Skip to main content

गुर्जी

लेखक चुकलामाकला यांनी मंगळवार, 24/03/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
विसरलो नाही मी तळव्यावरची जांभळी खूण फोकाचा तो जाड व्यास गणित म्हणजे काय अजून? इतिहासाच्या सनावळी एकाखाली एक शंभर ओळी खाडाखोड केलीत तर जाळ काढेन कानाखाली शुद्धलेखन अलंकार निबंधाचा सॅाल्लिड त्रास वहीवरती लाल भोपळे ओणवे रहा एक तास आम्ल आणि अल्कली सारी अक्कल बुडाली शिवाय होती ठरलेली शिव्यांची लाखोली पाढे जर चुकलात तर पायाखाली तुडवीन कोंबडीचे पाय काढलेत तर वहाणेने बडवीन शीत वारे उष्ण वारे इकडून तिकडे वाहून गेले आमचे सारे बालपण त्यांच्या संगे उडून गेले गुरुजींच्या भितीमुळे आपसूक शिकत गेलो फटके खाल्ले थोडेफार कणखर मात्र बनत गेलो आयुष्यातले स्थैर्य पाच आकडी पगार कुणामुळे मिळाला हा सुखी संसार? ब्रॅंडेड शूज घेताना तुटकी वहाण आठवते कुणास ठाऊक कशासाठी पापणी थोड़ी ओलावते....
लेखनविषय:

वाचने 3292
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

चितळे मास्तर पद्यात आले

गुरुजनांविषयी माझ्याच भावना तुम्ही रचनाबद्ध केल्या आहेत असे वाटले.

आवडली

ब्रॅंडेड शूज घेताना तुटकी वहाण आठवते कुणास ठाऊक कशासाठी पापणी थोड़ी ओलावते.... अप्रतिम

छान कविता . पुर्वी अशीच एक वाचलेली "मास्तर , तुम्ही जोडलेले वर्तुळ कुठे आहे ? " या नावाची कविता आठवली . कवी बहुतेक - फ. मुं. शिन्दे .