Skip to main content

राधा कृष्ण....... जर...

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
"राधा" घननीळा, का अवेळीच तू या राधेला परत भेटला? विराण आता झाले गोकुळ जुना पुराणा कदंब वठला अता न उरली स्वप्नामधली तरल अनामिक धूसर नाती कुठे पाहसी कृष्णा मधुबन भयाण या अवसेच्या राती कालिंदीचे उदासले जळ अता लोपली त्याची खळखळ नि:शब्दाचे पिसाट वारे ठेवून फिरते उरात खळबळ अता न उरल्या काठावरच्या कुरणातिल चरणाऱ्या गायी टपोर त्यांच्या डोळ्या मधली दूर हरवली वत्सल आई तुझ्या करातील सुस्वर मुरली आठवते केवळ प्राचीनता चैतन्याचा सूर हरवूनी फक्त विराणी गाते आता सांग, कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागिल संमोहन अता कुठे उरला राधेचा तो पूर्वीचा घननिळ मोहन? आणि इकडे कृष्ण ........ मी शोधतोच आहे माझ्या मनात राधा युग संपले तशी का गेली लयास बाधा? सर्वस्व सोडले मी, हा धर्म रक्षिण्याला कल्पांत भोगताना पण राहिलो अकेला मी वेड लाविले का केले मलाच वेडे? जन्माहुनी निराळे पडले अगम्य वेढे हे कोणते किनारे? येथे विराट लाटा अभिशापिता परी या उध्वस्त सर्व वाटा मी गुंतलो कसा, या गुंत्यास थांग नाही एकांत भोगणाऱ्या जन्मास अंत नाही भोवंडुनी दिशा या गाती मला विराणी स्वप्नात काळनिद्रा स्मरते जुनी कहाणी.....!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3592
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सांग, कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागिल संमोहन
याऐवजी सांग कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागील ते संमोहन असे पाहिजे. बाकी कविता क्लासच! विस्ताराने लिहिन यावर!!!

जगाच्या कल्याणासाठी झटणार्या विभूतींचे वैयक्तीक आयुष्य कसे विराण होते त्याचे वर्णन आहे. त्या दृष्टिकोणातून वाचा कविता. समजेल!!!

राजे!!! मिपावर वाचक आणि प्रतिसादक म्हणून देखील रहा! अन्य लेखकांना त्याचीही अपेक्षा असते. केवळ लेखनमात्र रहाल तर ईतर लोक दुर्लक्ष करतील!!! पूर्ण डुबकी मारा मिपामध्ये!!! मगच गंमत कळेल!!!

अता????? देशपाण्डे आपणच का? कविता आवडली हो!

सुंदर कविता. या वरून आठवले एकदा वृंदावनात यमुना घाटावर एका बकरीला एका वाळलेल्या झाडाच्या बुंध्याला बांधलेले होते, ती मे मे करत होती, ते दृश्य पाहून मला हसूच आले, था जहां कभी कदम्ब का पेड़ बजती थी मुरलिया मोहन की. आज वहां है ठूँठ भर करती है बकरी मे में भर. शेवटी काले तस्मे नम: