Skip to main content

वर्‍हाडी चिकन रस्सा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 10/09/2015 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
(एकदम बेसिक वर्‍हाड़ी चिकन रस्सा) 1 लागणारे साहित्य: चिकन - अर्धा किलो, तेल - पाऊण मोठी वाटी, कांदा - १ मोठा चिरून (चमचाभर तेलावर भाजून बारीक पेस्ट केलेली), लसूण - १ मध्यम आकाराचा गड्डा, हिरव्या मिरच्या - २, आलं - बोटाच्या १ पेराइतका तुकडा, (आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट) सुक्या खोबऱ्याचा तुकडा - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले, जिरे - १ चमचा, दालचीनी- अर्ध्या बोटा एवढा १ तुकडा , मिरे - ७ ते ८, लवंग - ४ ते ५, मसाला वेल्दोड़े- २, धने - एक चहाचा चमचा तेलात भाजून (+ मिरे + लवंग + विलायची + दालचीनी + जिरे) बारीक केलेले, कोथिंबीर बारीक चिरून, तिखट, हळद, मीठ. क्रमवार पाककृती: चिकन ३ वेळ पाण्यात धुवून घ्यावे. त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे. ३ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे. (पाणी घाला अगदी थोड़े बुडाला लागु नये म्हणून. तसेही चिकन पाणी सोडत) शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय खासम ख़ास तेलाची तर्री हवी असल्यास तेल जास्त टाका, sincerely वर्‍हाड़ी रश्यात ती हवीच). तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी, धने आणि इतर जिन्नस असलेली मसाला पूड घालून परतावे, त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी. त्यात ५ चमचे तिखट, दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवताना टाकलेल्या मिठाला विसरु नये). आता त्या फोडणीत अर्धा ग्लास पाणी टाकून झाकण ठेवावे. दोन मिनिटात फोडणी आणि त्यातली तर्री वेगळी झालेली दिसेल. त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे. दीड ते २ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे. आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे. ५ मिनिटांनी असले फोटो काढता येतात मग. 1 *माझ्याकडे कोथिंबीर नव्हती ********** ("सदरहु पाककृती ही टीना ह्यांची असुन मी त्याच्यात बेयर मिनिमम सामान वापरून मी बनावली आहे तस्मात् ह्या पाककृती चे श्रेय टीना ह्यांचेच आहे")

वाचने 40384
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ते दिलेच आहे की हो बाप्पा, पण हिथे बी द्यायला हवे होते, इतकेच सुचवत आहे :)

In reply to by यशोधरा

म्हंजे हिथे त्या नसल्या तरी श्रेय द्यायला हरकत नव्हती असे म्हणायचे आहे, बाकी काय बी न्हाई.

In reply to by यशोधरा

हो, थोड़े से चुकलेच माझे! हरकत नाही आता सुधारतो ती चुक ,
"सदरहु पाककृती ही टीना ह्यांची असुन मी त्याच्यात बेयर मिनिमम सामान वापरून मी बनावली आहे तस्मात् ह्या पाककृती चे श्रेय टीना ह्यांचेच आहे"
:) (धांदरट) बाप्या

In reply to by यशोधरा

तुम्ही कश्याला थैंक्स म्हणताय ताई! मलाच सॉरी म्हणायचे आहे! :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मुद्दा समजून घेऊन श्रेयनामावली छापल्याबद्दल =)) सॉरी न् फिरी काय करायचे आहे. सोल्जरकडून सॉरी म्हणून घेतल्याचे/ऐकल्याचे पाप लागेल ना बाप्पा, तर ते नकोच.

In reply to by यशोधरा

वाद घालणे मुळातच आवडत नाही, शिवाय झाली चुक तर झाली त्यात किंतुपरंतु नाही अन कारणे देणे ही, चुक मानायलासुद्धा हिंमत लागते ती सुदैवाने शाबूत आहे अन ती सुधारायची इच्छा पण! बाकी कसले सोल्जर अन कसले काय सगळी इथून तिथून माणसेच!

वांगे भारी लागते या रस्श्यात. एकदा पेठकर काका म्हणतात तसे सुरण घालून करून पहावी म्हणतो. (स्वगत: चल बाप्पा आता सुरण शोधायला)

मिपावर पाकृ टाकली ती मायबोली वर आलेल्या पाकृ चा उपयोग करून टाकली काय? तसं असेल तर सांगायला हरकत नाही. काही जणांसाठी - एखादा लेख एखाद्या साईट च्या रेफेरेंस ने आला तर त्यालाही हरकत असू नये ना? भले तो ती ते त्या संस्थळाची जाहिरात करत असले तरी? मागे झालेले काही वाद आठवले ब्वा!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बडनेरा कॉलेज जवळ होते आधी आता तिकडे शिफ्ट झाले असेल । आणी चाणक्य

In reply to by त्रिवेणी

नाही नाही अंजनगाव सुर्जी अन अंजनगाव बारी दोन विरुद्ध टोके आहेत!

In reply to by टिना

बघणारा pc वरुन गूगल वर logged in असेल तरच चित्र दिसतात. मी flikr account activate केला वैतागून.

In reply to by टिना

टिनातैंमुळे जर आमच्या हातून कोंबडी हत्या घडली, तर ते पातक आमच्या माथी टाकू नकोस.

In reply to by कोमल

>>> लैच हुच्च.. नेमका काय अर्थय? उंचावरची कोंबडी की पातेलं? (आमच्याकडे उभट पातेल्याला गंज म्हणतात. ताक घुसलने के काम आता जनरली)

In reply to by बॅटमॅन

यल्ले होगोण
इलंस? मगे आता ताबडतोब न्हाणीघरात जा मरे!! हयसर गणपतीची कामा चल्ली हत.

देवा!! कसला रंग आलाय वर्‍हाडी चिकनच्या रश्श्याला .....तोंपासू अगदी. मी नक्की करणार आहे ही पाककृती, चिकन जीवकीप्राण आहे आणि असा तडकता-भडकता कोंबडी रस्सा थंडीत ओरपायला जाम भारी लागेल. धन्यवाद पाककृती इथे दिल्याबद्द्ल :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ऐ पोरा, काय काम नाय का? सकासकाळ फटु टाकला???? कवा केल्ती? झनका दिसतिया येक लंबर. ;)