✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुर्जी

च — चुकलामाकला, Tue, 03/24/2015 - 09:16
विसरलो नाही मी तळव्यावरची जांभळी खूण फोकाचा तो जाड व्यास गणित म्हणजे काय अजून? इतिहासाच्या सनावळी एकाखाली एक शंभर ओळी खाडाखोड केलीत तर जाळ काढेन कानाखाली शुद्धलेखन अलंकार निबंधाचा सॅाल्लिड त्रास वहीवरती लाल भोपळे ओणवे रहा एक तास आम्ल आणि अल्कली सारी अक्कल बुडाली शिवाय होती ठरलेली शिव्यांची लाखोली पाढे जर चुकलात तर पायाखाली तुडवीन कोंबडीचे पाय काढलेत तर वहाणेने बडवीन शीत वारे उष्ण वारे इकडून तिकडे वाहून गेले आमचे सारे बालपण त्यांच्या संगे उडून गेले गुरुजींच्या भितीमुळे आपसूक शिकत गेलो फटके खाल्ले थोडेफार कणखर मात्र बनत गेलो आयुष्यातले स्थैर्य पाच आकडी पगार कुणामुळे मिळाला हा सुखी संसार? ब्रॅंडेड शूज घेताना तुटकी वहाण आठवते कुणास ठाऊक कशासाठी पापणी थोड़ी ओलावते....

प्रतिक्रिया द्या
3286 वाचन

💬 प्रतिसाद (21)

कुठेतरी वाचलेली वाटते...

वेल्लाभट
Tue, 03/24/2015 - 10:49 नवीन
कुठेतरी वाचलेली वाटते... पोस्ट केलेलीत का आधी कुठे? असो. मस्तच आहे. ग्रेट !
  • Log in or register to post comments

५ सप्टेंबरला कस्कायवर टाकली

चुकलामाकला
Tue, 03/24/2015 - 10:53 नवीन
५ सप्टेंबरला कस्कायवर टाकली होती .
  • Log in or register to post comments

मस्त आहे कविता... भावापूर्ण

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/24/2015 - 10:56 नवीन
मस्त आहे कविता... भावापूर्ण शेवट !
  • Log in or register to post comments

मस्त आहे कविता... भावापूर्ण

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/24/2015 - 10:56 नवीन
मस्त आहे कविता... भावापूर्ण शेवट !
  • Log in or register to post comments

छान

hitesh
Tue, 03/24/2015 - 11:37 नवीन
चितळे मास्तर पद्यात आले
  • Log in or register to post comments

व्वाह व्वा!

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/24/2015 - 12:17 नवीन
व्वाह व्वा!
  • Log in or register to post comments

कविता आवडली

श्रीरंग_जोशी
Tue, 03/24/2015 - 20:19 नवीन
गुरुजनांविषयी माझ्याच भावना तुम्ही रचनाबद्ध केल्या आहेत असे वाटले.
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
Wed, 03/25/2015 - 18:18 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

गुर्जी म्हटल्यावर मी जरा

सूड
Wed, 03/25/2015 - 18:40 नवीन
गुर्जी म्हटल्यावर मी जरा वेगळीच शक्यता वाटलीवती. पण हे छान लिहीलंय.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी!_/\_

चुकलामाकला
Mon, 03/30/2015 - 14:49 नवीन
धन्यवाद मंडळी!_/\_
  • Log in or register to post comments

मस्त

गणेशा
Mon, 03/30/2015 - 15:15 नवीन
ब्रॅंडेड शूज घेताना तुटकी वहाण आठवते कुणास ठाऊक कशासाठी पापणी थोड़ी ओलावते.... अप्रतिम
  • Log in or register to post comments

सुरेख सुरेख!आवडली कविता.

अजया
Mon, 03/30/2015 - 15:45 नवीन
सुरेख सुरेख!आवडली कविता.
  • Log in or register to post comments

धन्स हो!:)

चुकलामाकला
Tue, 03/31/2015 - 12:05 नवीन
धन्स हो!:)
  • Log in or register to post comments

आज कस्कायवर ही कविता अनेक

दमामि
Sat, 09/05/2015 - 15:46 नवीन
आज कस्कायवर ही कविता अनेक वेळा आली.
  • Log in or register to post comments

फार छान कविता. आवडली.

पद्मावति
Sat, 09/05/2015 - 17:07 नवीन
फार छान कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

समयोचित आणि छान कविता.

मनीषा
Sat, 09/05/2015 - 19:15 नवीन
समयोचित आणि छान कविता.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता!!!

मांत्रिक
Sat, 09/05/2015 - 19:38 नवीन
सुंदर कविता!!!
  • Log in or register to post comments

मस्तच!

हेमंत लाटकर
Sat, 09/05/2015 - 19:47 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

झ्याक....

बाबा योगिराज
Tue, 09/08/2015 - 17:36 नवीन
झ्याक....
  • Log in or register to post comments

छान आदरांजली गुरुजनांना.

बबन ताम्बे
Tue, 09/08/2015 - 17:42 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

छान

सिरुसेरि
Tue, 09/08/2015 - 18:40 नवीन
छान कविता . पुर्वी अशीच एक वाचलेली "मास्तर , तुम्ही जोडलेले वर्तुळ कुठे आहे ? " या नावाची कविता आठवली . कवी बहुतेक - फ. मुं. शिन्दे .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा