Skip to main content

भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.

लेखक हेमंत लाटकर यांनी बुधवार, 02/09/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत. ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते. प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.

वाचने 55088
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

+२ सध्या ज्यांचे (ज्या पिढीचे) आईवडील वूध्द आहेत त्यांना हे तणावपुर्ण वाटु शकेल कारण त्यातल्या बर्‍याच जणांनी आई-वडीलांनी आजी-आजोबा, सासु-सासरे यांची केलेली सेवा बघितली असेल आणि त्यांच्यावर कळत . नकळत संस्कारदेखिल आई-वडीलांना सांभाळायचे झाले आहेत. पण जे लोक आता ४०-४५ किंवा कमी वयाचे आहेत त्यांना त्यांच्या वृध्दापकाळी वृध्दाश्रमात राहयला काही वाटणार नाही. येत्या काही वर्षात लोकांचे वृध्दाश्रमाकडे सकारात्मकरित्या बघण्याचे प्रमाण वाढेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मी माझ्या आईबाबाना माझ्या आजीआजोबांची सगळी सेवा करता णा पाहिले आहे त्यामुळे ते संस्कार माझ्यावर झाले आहेत . मी माझ्या सासुसासार्याना वृद्धाश्रमात कधीही ठेवणार णाही . पण जर माझ्यावर वेळ आली तर मी अगदी आनंदाने जायील . :)

In reply to by दिव्यश्री

इथे दिव्यश्री ताईंशी सहमत माझी म्हातारपणी जर वर डॉक म्हणाले आहेत तशा वृध्दाश्रमाची पैसे भरण्याची ऐपत असेल तर मी पण आनंदाने जाईन. कमीतकमी हवापालट म्हणुन एखाद-दोन महिने जायला तर काहीच वाटणार नाही.

या सर्व चर्चांमधून एकच गोष्ट कळली म्हातारपणी पुरेशी बचत हवी. श्रीमंत म्हातर्‍यांना बरे दिवस आहेत.

वरच्या अनेक प्रतिसादात आल्याप्रमाणे हे खरं आहे की उत्तम वैद्यकीय सेवा, समवयस्क लोकांचा सहवास, जबाबदारीतून मुक्तता हे वृद्धाश्रमाचे प्लस पॉइण्ट्स आहेतच. बर्याच घरात बघितलं आहे की तीथे वृद्धांची आबाळ होते. कधी कधी मुलांना इच्छा असूनही आई वडिलांकडे पूर्णवेळ लक्ष देणे शक्य होत नाही. मग नोकरांच्या भरवशावर त्यांना ठेवण्यापेक्षा वृद्धाश्रमात ठेवणे कधी पण चांगले. पण त्यांच्या वृद्धाश्रमाचा खर्च मात्र मुलांनीच करावा. आई वडिलांच्या उतरवयात मुलांनी त्यांची आर्थिक जाबाबदारी घेणे कायद्याने अनिवार्य करावे. सौंदाळा यांचा प्रतिसाद सुद्धा पटतो. मला वाटतं सगळ्यांच्या बाबतीत हा मन आणि बुद्धी यामधला हा संघर्ष आहे. बुद्धी सांगते की वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे. पण तरीही स्वत:च्या आईवडील, सासू सासरे यांच्याविषयी वृद्धाश्रमाचा विचार करवतही नाही. याचबरोबर हेही पक्कं माहिती आहे की बहुतेक करून सगळेच वेळ आल्यावर स्वत: मात्र वृद्धाश्रमात आनंदाने जातील.

द-बाहुबली >>> +११११११११११ अहो पण आता वनंच नाहीत तर वानप्रस्थाश्रम कसा स्वीकारणार ? खिक बरं मग ? वृद्धांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींत पोरांच्या संसारात नाक खुपण बंद करावं . आणि ह्याला आईवडिलांचे संस्कार पण कारणीभूत असतात . आता लहान मुलं असलेल्या आईबापांनी त्यांच्या म्हातारपणी होणार आहे ह्याचा विचार करावा

पुर्ण अंथरूणाला खिळलेल्या लोकांचे खुप करावे लागते हे मान्य. पण धडधाकट आपले काम आपण करू शकणार्या आई-वडिलांनी मुलांकडे न राहता वृद्धाश्रमात का जावे. तेथे समवयस्क असतात गप्पा होतात करमणुक होते ही अतिशयोक्ती आहे. मी एक लेख वाचला त्यातील वृद्ध पती-पत्नी मुलगा परदेशी राहत असल्यामुळे वृद्धाश्रमात जातात. पण तेथे वृद्धांचे वयोमानानुसार होणारे मृत्यु बघून त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडते. मग त्यांनी आपल्या घरातच राहण्याचा निर्णय घेतला.

या धाग्यातून निदान "वृद्ध होऊ घातलेल्या माझ्यासाठी" तरी काही नि:ष्पन्न व्हावं म्हणून आंतर्जालावर शोध घेतला तर Categorization of Old Age Homes ही उपयुक्त माहिती मिळाली. अशा संस्थांचे लोकांनी केलेले परीक्षण (reviews) करणारं एखादं संस्थळ असेल तर सूचवा (नसेल तर ते तयार करणं ही काळाची गरज आणि उपयुक्त [and not to overlook, profitable] ठरू शकेल!)

ह्या विषयावर लिहलॆले एक उत्तम पुस्तक: अमेरिकेत जन्मलेल्या व शिकलेल्या डॉक्टर अतुल गवांडे ह्यांचे being mortal. flipcart वर मिळु शकते. माझी प्रत मित्र घेऊन गेला आहे म्हणुन परिक्षण लिहू शकत नाही. वरील अनेक प्रश्नाची उत्तरे त्यात आहेत. आणि त्यातील चर्चा फक्त अमेरिकेला उद्देशून नाही..

लाटकर साहेब "वृद्धाश्रम" हा मुद्दा आपण कसा घेतो त्या दृष्टिकोनावर सारं अवलंबून आहे… वृद्धाश्रम हि आता काळाची गरज बनत आहेत. काही ठिकाणी वृद्धांची काळजी घ्यायला कोणी नसते तेव्हा अशा ठिकाणी केअर टेकर होम ची गरज भासतेच. आता काही जण त्याला वृद्धाश्रम म्हणतात पण जर आपला दृष्टीकोन सुधारला तर त्यातून होणारे फायदेही दिसू लागतील. खर तर आत्ता ह्या संकल्पनेचा बाऊ होतोय पण काही वर्षातच डे केअर सेंटर सारखी त्याचीही गरज भासणार आहे. अजून २५ ते ३० वर्षांनी जीवन अजून धकाधकीचे झाल्यावर आत्ता जेवढे लक्ष घरी आणि वैयक्तिक गोष्टीकडे देता येत आहे तेवढे देणेही जमणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही पुढल्या पिढीकडून काय अपेक्षा करणार? त्यापेक्षा आर्थिक बाजू भक्कम करत स्वतःची पुढची वाटचालही आपणच ठरवावी हे उत्तम. तेव्हा आत्ताच्या तरुण पिढीने हात-पाय हलत आहेत तोपर्यंत आपल्यासाठीचे केअर टेकर होम निवाडून ठेवावे.