Skip to main content

अतूट काही...

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 01/10/2015 18:20 या दिवशी प्रकाशित केले.

पाप पुण्य अन् काल आजच्या
पल्याडही जर असेल काही,
अनादि, आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी ...

काळाची विक्राळ कातरी
कापू पाहते त्या धाग्याला..
जळजळीत कधी चटके देतो
तीव्र अतीव दु;खाचा प्याला..

गळ्यात बेडी अंध भक्तीची
प्राण तिचे कंठाशी येती..
डोळस, निर्दय नास्तिकतेचे
घाव बैसती माथ्यावरती ..

पण
अतूट आहे टिकून अजुनी
जीर्ण बकुळीसम ती ताजी..
अनादि आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी..

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1996
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

पाप पुण्य अन् काल आजच्या
पल्याड असेल जर ते का काही,
आदीम अनादी त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी ...

विक्राळ कातरी ती काळाची
कापू पाहते त्या धाग्याला..
जळजळीत कधी चटके देतो
तीव्र अती दुःखाचा प्याला..

गळ्यात बेडी अंध भक्तीची
प्राण तिचे कंठाशी येती..
डोळस, निर्दय नास्तिकतेचे
घाव बैसती माथ्यावरती ..

पण
अतूट आहे टिकुनी अजुनी
जीर्ण बकुळीसम ती ताजी..
आदीम अनादी त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी..

माफ करा! थोडा बदल केला! पण आता लयीत बसतेय असं वाटतंय मला! पुन्हा गुणगुणून बघा पाहू!
बाकी उत्तम!!!


In reply to by दमामि

चालतंय रे दमामि! भांडणं वादविवाद सगळीकडंच होतात! मिपा तरी का वर्ज्य त्याला? आपण त्यातून मॅच्युअर होत जाणे महत्वाचं नाही का?