लाल खुरी( भय गुढकथा )
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
बजाची पावल आज झपाझप चालली हुती , हातात कुर्हाड, खांद्यावर पोत आन दाव घेऊन त्यो सुसाट चालला हुत्ता.घरी आई आन बायकुची कटकट ऐकुन त्यो रागातच बहिर पडला आणि पांदी वलांडून कवा डोंगराच्या रस्त्याला लागला तेला बिगीर ते कळाल नव्हत.
मनातंन त्यो म्हणत हुत , "भूत, खेत कूट असत्यात व्हय ?, च्या मारी या बायकांच्या घरी लाकूड तुकडा नाय आन सकाळ सकाळ लागले बोम्ब्लाया जाऊ नग रानात आज आवस हाय ".आज दावतोच ह्यांना म्हणत राग डोक्यात कालवून त्यो अजून जोरात त्या दगड धोंड्यातन वाट काढत चालू लागला.
बजा गरीब घरचा लहानपणी बाप मेलेला आइन कष्टाने संभाळून लहानाचा मोठा केलेला , घरी सदा दुष्काळ काम केल तर खायला मिळणार अशी परिस्थिती अशात त्याच लग्न झालेलं आणि १ पोर पण पदरात होत मग घरी कसा बसल.
सदा कष्ट करण त्याच्या नशिबी. गावाजवळच लाल खुरी नावाच्या शिवारात त्याचा बाप खाविसाबर कुस्ती खेळताना मेला हुता अस सारा गाव म्हणत हुता , त्याच्यामुळे त्याची आई आवस ,पुनव असली तर घाबरायची बजाला कुठ बाहीर सोडायची नाय पर आताशा त्यान आईच ऐकण बंद केलत बायका पोराच्या पोटासमुर त्याला भूता, खेताच कायच वाटत नव्हत. तवा तर "सातीअसरा "असल्याला लाल खुरी नावाच्या शिवारात चांगल जळण मिळेल ह्या आशेन आवस असताना पण ह्यो धावत आला हुता .
बजाला शिवारात गेल्या गेल्याच कसला तरी उग्र दर्प आल्यासारख वाटल हुत पर त्याकड कानाडोळा करून त्यो वाळकी लाकड कुठ हायती का हे बगत हुता , वातावरणात खिन्न शांतता हुती , कुठ चीठ्पाख्ररु पण दिसत नवत, एक डोक सुन्न करणारा वास जाणवत व्हता पर अशातच बजान चांगली मुळी बांधून डोक्याव घेतली अन मनाशी म्हनाला "परत इथच यायचं कसली आल्यात भूत " !
दिस डोक्यावर आला हुता ,बजाच्या पोटात कावळ वरडायला लागल त्यो बिगी बिगी घराकडं जायला निघाला आन समोरच्या वडावर त्याला चांगली मोठी वाळकी फांदी दिसली त्यो थबकला एवढी फांदी घेऊन घरी जाऊ म्हणून मुळी खाली टाकून वडाकड जायला लागला उग्र वास आता चांगलाच घानायला लागला हुता, कुर्हाड सावरत बाजा झाडावर चढला पर वाळकी फांदी त्याला कुठंच दिसना अन्दाझान त्यो गेला आणि समोर कुर्हाड मारणार त्योच , एक पांढरी फाकट तोंड असल्याली बाय झेपावून बाज्याकडे आली , तिला डोळ नावालाच हुत चेहऱ्यावर नासल्यासारखी कातडी, सुळा ,रक्ताचे दात बघून बजाची बोबडी वळली, तीच नुसता हाडक असल्याल हात लांब लांब वहात त्याच्या गळ्यापर्यंत आल एका मोठ्या किंकाळी बरोबर घोगरा आवाज कानात घुमू लागला ," तुला सोडणार नाय ", डोळ्यापुढे अंधारी आली
आन त्याला आईच सकाळच शब्द आठवल, " बजा आज आवस हाय लाल खुरीला जाऊ नगस तिथ सातिआसरा हायत्या . "
प्रतिक्रिया
छान
कहर आहे...!
ही गोष्ट मनोज नाइट श्यामलनला
धन्यवाद
चांगलीये.
उत्तम वातावरण निर्मिती. छान
ग्रामीण भाषेत लिहायचा प्रयत्न
आवडली.
हम्म . छान आहे . पण आसारा
आसरा दोन प्रकारच्या
चांगलं लिहिलं आहे. थोडा
वातावरण निर्मिती छान.
साती आसरा.....
७ जलदेवतांचा समूह! काही
अनेक ठिकाणी ७ वीतभर आकाराचे
धन्यवाद!
क्षेत्रपाल म्हणजे एखाद्या
मला फार माहिती नाही...
क्षेत्रपाल नक्कीच दुष्ट देवता
आवडली
लैच भारी येऊ द्या अजून
कथा चांगलीय
नक्कीच प्रयत्न करेन
तुमच्या पुढच्या कथेच्या
आवडली
+१
+१ मस्त कथा
छान
भय कथा
विठ्ठल पन अनुक्षेत्रपाळ आहे
विठ्ठल = वैष्णव देवता,
आस का करालाव, आरतीत हाय की ते
पूर्ण लिरिक द्याल?
वेणुनाद = अनाहत नाद!
क्षेत्रपाल ही कथित देवता
चारी वाचा कुंठित जाली सोहम
मला वाटलेलं वेणु म्हणजे बासरी
वेणु म्हणजे बासरीच भाऊ! आणि
ओ बाबुदादा क्षमस्व म्हटलं की!
अहो गाव वाले मांत्रिक बुवा
कथा छान वाटली
सातारी भाषेत
सत्यधर्मभो्ई भाषा सातार्
धन्यवाद
व्याकरण कसं आहे म्हणाले?
प्यारे त्यांचं व्याकरण