सध्या हाणामारी-राजकीय गदारोळाच्या वाहिन्या पाह्ण्यापेक्षा दूर्दर्शन सह्याद्रीच्या बातम्या पाहणे जास्त चांगले आणि हितावह वाटते. अगदी सरकारी वाहिनी असूनही पुरस्कृत केल्यासार्ख्या आक्रस्ताळी, व मिपा भाषा परीकोषानुसार पालीचा डायनासोर करीत नाहीत. मोजके आणि नेमके.
अशातच काल रात्री साडे नऊच्या बातम्यात एक सुखद आणि आश्चर्य्जनक बातमी पाहिली आणि अवाक झालो.(टीप ज्यांना अगोदरपासून माहीत असेल त्यांनी माफ करावे) कारण नुकतेच मिपावर मांझी चित्रपटाचे परीक्षण समीक्षण वाचले गेले. बराच उहापोह झाला.
पण आपल्या इथे महाराष्ट्रातही एक सरस मांझी आहे ह्याची कल्पना नसल्याने माझी मलाच शरम वाटली. आणि मी संपूर्ण बातमी तर पाहिलीच पण बातमी दरम्यान श्री राजारम भापकर उर्फ भापकर गुरुजी (गुंडेगाव जि अहमदनगर) यांची मुलाखतही पाहिली.(आयुष्यातील ५७ वर्षे रस्ता तयार करण्यात खर्ची केलेला तपस्वी)
त्या अनुषंगाने आज जालावर माहीती धुंडाळली.
मुळात ती मुलाखत्वजा मनोगत पाहणे जास्त परिणामकारक आणि कर्त्याच्या तोंडून कहाणी ऐकणेच जास्त रास्त होईल.
मुलाखती दरम्यान सांगीतलेल्या दोन घटना जास्त भावल्या.
भापकर गुरुजीं असल्याने त्यांनी रस्त्याच्या आराखड्यासाठी अभियंते बोलावले पण ते येईनात गावकरीही या रस्ता बनवायच्या कल्पनेला खुळचटपणा सम्जून "येडा मास्तर" असी संभावना करीत.शेवटी रस्ता कुठून कसा आणि सुरक्षीत कसा काढता येईल याचा विचार करताना.गुरुजींना एक कल्पना सुचली. रस्ता ज्या डोंगररांगाम्धून काढायचा होता त्याच्या एक डोंगरावर कसलेसे लहान देऊळ होते त्याच्या डागडुजीसाठी काही किरकोळ बांधकाम साहीत्य गाढवांवर लादून नेले जात होते. त्या गाढवाच्या मालकांना भापकर गुरुजी भेटले. माझं काही सामान त्या देवळापासून खाली आणायचे आणशील का? मालक (कैकाडी) राजी झाला आणि दर सांगीतला ५ रूपये ( सुमारे ५० वर्षांपूर्वी) भापकर गुरुजी त्याच्याबरोबर त्या देवळापाशी पोहोचले आणि गाढवावर गोण्या लादल्या फक्त मालकाला एकच अट सांगीतली गाढवे आपली आपणहून उतरू देत.त्यांना मारणे हाकलणे नको. गोण्यांना मुद्दाम खालून काही छिद्रे ठेवली आणि गोण्यांमध्ये चुन्याची फक्की होती.गाढवांनी सर्वात सुरक्षीत ठिकाणांहून डोंगर रांगा पार केल्या आणि रस्त्याच्या आराखडा भापकर गुरुजींनी मजूरांच्या सहाय्याने खुणांचे दगड (लगोरीसारखे एकावर एक रचून)पक्का केला.
त्याच मुलाखतीत त्यांनी खंडाळा घाटातील रेल्वेबाबतही किस्सा सांगीतला खंडाळा घाटातल्या रेल्वे ट्रॅकसाठी ब्रिटीश अधिकार्याने धनगराचाही सल्ला घेतला होता. मेंढ्या-बकर्या जथ्थ्याने जिथून ये जा करतात तो भाग जास्तीत जास्त सुरक्षीत असतो असा निर्वाळाही भापकर गुरुजी देतात.
जालावर त्यांचेबाब्त माहीती खालील लिंकवर आहे.
भापकर गूरुजी
भापकर गूरुजी
साडेनऊच्या बातम्या
काहींना हे अगोदरच माहीत असल्यास त्यांनी मला माफ करणे.
आपलाच नाखु.
वाचने
6741
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच माहिती दिलीत.
नाही त्याचा त्यांनी
In reply to मस्तच माहिती दिलीत. by मांत्रिक
पक्का रस्ता? सरकारी मदतीशिवाय
In reply to नाही त्याचा त्यांनी by नाखु
महाराष्ट्रात असे खुप आहेत
डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता
In reply to महाराष्ट्रात असे खुप आहेत by कैलासवासी सोन्याबापु
डॉ.कोल्हेंची मुलाखत आयबीएन
In reply to महाराष्ट्रात असे खुप आहेत by कैलासवासी सोन्याबापु
छान लेख.
छान माहीती
रस्ते बनवणं ही सरकारची
सगळेच्या सगळे दोन पदर
In reply to रस्ते बनवणं ही सरकारची by प्यारे१
मार्मिक रे अभ्या... अगदी
In reply to सगळेच्या सगळे दोन पदर by अभ्या..
मान्य आहे रे भावा पण नदीवरचा
In reply to सगळेच्या सगळे दोन पदर by अभ्या..
त्या जनतेचा "जाणता" नेता
In reply to रस्ते बनवणं ही सरकारची by प्यारे१
एका प्रेरणादायी
छान ओळख!
उत्तम माहिती. धन्यवाद.
प्रेरणादायी !
ह्या माहीतीपुर्ण लेखाबद्दल धन्यवाद...
+१
In reply to ह्या माहीतीपुर्ण लेखाबद्दल धन्यवाद... by gogglya
वायफळ लेखांच्या मांदियाळीत हा
सह्याद्रीच्या पाऊलखुणा
'मांझी' चित्रपट रिलीज झाल्यावर
चांगली कल्पना आहे.
In reply to 'मांझी' चित्रपट रिलीज झाल्यावर by धर्मराजमुटके
+१००००००००
In reply to 'मांझी' चित्रपट रिलीज झाल्यावर by धर्मराजमुटके
मस्त माहिती..
मस्त माहिति नाखुकाका!!!!
बातमीचा दुवा मिळाला
भापकर गुरुजीन्बद्दल वाचले
त्रीवार दंडवत.
माहीती आवडली नादखुळाजी.