंदर बायको ऐवजी कायम पुरुषच . आणि स्वतः प्रसन्न होण्याचे इतर किती क्षण निसटतात ह्याचा हिशोब नाही .
सखी संध्याकाळी मात्र जेवायला साधीच आली होती . पुरुषांच्या बुभुक्षित नजरांचा सामना किती वेळ करणार ?
मी तीला समजावलं …"फुलणं हा फुलांचा धर्म . त्याला भुलण हा भ्रमराचा . भ्रमर भाळतील म्हणून फुलं फुलायची थोडीच राहतात ?"
गो. नि. दांडेकर ;
आप्पांची अनुदिनी म्हणजे शब्दप्रभू चे सजीव लेणे . एखाद्या आजा नि आपल्या पोरक्या नातवाला मांडीवर घेऊन तिन्ही सांजेला दूध भात भरवता भरवता सगळ्या आयुष्याचं सार आईच्या मायेनं सांगाव अशी माया प्रत्येक शब्दात.
एक एक शब्द तोलून घ्यावा .
"sunny बाळ आज रडली . श्रीमंतीत वाढलेली पोर . कामाची सवय नाही . वेदना अपरिहार्य आहे .
वेदनाच खरंतर सुखाच मूळ . नऊ महिने कळ सोसल्या शिवाय पान्हा कसा येणार . वेदनाच नसती तर माणसांनी सुख कसं भोगलं असतं
तीला समजावून समजावून सांगता सांगता साक्षात योगेश्वर पण थकला असता . मी तर मर्त्य .
संह्याद्री मला बोलवतोय . मला इथे नाही थांबता येणार .
बुद्धाला बोधी मिळाला . ज्ञानेश्वराला अजान वृक्ष मिळाला . आमच्या डोक्याला संह्याद्री ची चंद्रप्रकाशाच्या दुधात मुरलेली नागफणी . पण आम्ही तिथेही करंटेच राहिलो . संह्याद्रीची माया आम्हास स्वतः मध्ये साठवता आली नाही .
सह्य कडा म्हणजे प्रेमळ ;आपल्या आईविना पोरा साठी लग्ना विना राहिलेला बाप .
पूर्वे कडून येणारे काळे ढग आपल्या छाताडा वर थांबवून महरष्ट्राची तहान भागवणारा . दर वेळी झीजत झीजत दिवाळीला पूर्ण महादेशाला हिरवं लेणं देऊन माहेरपण करणारा .
ह्याच्या संसारात लेकर तरी किती असावीत ?गणतीच नाही . आपापल्या झापा मधून रान शेण्यांची शेकोटी करून पावसाळ्यात गोठणारे धनगर ;ढोलिया च्या तालावर झपूर्झा होणारे ठाकर , बोलक्या डोळ्यांचे संह्याद्रीचा काटक पणा घेणारे कातकरी ;गोंड .
खरंच एका बापाचा पान्हा ह्या सगळ्यांना जगवत ठेवतोय .
sunny च्या पापणीआड दुथडी भरून वाहू पाहणारी भीमा कशीबशी रोखली गेलीय .
मी तीला म्हटलं नर्मदा मैया आणि संह्याद्री ला शरण जा . रोज एक श्लोक मैयेला वहात जा .
तुझी काळजी आता त्यांची चिंता .
शुभम भवतु I नर्मदे हर हर ….
अनंत सामंत
सेकंड मेट "अनंत "ची रोजनिशी एखाद्या लॉग बुक सारखी . रोजच्या रोज तीन वेळा;जागेच्या नावा सकट नोंदी .डायरीच प्रत्येक पान वेगळ्या वेगळ्या रंगाच . एखाद्या रंगेल खलाश्याच्या प्रत्येक बंदरा वरच्या वेग वेगळ्या घरा सारखं .
"ऍना बेसिलोना च्या नशेतून मला बाहेर काढू शकणारी स्त्री अजून जन्माला यायचीय .
ह्या सनी सारख्या कैक वादळान वर एखादा सामान्य दर्यावर्दी सुद्धा मांड टाकू शकतो .तीथे कॅप्टन रॉस च्या हाताखाली तयार झालेला हा "सेकंड" कसा काय विरघळेल ?
जेंव्हा जहाजं लाकडाची होती आणि खलाशी पोलादी होते तेंव्हा पासून कागदी खलाशी आणि पोलादी जहाजं पाण्यावर यायला लागे पर्यंत एकच गोष्ट कायम राहिलेय … ती म्हणजे ह्या सनी सारख्या बेलगाम ;बेफाम आणि बेधडक वादळाला स्वतःच्या राकट पौरुष्या वर झुकवणारा खलाशी .
म्हणूनच विध्वंस करणाऱ्या वादळां ना मुलींची नावं देतात . आणि ते वादळ सुद्धा पौरुषेय पहाडा पाशी जाऊन थंडावत.
ह्या पोलादी खलाश्या ला दिवसें दिवस समुद्रावर स्वार होऊन गंज लागतो ; तेंव्हा तोच खलाशी स्त्रीस्पर्शानी कात टाकतो ;त्याचा पौरुष्य पुन्हा झळाळून उठत आणि तो परत भयाण लाटांवर आरूढ होतो.
हि सनी सुद्धा तशीच . एखाद्या खारं वारं पिउन बेफाम गलबताच्या माजावर आलेल्या शीडा सारखी . भरगच्च आणि ताठ .
पण हा "सेकंड " हाडा मासांचा खलाशी आहे .असल्या वादळान मुळे भरकटणारा "Bloody landlubber" नाही.
माझं स्वतःच सर्वस्व ऍना बेसिलोना नावाच्या शांत ;काळ्याभोर डोळ्यांच्या समुद्राच्या तळाशी मी विसर्जन केलंय . आणि आता ते चिरनिद्रा घेतंय .
तेंव्हा सनी माझ्या मार्गातून बाजूला हो . मी भरकटणारा नाही .
किरण प्रेमी, पोरांवर वैतागल्या वर " शितू "वाचणारा ,बायको मध्येच ऍना बेसिलोना गवसलेला……. यमन
क्रमशः ….
Book traversal links for आमचा पण बिग बॉस भाग २
वर्गीकरण
प्रतिक्रिया
:D
मस्तं चाललंय ! और आंदो :)
हे पण मस्तच
साॅलिड!
जबरदस्त!
सही!!
अफलतून
सहीच..;)
निव्वळ
अनंत सामंत "एम टी आय वा मारू
भारीच की राव....
'गोनिदां' ना सन्नी लिओनी
'गोनिदां' ना सन्नी लिओनी
आपण सन्नी बाईंची बाजू घेणं
आपणांस मुद्दा कळलेला नाही
आपणांस मुद्दा कळलेला नाही
अंताक्षरी (गाण्याच्या भेंड्या
लो आज मै कहती हू ..... 'आय ला
लोल लोल रोफल!
=))