विसराळू नाना
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
विसराळू .. वा काय शब्द आहे ना,
याचे किस्से पण खूप आहेत बर तर असेच काही किस्से इथे सांगतो..........
आमच्या गावचे नाना म्हणजे एक नंबर विसराळू माणूस.
बाजारात गेला तर मोकळी पिशवी घरी आणि बायको बाजारात एवढा विसराळू.
बरं असं पण नाही की हा काम करत नाही. चांगला साखर कारखान्यात कामाला आहे, पण कसल हो! कामावर जाताना डबा घेऊन बस थांब्यावर आला तर जेवणाचा डबा हलवून लक्षात ठेवतो, कामावरून आलो आहे की जायचं आहे ते; आणि हो, कारखान्याकडे जाणा-या आणि येणाऱ्या दोन्ही गाड्यांना हात करतात. कारखाण्याकडे जाणारी गाडी लक्षात आल तर ठीक नाहीतर बाजाराच्या गावाला गेलेच म्हणून समझा असेच मागे एखादा स्वतःच्या समजून दुस-याच साखर कारखाण्यात जाणा-या गाडीत बसले. घरचे दोन दिवस वाट पाहत होते, पण आले घरी. हा माणूस घर मात्र विसरत नाही हे विशेष.
नानाचा असाच एक किस्सा सांगितला जातो कि, हा एकदा वाळवण वाळत घालण्यासाठी घरावर चढला, वाळवण घातले आणि विसरून गेला. आपण घरावर आहोत ते नेहमीप्रमाणे आला चालत आणि पडला खाली! पाय तीन महिने गळ्यात होता, पण शहाणा होईल तर शपथ.
गावची पोरं पण एवढी हुशार; नाना काही किराणा न्यायला किराणा दुकानात आला की त्याला बोलण्यात गुंतवून ठेवतात. झालं! हा माणूस जोपर्यंत लक्षात येत नाही, आपण इथं कशासाठी आणि काय न्यायला आलो, तोपर्यंत तिथेच थांबतो.
माग दस-यात एकदा असं झालं, तळी उचलण्यासाठी पाच माणसे लागतात; तर हा माणसे बोलवायला बाहेर पडला पण स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला त्या पाच माणसात मोजयालाच विसरायचा, आमची तर हसून हसून पुरेवाट व्हायची
वेळ आली होती तर असा हा नाना आणि त्याचे किस्से.
मित्रानो मिपावर नवीन आहे काही चुकलं असेल तर समजून घ्या आपल्या सुचनाचे स्वागत आहे.
- सत्य
प्रतिक्रिया
विसराळु नाना..,. मस्तच..,
छान लेखन
मामोऑन.
;)
अत्यंत गंभीर विषय आहे हा.
सांगितलं असतं
काही लोकांत अनुवांशिक असतो
हो