अंगाई..
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी लहान असताना झोपण्यापूर्वी आईला खूप त्रास देत असे . त्यावेळी आजच्या T.V. सारखी साधने नव्हती त्यामुले मला झोपवता , झोपवता आई थकून जायची मी तिला रोज हैराण करून सोडायचो आणि मग ती अंगाई गायची , आता आईलापन जास्त आठवत नाही मग जेवढी आठवली तीच इथ देतोय ....... "कृष्णा घालितो लोळण , आली यशोदा धावून , काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून ", "आई मला चांदोबा दे आणून त्याचा चेंडू मी बनविण , असला रे कसला बाळा तू जगाच्या वेगळा ." " कृष्णा घालितो लोळण , आली यशोदा धावून , काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून ", " आई मला चांदण्या दे आणून त्याच्या लाह्या मी बनविण , असला रे कसला बाळा तू जगाच्या वेगळा" " कृष्णा घालितो लोळण , आली यशोदा धावून , काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून ", "आई मला साप दे आणून त्याचा चाबूक मी बनविण , असला रे कसला बाळा तू जगाच्या वेगळा" मी झोपलो असा पाहून आई हळूच उठून जाऊ लागली कि अंगाई बंद झालेली पाहून मी भोकाड पसरले म्हणून समझायच अन आई दुसरी अंगाई म्हणू लागायची , " राजा राणी ची नको , चिऊ ताई ची नको गोष्ट सांग आई मला रामाची वेळ माझी झाली आता झोपेची , वेळ माझी झाली आता झोपेची ." "आयोधेचा राजा राम पहा , सीतेचा पती राजा राम पहा ......................................... अंगाई ऐकत आईच्या कुशीत झोप कशी यायची कळत सुद्धा नव्हत , नकळत संस्कार सुद्धा घडत होते. आज या जमान्यामध्ये अशा जुन्या प्रथा , परंपरांना स्थान नसलेलं पाहून दुख होते. आता ना कोणत बाळ अंगाई साठी रडत ना कोणती आई अंगाई गाते .? -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- टिप :- माझ्या आईकडून लहानपणी ऐकलेल्या आणि आईला आत्ता आठवत असलेल्या अंगाई वरून हे लिहित आहे. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------अंगाई
प्रतिक्रिया
भाग्यवान आहात.
किती गोड अंगाई.
"हो जा जरा मतलबी" टाईपचे
सहमत!
म्ह्णजे पद्मावतिच्या
माझी बायको अजूनही कधीतरी
गोष्ट सांग रामाची
गोष्ट सांग रामाची
प्रयत्न करतो.
चालीत म्हणले तर खूप
छान लिहिलंय! अंगाई जरी म्हटली
गोष्ट सांग रामाची
सुंदर
फारच सुंदर.
मस्त आहे. आंम्ही दुसरी तिसरीत
अंगाई गीत गॅदरींग ला निवडणार्
आम्हीच झोपलो नाही नाचता नाचता
खूप मत्त मत्त मत्त! आवल्ल
अंगाई प्रमाणे काही नेहेमीच्या कथाही असतात
सहमत! पुराणातल्या कथा
सध्या आमच्याकडं हे कार्यक्रम
'शर आला तो, धावुनि आला काळ...
हे तसेच गाई पाण्यावर आणि बा
कधी ऐकली नव्हती ही अंगाई.अगदी
'कार्य'बाहुल्यातून वेळ नसेल