मी गोंधळलेलो असता
ती ठाम राहिली होती
मी दिशाहीन असताना
ती नाव वल्हवत होती
ती लक्ष अंधार-किरणे
अंगावर आदळत होती
अंधार अभेद्यच असता
ती मिणमिणतच हो होती
जाणीवा मजला नसता
भोवती तर्कदुष्ट ते फार
ती तर्कशुद्ध नसती तर
जीवास कायमचा घोर
ती दुसरी नसोन कोणी
जी असता असते शुद्धी
प्रेयसी अन ही सखी हो
माझीच शाबुत "बुद्धी"
--ऋषिकेश
टीपः
१. माझ्या बालबुद्धीप्रमाणे मी मात्रा नीट मोजल्या आहेत. जिथे जिथे चुकले आहे ते नक्की दाखवून द्या!
२. मला व्रुत्त म्हणावे तितके कळले नाहि तरी जे काहि कळते त्यानुसार प्रयत्न. जास्तीत जास्त चुका कोणीतरी दाखवून द्याव्यात हा उद्देश!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2486
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऋषिकेशराव,
> पंत अधिक
In reply to ऋषिकेशराव, by घाटावरचे भट
गेयता
हे कसे वाटते?
In reply to गेयता by सुनील
मैत्रिण
In reply to हे कसे वाटते? by घाटावरचे भट
ऋषिकेश प्रयत्न उत्तम आहे.
अरे
वा! सुंदर
ऋषिकेश
माझीच शाबुत "बुद्धी"