Skip to main content

प्लम रेलिश / चटणी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 05/09/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी बागेत प्लमचे झाड अगदी फळांनी लगडले होते, भरपूर खाऊन, मित्र-परिवारात वाटून ही काही संपेना, ह्या वर्षी ठरवले होते की प्लम लागले की खाऊन उरतील त्याची चटणी, जॅम असे काही बनवायचे , पण ह्यावर्षी फुलं तशी कमीच फुलली मग फळं ही त्यामनाने कमीच लागली, दोनदा काढून खाऊन झाले मग म्हटले आता जी उरली आहेत त्याची चटणी करु, तर ही प्लमची आंबट-गोड-तिखट चटणी / रेलिशची पाकृ देतेय. . . साहित्यः १२-१५ पिकलेली प्लम्स (आमच्याकडे व्ह्किटोरिया जातीची प्लम्स आहेत, कोणतीही पिकलेली प्लम्स घेऊ शकता) साधारण १/२ वाटी चिरलेला गुळ (प्लम्सच्या गोडीनुसार गुळाचे प्रमाण घ्यावे) १/२ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून जीरे १/२ टीस्पून बडीशेप ३-४ लवंगा १/२ इंच आले किसून घेणे १-१/४ टीस्पून लाल तिखट मीठ चवीनुसार . पाकृ: प्लमस स्वच्छ धुवून, बिया काढून, बारीक फोडी करुन घेणे. पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, लवंगा घालून फोडणी करणे. मोहरी तडतडली की जीरे व बडीशेप घालून परतणे. आता त्यात चिरलेले प्लम्सचे तुकडे घालून ५ मिनिटे परतणे. प्लमला पाणी सुटून ते मऊसर होतील, जमेल तसे चमच्याने गर दाबून घ्यावा. आता त्या किसलेले आले व मीठ घालून घेणे. दोन मिनिटे परतल्यावर त्यात लाल तिखट व गुळ घालून मध्यम आचेवर सतत ढवळत राहणे. ४-५ मिनिटांनी मिश्रणातील ओलसरपण कमी होऊन मिश्रण दाट होऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करावा. चटणी पूर्ण गार होऊ द्यावी. . स्टरलाईज्ड बर्णित चटणी भरुन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास २-३ आठवडे सहज टिकते. . ही चटणी तोंडीलावणे म्हणून किंवा पराठे, ब्रेड, पॅनकेक्ससोबत किंवा क्रॅकर्स व चीझसोबत सर्व्ह करु शकता. .

वाचने 12002
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

वाह ! काय सुंदर दिसतीये. मी अशी विशाखाच्या रेसिपी ने अ‍ॅपल प्लम चटणी करते. मला ही लवंग , बडिशेप आणि आल्याची आयडिया फार आवडली. आता नुसती प्लम्स ची पण एकदा करेन :)

एकदम तोंपासु आहे ही पाककृती. अवांतर - माझी आई टमाट्यांचे लसूण घालून लोणचे करते. दिसायला ते असेच दिसते.

सानिका,_/\_ रंगाभाऊ,लोणच्याची कृती मिळेल का?

प्लम्स म्हणजे आपल्याकडे "आलूबुखारा" म्हणतात तेच फळ असते का? जबरदस्त पाककृती आहे ही.

_/\_ आम्ही जातो आमुच्या गांवा, आमचा रामराम घ्यावा..

छानच असतात तुझ्या पाकृ. देखणे फोटो आणी सोप्या भाषेत लिहिलेले वर्णन

छान सोपी पाकृ. प्लम्स आणि ते झाड पण भारीच..

चटणीचा रंग काय मस्तं चटकदार दिसतोय. छान सोपी पाककृती. प्लम्स नुसते खायला मला फार आवडत नाहीत पण आता ही चटणीची आयडिया फारच मस्तं मिळाली. नक्की करून पाहते.

कसली भारी दिसते आहे ती चटणी!

मस्त ! :) शेवटचा फोटू त्रास दायक आहे ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Raja

केली मी ही चटणी. मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त जाम भाव खाल्ला आहे तुझ्या रेसिपीने. झकास

मस्त दिसतेय! मी प्लमची चटणी फ्रीज करुन ठेवलेय. लागेल तसे एक पाकिट काढते.

नेहमीचाच प्रतिसाद... १. सुंदर फोटो २. सुंदर लेखनशैली