चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (५: अंतिम भाग)
भारतभेटीला प्रथमच येणार्या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून त्याच्या पत्रांच्या मराठी रुपांतराचा हा प्रयत्न. माझा शेजारी असलेल्या मॅनीच्या लाझ नामक दूरच्या भाच्याची ही संक्षिप्त भारत भ्रमण-कथा.
===============================================================
भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५
================================================================
Hello Family!
तर मी माझी निरोपा-निरोपी करून घेतली, सध्यापुरती, आणि आता भारत सोडलाय.
या महिनाभर लांबीच्या भारतभेटीच्या कित्येक महिने आधीपासून मी बहुतांशी फक्त टीकाच ऐकत आलो होतो: महिनाभर म्हणजे अति-लांब काळ आहे, तिथे कानठळ्या बसतील असं ध्वनी-प्रदूषण आहे, तुला संपूर्ण वेळ जुलाब लागतील, वगैरे, वगैरे. Well, हे सगळं आहे इथे, पण तरीही हा देश म्हणजे एक अद्वितीय, श्रीमंत अशी संस्कृती आहे, अवर्णनीय निसर्गसौन्दर्य आहे, आणि अत्यंत साहसाचं असं दोलायमान आयुष्य आहे. इथलं प्रत्येक राज्य अनोखं आहे, प्रत्येकाची वेगळी भाषा आणि प्रवृत्ती आहे, वेगळे धर्म किंवा वेगळ्या चालीरीती आहेत, अन्नपदार्थ आहेत, हवामान आहे, आणि निसर्गात तर इतकं वैविध्य आहे की तुम्ही एका प्रचंड, वैचित्र्यपूर्ण म्युझियमच्या वेग-वेगळ्या दालनांमधून फिरताहात असं वाटत राहतं, प्रत्येक दालन वेगळं सजवलेलं, प्रत्येकातली पात्रं वेगळी, आकर्षक वेषभूषेतली!
गेला आठवडा मी मी मुंबई या महानगरात घालवला. लोकसंख्या २८ दशलक्ष, कदाचित अधिकच, कारण इथे हजारोंनी लोक झोपड्यांमध्ये आणि रस्त्यांच्या काठाने राहतात. माझे दिवस मी व्यतित केले इथल्या रस्त्यांवर भटकण्यात, शाही दिमाखाच्या ब्रिटिश इमारती आणि त्यांमध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या भारतीय स्थापत्यशास्त्राच्या इमारती पहात.
.
.
.
रस्ते कायम गर्दीचे असतात, आधुनिक तसेच पुरातन काळातल्या वाहनांनी दुथडी भरून वाहत. बैलगाड्या, बसेस, कार्स, ऑटो रिक्षा, दुचाक्या, सायकली, छोटे टुक-टुक, अजस्त्र ट्रक्स; सगळ्यांना कुठे तरी प्रचंड घाईने जायचं असतं! दर तीन मीटर्स वर ही सर्व वाहनं त्यांचे कर्णे वाजवत असतात. इथे भारतात बहुतेक कर्णा वाजवण्याचा अर्थ "धोका, काळजी घ्या" असा नसून "hello, मी तुझ्या ढुंगणामागे/शेजारी आहे" असा असावा! आणि बहुधा दर ३० सेकंदांनी कर्णा वाजवणं हे सक्तीचं असावं! जर मी इथे कधी काळी स्थायिक व्हायचं ठरवलंच तर तर या एका गोष्टीशी मात्र माझं जमणं अशक्य आहे!
रोज संध्याकाळी मी माझा पूर्वीचा सहकारी आणि इथला मित्र गौरव याच्या साथीने हे शहर प्रत्येक रंगात रंगवायला बाहेर पडायचो, आमची मोहीमच होती, दर रात्री एक वेगळी सिंगल तरुणी शोधायची आणि तिच्याबरोबर मजा करायची. आम्हाला आयुष्यभर पुरतील इतक्या कथांचा साठा आमच्याकडे जमा झालाय. काल अखेरच्या रात्री आम्ही एक ड्रायव्हर असलेली गाडी भाड्याने घेतली (भारतात गाडी आणि ड्रायव्हर, दोन्ही स्वस्त गोष्टी आहेत), आणि रात्रभर एका बार नंतर दुसरा बार असं भटकत राहिलो, आणि पहाटे तीन वाजता शेवटच्या बारमधूनच विमानतळावर पोहोचलो, मी जवळजवळ फ्लाईट चुकवणारच होतो, पण शेवटच्या क्षणी कसाबसा पोहोचलो. समुद्रकिनाऱ्याची ओढ गौरवच्या आग्रहापेक्षा अधिक होती.
तर म्हणून आज मी श्रीलंकेत समुद्रकिनाऱ्यावर आहे. एक टुक-टुक भाड्याने घेतली आहे, भारतात भेटलेले दोन नवे मित्र साथीला आहेत, आणि येते दोन आठवडे आम्ही श्रीलंकेत फिरू. आतापर्यंत आम्ही बेटाच्या मध्य भागातील पठारांवरून चहा-मळ्यांच्या टेकड्यांकडे गेलो. विषुववृत्तीय फळं चाखली, नैसर्गिक धबधब्यांमध्ये डुंबलो, काही ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या, अखेरचा टप्प्यात जगप्रसिद्ध अशा आरागम सामुद्रधुनी इथे तीन दिवस राहून सर्फ केलं, भरपूर ताजं सामुद्रिक अन्न खाल्लं, आणि अननस, नारळ वगैरे फळांचा आस्वाद घेतला. आज आम्ही त्रिंकोमाली या मोठ्या किनाऱ्याच्या गावी आहोत. टुक-टुक मधून जातांना माझ्या उजवीकडे मला दिसतो आहे अथांग समुद्र, निर्मनुष्य किनारे, आणि मी दर दहा मिनिटांनी वाळूत लोळण्यासाठी थांबवतो आहे म्हणून माझे साथीदार माझ्यावर खवळले आहेत! कारण आम्हाला पुढे जाऊन देवमासे पहायचे आहेत आणि स्नॉर्केलिंग करायचं आहे. तिथून आम्ही परत बेटच्या मध्य भागाकडे येऊ, डांबुल्ला इथल्या गुहांमधली मंदिरं पाहू, आणि मग इथून पुढच्या प्रवासाठी फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळाकडे निघू.
माझा पुढचा थांबा असेल मलेशिया. एका दिशेचं तिकिट ८० डॉलर्सना मिळालं. तिथून मग १७ सप्टेंबरच्या ऑक्टोबरफेस्ट साठी वेळेत जर्मनी आणि मग मायामी. मलेशियात किती दिवस असेन, जर्मनीत किती थांबेन, सध्या काहीच निश्चित नाही. माझ्याकडे विमानाचे माईल्स आहेत, वेळ आहे, साहसी यात्रा चालू आहे.
I hope everyone is doing well. Speak soon.
Thanks,
- लाझ
=============================================================
या अंतिम भागानंतर सर्व वाचकांचे उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. लाझचे फोटो मला मिळाले नाहीतच, त्यामुळे माझ्या कल्पनाविलासानुसार त्या त्या ठिकाणी अनुरूप वाटली ती प्रकाशचित्रे मी गूगल अर्थ, बिंग इमेज आणि गूगल इमेज यांच्या उत्खननातून टाकत गेलो. काही ठिकाणी उचित वाटले तसे व्हिडिओज टाकले. वाचकांना निदान आतापर्यंत तरी त्यापैकी बरीच आवडली आहेत असं दिसतं, त्या प्रोत्साहनाबद्दलही आभार.
लाझ इथे परतेल तेंव्हा मी नसेन, तेंव्हा त्याची भेट होण्याची संधी धूसर आहे. पण लाझची इ-ओळख करून देणार्या मॅनीचे आभार. आणि अखेर पुन्हा एकदा, माझाच देश मी डोळे उघडून पहायची किती गरज आहे हे जाणवून देणार्या लाझचेही आभार!

=============================================================Book traversal links for चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (५: अंतिम भाग)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पहिला!!!
सुंदर लेखमालीका.
सुंदर लेखमालिका ! परकिय
फोटो क्रमांक ४ हा भारतातील
+१
+२
नंतरचा परिच्छेद सुद्धा गंडला
वाचून मजा आली ! धन्यवाद
सुरेख लेखमाला.परदेशी
खूप छान प्रवासमाला. सगळेच भाग
दुरुस्ती
लाझचं हे वाक्य केवळ
मलाही असंच वाटतं. बहुधा
बैलगाड्या, बसेस, कार्स, ऑटो
+१
नाखु - फ्लेक्ष च्या गर्दीमध्ये असे फलक लावयला
लेखमाला मस्त!
अप्रतिम लेखमाला.
त्याला कळवा जमल्यास की तो खुप
त्याला कळवा जमल्यास की तो खुप फेमस झाला आहे मिपावर :)+१०० हा निरोप द्याच लाझला !+१
कोमल, डॉ. म्हात्रे आणि अनिरुद्ध वैद्य
खुप छान
बहुगुणी सर
सुंदर लेखमालीका.
लेखमाला आवडली.
लाझने पाठवलेली काही प्रकाशचित्रे
ही गम्मत पहाण्यासाठीच ते
तथ्य आहे!
न "सुधारता" आपण आहे तसेच राहिलो तरच आपण पर्यटन यादीत स्थान टिकवू शकू वेगळा खर्च न करता.तुम्ही म्हणता त्यात नक्कीच तथ्य आहे. भाग १, ३ आणि ४ यांमध्येही शेवटी लाझने पाठवलेली प्रकाशचित्रे टाकलेली आहेत.धन्यवाद!
परक्यांच्या नजरेतून
व्यक्तिशः मलाही हे खूप खटकलं