Skip to main content

..पापड कर वा पोळ्या लाट..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी मंगळवार, 22/09/2015 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता सरळ भुमी सपाट तरीही माझी चुकते वाट... पंगतीमागुन पंगत उठली.. मेल्यानंतर भलता थाट.. दो मृत्युंच्या शिखरांमध्ये आयुष्याचा अवघड घाट.. जरा किनारा दिसला आणि लाटेमागुन आली लाट... आयुष्याचे पीठ मळवले.. पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!! - योगेश
लेखनविषय:

वाचने 2516
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान

दो मृत्युंच्या शिखरांमध्ये आयुष्याचा अवघड घाट..
हे फारच आवडले आहे