लोकमान्य टिळकांचे अग्रलेख विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे
मराठी विकिस्रोत प्रकल्पात टिळकांचे केसरीतील लेख भाग ४ संकीर्ण लेख संग्रह (सामाजिक धार्मिक वाङमय विषयक) ग्रंथ उपलब्ध केला आहे. या ग्रंथाची पाने वाचण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रंथातील पानांचे युनिकोडात टंकनासाठी सामुदायीक टंकन योगदानाची गरज आहे.
शिवाय लोकमान्य टिळकांच्या श्रीमद्भवद्गीतारहस्य च्या टंकनाचेही काम अद्याप बाकी आहे.
(टंकन करताना कृपया मूळ लेखनात र्हस्व दीर्घाचाही बदल करू नये जसे आहे तसे टंकावे प्रूफ रिडींग झाल्याचे पानावर नोंदवल्या नंतर विकिस्रोत प्रकल्पात पाने संपादनापासून सुरक्षीत करण्याची प्रचालकांना सुविधा असते.)
भूमिका:
नमस्कार,
मि.पा. वाचकांना माझे वेगवेगळे धागे बर्याच वेगाने आल्याने जरासा जाच होत असणार त्यात अजून एक धागा जोडताना मन द्विधा असलेतरी हाताशी आलेल्या विषयात रस असलेल्यांची संख्यापण बरीच असेल म्हणून धागा लेख लगेच प्रकाशित करण्याचा विचार करत आहे.
लोकमान्य टिळकांच्या (राजकारणेतर) सामाजिक विषयावरील अग्रलेखांचा भाग असलेला खंड उस्मानीया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होता. उस्मानीया विद्यापीठाचे संकेतस्थळ एकतर बहुतांश वेळा न उघडणे आणि सुयोग्य पद्धतीने शोध घेण्याची सुविधा नसल्यामुळे लोकमान्य टिळकांच्या बहुचर्चित अग्रलेख आंजावर उपलब्ध असूनही सापडत नव्हते. आज योगा योगाने जेवढ्यावेळासाठी उस्मानीयाचे संकेतस्थळ उघडले त्यात तो ग्रंथ मराठी विकिस्रोतावर स्थानांतरीत करून घेतला.
लोकमान्य टिळकांचे सामाजिक विषयांवरील अग्रलेखातील मत प्रदर्शनाबद्दल मतमतांतरे असू शकतात पण अद्यापिही त्यांच्या मतांबद्दल चर्चा होते. पण दुर्दैवाने आंतरजालावरील बहुतांश चर्चा मूळ संदर्भांचे दाखले नमुद न करता लोकमान्य टिळक त्यांच्या अग्रलेखातून प्रत्यक्षात काय म्हणाले याचे वाचन आणि दाखले न देताच तेच ते दळण सातत्याने दळले जाताना दिसते. एवढे करून प्रत्यक्षात मूळ व्यक्ती मूळ स्वरुपात काय म्हणाली म्हणू इच्छित होती याचा बोध होत नाही. प्रत्यक्षात संबंधीत ग्रंथ युनिकोडातून शोधण्यास आणि संदर्भ सुलभ झाल्यास सर्वांनाच उपयूक्त ठरू शकेल. काम चालू करताना मोठे वाटेल पण प्रत्येकाने परिच्छेद दोन परिच्चेद जरी मराठी विकिस्रोत प्रकल्पात टंकन करून दिले तर काम पार पाडणे अशक्यही नसावे. सामाजिक-राजकीयदृष्ट्या विवाद्य विषयांपलिकडे सुद्धा लोकमान्यांनी बरेच काही संदर्भ मुल्य असलेले लेखन केले आहे. पण युनिकोडात टंकण्याची मेहनत केल्याशिवाय संदर्भ सुलभ होऊन अधिकाधीक लोकांच्या वाचनातही येणार नाही.
विकिस्रोतात इतरही लेखकांचे प्रताधिकारमुक्त साहित्य टंकनासाठी आणि अनुवाद करून देण्यासाठी उपलब्ध आहे.
(*तळटिप: मराठी विकिस्रोत प्रकल्पाबद्दल अधिक माहिती या ऑनलाईन सादरीकरणात सुद्धा उपलब्ध आहे.) )
माझ्या लेख धाग्यांच्या वाढलेल्या संख्येबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व
माझे लोकमान्य टिळक विषयक यापुर्वीचे मिपा धागालेख
१) लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य
२) लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद
३) लोकमान्य टिळक आणि अनुवाद
*मराठी विकिस्रोत प्रकल्पात
**टिळकांचे केसरीतील लेख भाग ४ संकीर्ण लेख संग्रह (सामाजिक धार्मिक वाङमय विषयक)
**श्रीमद्भवद्गीतारहस्य
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी एक अग्रलेख टंकित करून देईन
काही हरकत नाही
मी देखील एका लेखाचं टंकन करून
अवश्य, आपल्या आवडीच्या
शुभेच्छा!
शुभेच्छांसाठी धन्यवाद. काही
शुभेच्छा!
:) पुन्हा वाचल्यावर लक्षात
"लोकमान्य टिळकांचे अग्रलेख
अरे बापरे, डॉक्टरांनी सूचना
मंडळी, विकिस्रोतात उपरोक्त
मी देखील..
या प्रकल्पात बर्यापैकी
कोणते अग्रलेख?
आपण विकिस्रोत बद्दलचे
धन्यवाद
मंडळी बर्याच जणांना सुट्ट्या
मी पण एखादा देईन टाइप करुन,