Skip to main content

मोसाद

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 15/09/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बर्याचदा MI६ अथवा जेम्स बॉंड बद्दल बऱ्याचदा वाचतो, ऐकतो पण मोसाद विषयी माहिती काहीच माहिती नाही ऑपरेशन रेड फाल्कन अथवा मोसाद विषयी मराठीत काही माहिती आहे का ? अशी माहिती असल्यास वाचनास अधिक मजा येईल त्या अनुषंगाने हा धागा निर्माण केला आहे.

वाचने 21378
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by बोका-ए-आझम

अॅडाॅल्फ आईकमनचं अपहरण
याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे आणि वाचनीय पण 'हाउस ऑन गारीबाल्डी स्ट्रीट' असे मुळ पुस्तकाचे आणि (मराठी अनुवादाचेपण) नाव आहे. अनुवादक, प्रकाशक आठवत नाही.

पन्नाशी निमित्त धागा लेखकाचे व मोदकरावांचे अनुक्रमे "धागा चार आण्याचा प्र(ती)साद सव्व रुपयाचा"(चारोळी संग्रह) आणि "मोदकांचे २१ प्रकार (एक पाककल्ला पुस्तीका)" या बरोबरच गणपती आरतीचे संग्राह्य पुस्तीका आणि नारळ (पाणी असलेला) देऊन करण्यात येत आहे. सत्कारार्थी अभा मिपा संचालीत जेपी-मित्रमंडळ आणी तमाम बिनपावतीपुस्तक वर्गणी कार्यकर्ते.

In reply to by नाखु

तुमच्या सत्काराने भरून पावलो फक्त आरतीच्या पुस्त्काएवजी ऎखादि युद्धकथा दिल्यास उत्तम ( युद्ध करण्याची खुमखुमी जास्त अजून काय )

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

एका धाग्यावर दहशतवादाला पाठिंबा देणारे दुस-या धाग्यावर जेव्हा दुस-यावर दहशतवादाचा आरोप आणि तोही पुरावा नसताना करतात तेव्हा फार हसायला येतं बुवा. अजून येऊ द्या.

In reply to by बोका-ए-आझम

ह्या असल्या कुजकट आणि संकुचित आत्म्यांसाठि, नाखु साहेबांनि फार छान लिहिलय. सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

या प्रतिसादा(काडी)मुळे वाढलेल्या ट्यार्पीसाठी धागालेखक आपला अत्यंत म्हंजे यक्दम अत्यंत आभारी होईल =))

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

'नागपूर ला जन्मलेले संघिष्ट' नंतर फुलथ्रॉटल जिनियस यांचे आणखी एक मुक्ताफळ. जस्ट अवेसोमे. :) बाकी असं काही खरंच लोक करत असतील तरी वाईट वाटून घेण्याचं काही कारण आहे असं वाटत नाही. आपल्यातले (असं म्हणावं का हा प्रश्न आहे खरं तर) काही अहिंसावादी आणि थंड रक्ताचे लोक आयसिस कडे वळताना पाहून वाईट वाटतं इतकंच.

In reply to by प्यारे१

.....आणखी एक मुक्ताफळ." फुलथ्रॉटल जिनियस, उधळत असलेल्या ज्ञान कणांना, "मुक्ताफळे" असे म्हणू नये.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

मध्यपूर्वेतले सगळेच लोक अतिरेकी आहेत असं कुठे म्हटलंय कोणी? आणि मोसादविषयी किंवा अमेरिकेविषयी इथे कोणाला उमाळा असेल असं वाटत नाही. उमाळा सहानुभूतीपायी येतो आणि सहानुभूती ही ना कधी इझराईलने मागितली आहे ना अमेरिकेने. त्याबद्दल असलंच तर कौतुक आहे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

सध्या आयसिस हे प्रकरण या मोसादचेच असावे,
फक्त "असावे" असा म्हणून अंदाज व्यक्त करायचा असेल जागोबाजी माहुलकर सहकारी पतपेढी,मु. पो. शिरजगाव कसबा,ता. चांदूर बाजार, जि. अमरावती यांचा आयसिस संस्थेला आर्थिक पाठिंबा आहे असा माझा अंदाज आहे.

In reply to by होबासराव

फुलथ्रॉटल जिनियस, हे फार ज्ञानी व्यक्तीमत्व आहे. पण ते आपले ज्ञान दुसर्‍याला देत नाहीत. उदा. http://misalpav.com/comment/reply/31763/712577

मधला जो एकमेव इझराईली अधिकारी ठार झाला, त्याचं नाव जोनॅथन नेतान्याहू. इझराईलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा सख्खा मोठा भाऊ.

In reply to by बोका-ए-आझम

जोनॅथन नेतान्याहु कोणाच्या चुकीने मारला गेला या बद्दल अजूनही इस्त्रायल मध्ये वाद सुरु आहेत