Skip to main content

फेस बुक बरची भुताटकी..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/09/2015 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
फेस बुक बरची भुताटकी.. माधव चे फेसबुक वर अकाऊट होते... त्याला फेस बुका वरली माधवीची प्रोफाईल आवडली. दोघांची मैत्री झाली च्याटिंग सुरु झाले भेटी गाठी वाढल्या.. पण बेक अप झाले,,माधवीस हा धक्का सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. माधवला पण याचे खुप वाईट वाटले पुढच्या च्या आमावस्येच्या दिवशी माधव फेस बुकावर गेला अन अचानक च्याट विंडो उघड्ली व अक्षरे आली ..."हाय".. माधवी च्याट करीत होती....पिंग पिंग पिगु लागली ... माधव घाबरला. व तिच्या अकौंट वर गेला तर ते अकौंट डिलीट केलेले दिसले. परत आपल्या अकौंट वर आला तर "तू जहा जहा रहेगा मेरा साया साथ होगा" हा व्हिडिओ अप लोड झालेला दिसला व तो चालू झाला माधव घामाने डब डबला..वेळ रात्रीची होती पण घामाने चिंब झाला त्याने भीतीने कम्पुटर बंद केला ... रात्र जागून काढली .. ऑफिस मध्ये गेला व काम्पुटर उघडला तर मोझीला चे ब्रौसर उघडले गेले व त्याचे फेस बुकाचे पेज समोर आले च्याट विंडो उघडली गेली व व्हिडिओ च्याट साठी माधवीचा आत्मा आला .. चित्र धूसर दिसत होते..अक्षरे उमटू लागली.."माझ्या जगात ये अन मला भेट"....माधव घाबरला.. त्याला हा सारा ताण असह्य होऊन त्यानेही जीवन यात्रा संपवली आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस बुकावर आहेत व ते च्याट करतात .
लेखनविषय:

वाचने 11153
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

In reply to by मांत्रिक

आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस बुकावर आहेत व ते च्याट करतात
त्यांना अपत्ये झाली असतील का? झाली असतील तर त्या बालभुताचे नाव काय असेल?

In reply to by प्रचेतस

चांगलं लिहिताय काका. आपलं काय ठरलंय ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो हो. प्रोत्साहण द्यायचंय नै का. :)

In reply to by प्रचेतस

इतक्या अभिजात लेखनाला सुरुवातीला नावे ठेवल्या बद्दल मी तुमचा जाहीर णिषेढ करीत आहे !

काय सांगताय काका? भयंकर आहे सगळं... मार्कला कळलंय का हे? किमान मोदींनी तरी आज हा मुद्दा उपस्थित करायलाच हवा!

एकदम समयोचित. विशेषतः "आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस बुकावर आहेत व ते च्याट करतात ." हा पंच तर एकदम जबरदस्त. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

अकुआजोबा किती चान चान बालकथा लिवतात !

In reply to by प्यारे१

त्ये बाल कथा म्हणजे तुम्ही (स्वतःचे डोईवरचे केस उपटू लागाल) या कथा वाचून म्हणून "बाल" कथा "बाल"क असलेला पालक नाखु

In reply to by नाखु

अच्छा! मतलब कथा पढनेके बाद आप 'ना'बालि'ग हो जाओगे????

In reply to by सस्नेह

ते कशालाही बालकथा म्हणतील ओ.... अकु काका आहेत ते. उद्या मंदाकिनी ला पण बालकथा म्हणेल कुणीतरी कारण त्यातला हीरो शाळेत जातो. कुणी लिंकाळ्या लिंक देईल काय पराच्या त्या कथेची????

एकदम समयोचित. विशेषतः "आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस बुकावर आहेत व ते च्याट करतात ." हा पंच तर एकदम जबरदस्त. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
"आजही दोघांचे आत्मे अकाऊट मिपावर आहेत व ते (अ) च्याट लेखन करतात ." स दा धांदरफळे अभामिपानिसोअकुजीमोदिगुकथावाचन्समीती कडून वाचक हितार्थ जारी भैताडवाडी,डोक्याला शॉट नगर जि:भुस्काट राज्य महान राष्ट्र

In reply to by आदूबाळ

बेक अप झालं तर चानच झालं ना ? म्हंजे, आसं बगा, काय ना काय शिजलं आसलंच ना ?! म्हंतात ना की, "केकची पुंगी, वाजली तर वाजली, नायतर ब्रेड म्हणून खाल्ली"

आता समजलं. ते असं का वाटत होतं. रच्याकने कुठली च्याट करतात आत्मे? मला पापडी च्याट लय आवडते!

In reply to by बॅटमॅन

रच्याकने कुठली च्याट करतात आत्मे
आत्मे बहुतेक भूतप्रणयगीतांना चाली लावुन देत असावेत =))

In reply to by प्रसाद गोडबोले

आंजावरील भुतांचा वाचकांवर "भूतजिल्बीप्रयोग" करण्यात हातखंडा आहे असे ऐकून आहे :)

मस्तं कथा ! असे अनेक त्रस्त आत्मे वारंवार आयडी बदलत मिपावरसुद्धा फिरताना दिसतात... एकंदरीत हा रोग सर्व आंतरजालाला व्यापून दोन अंगुळे उरलेला आहे असेच दिसत आहे ! ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

समयोचित कथा... असे अनेक "गहनविचारी, नाना प्रकारे आणि उद्दामपणे" येतच असतात. नावे अनेक पण मूळ वृत्ती एकच.

कसली कोडाईकनाल भूछत्र कथा आहे.अहाहा!

In reply to by पैसा

"ध्यान" करायची तुमची तयारी आहे का बोला?????? "ध्यान" चा अर्थ आप्ल्या जबाबदारीवर आणि मगदूराप्रमाणे घेणे.

अकुं ! अप्रतिम निव्वळ अप्रतिम लेखन ! तुमच्या लेखनाचा आधीपासुनच फॅन होतो , मिपावर आल्याचे आता सार्थक झाला सारखे वाटते ! लिहित रहा हो .... बर्‍याच जणांना प्रतत्न करुनही असे लिहिता येत नाही

आपण काकाश्रींच्या लिखाणाचे फ्यान हौत. मजा आली काकाश्री! लिहीत रहा....