गेल्या वर्षी बागेत प्लमचे झाड अगदी फळांनी लगडले होते, भरपूर खाऊन, मित्र-परिवारात वाटून ही काही संपेना, ह्या वर्षी ठरवले होते की प्लम लागले की खाऊन उरतील त्याची चटणी, जॅम असे काही बनवायचे , पण ह्यावर्षी फुलं तशी कमीच फुलली मग फळं ही त्यामनाने कमीच लागली, दोनदा काढून खाऊन झाले मग म्हटले आता जी उरली आहेत त्याची चटणी करु, तर ही प्लमची आंबट-गोड-तिखट चटणी / रेलिशची पाकृ देतेय.
साहित्यः
१२-१५ पिकलेली प्लम्स (आमच्याकडे व्ह्किटोरिया जातीची प्लम्स आहेत, कोणतीही पिकलेली प्लम्स घेऊ शकता)
साधारण १/२ वाटी चिरलेला गुळ (प्लम्सच्या गोडीनुसार गुळाचे प्रमाण घ्यावे)
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जीरे
१/२ टीस्पून बडीशेप
३-४ लवंगा
१/२ इंच आले किसून घेणे
१-१/४ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
पाकृ:
प्लमस स्वच्छ धुवून, बिया काढून, बारीक फोडी करुन घेणे.
पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी, लवंगा घालून फोडणी करणे.
मोहरी तडतडली की जीरे व बडीशेप घालून परतणे.
आता त्यात चिरलेले प्लम्सचे तुकडे घालून ५ मिनिटे परतणे.
प्लमला पाणी सुटून ते मऊसर होतील, जमेल तसे चमच्याने गर दाबून घ्यावा.
आता त्या किसलेले आले व मीठ घालून घेणे.
दोन मिनिटे परतल्यावर त्यात लाल तिखट व गुळ घालून मध्यम आचेवर सतत ढवळत राहणे.
४-५ मिनिटांनी मिश्रणातील ओलसरपण कमी होऊन मिश्रण दाट होऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करावा.
चटणी पूर्ण गार होऊ द्यावी.
स्टरलाईज्ड बर्णित चटणी भरुन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास २-३ आठवडे सहज टिकते.
ही चटणी तोंडीलावणे म्हणून किंवा पराठे, ब्रेड, पॅनकेक्ससोबत किंवा क्रॅकर्स व चीझसोबत सर्व्ह करु शकता.

स्टरलाईज्ड बर्णित चटणी भरुन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास २-३ आठवडे सहज टिकते.
वाचने
12002
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह ! काय सुंदर दिसतीये. मी
वाव..एकदम टेम्पटिंग दिसतीये
मस्त
वाह
काय आठवण काढली श्रीरंग भाऊ!!!
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
मस्त हो मस्त!
तोंपासु!
सानिका,_/\_
प्लम्स म्हणजे आपल्याकडे
सुंदर दिसतीय ग चटणी.एकदम
_/\_
मस्तच
मस्त !!!!
वाह साने, भारीच
आहाहा काय सुंदर रंग आलाय
नेहमीप्रमाणेच "स्लssssssर्प"
चटणीचा रंग काय मस्तं चटकदार
चटणी छान दिसते आहे.
छान फोटो. मस्त प्रेझेण्टेशन
वा!
कसला सुंदर कलर आलय ग चटनीला.
सुंदर!
मस्त चटणी
भारी!!
वाह! फोटो किती सुंदर. पाकृही
मस्त ! :)
सानिका
मस्त दिसतेय!
प्लमचा छुंदा आवडला
काय बोलणार????????