✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल ?

म
माहितगार यांनी
Tue, 08/25/2015 - 15:46  ·  लेख
लेख
महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने तो ९००० श्लोकांचा आहे हे ग्रंथातच नमुद करून ठेवले. काळाच्या ओघात त्यातील विवीध कथासूत्रांचा विस्तार होत गेला आणि श्लोक संख्या लाखाच्या घरात गेली. म्हणजे प्रचंड मोठा भाग हा वस्तुतः प्रक्षीप्त असला पाहीजे. मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे की १) महाभारताच्या प्रथम कर्त्याने ९००० श्लोकात समजा एक कथा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पुर्ण केली आहे, समजा अधिकतम शक्य असलेला प्रक्षिप्त भाग गृहीत धरावयाचा नाही असे ठरवले तर महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल कि ज्या शिवाय महाभारताची कथा आजीबात आकार घेणार नाही ? किंवा असंही म्हणता येईल की तुम्हाला केवळ ९००० श्लोकांमध्ये महाभारताची मुख्य पटकथा सांगावयाची आहे तर तुमच्या पटकथेचे स्वरूप कसे असेल ? २) महाभारतातील किमान पात्रे कोणती की ज्यांच्या शिवाय महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक आकारास येऊ शकत नाही ? ३) महाभारतातील किमान भागास आवश्यक नसणारी पण लाखभर श्लोकी महाभारतातील कोणती कथासूत्रे सहजपणे बाजूला ठेवता येतील अथवा टाळता येतील ? (अशीच चर्चा रामायणा बाबतही करावयाची आहे पण नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यातून) * प्रक्षिप्त = एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्‍या कुणीतरी मागाहून घातलेला भाग/लेखन (संदर्भ)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34955 वाचन

💬 प्रतिसाद (96)

प्रतिक्रिया

भारत व महाभारत यांतील लिखाण

माहितगार
गुरुवार, 08/27/2015 - 09:43 नवीन
भारत व महाभारत यांतील लिखाण निराळे करणे तसे सोपे असावे. भारताचार्य वैद्यांच्या उपसंहारात आपणास बरीच माहिती मिळते.(पृष्ट ५-३८).
या माहितीसाठी धन्यवाद. बाकी पूर्ण खपुष्प शोधण्याचा या धाग्यातून होणार नाही आणि तशी अपेक्षाही या धागा लेखाची नाही. कोणत्याही कथानकाचे संक्षीप्तीकरण अवघड नसावे, अन आता पावेतो ते अनेक वेळा झालेही असेल, पुढेही होत राहतील . फक्त मी संक्षीप्तीकरण हा शब्द टाळतो आहे, कारण संक्षीप्तीकरणात महत्वाचा असण्याची शक्यता असलेला कथानकाचा टप्पा सुटू नये आणि टाळण्याजोगा असलेला भाग संक्षिप्तीकरणात येऊ नये. असे किमान स्वरूपाचे कथानक रेखाटणे अवघड असले तरी खूपही कठीण असेल का ? बाकी प्रश्न राहीला तंत्रज्ञानाचा मी तंत्रज्ञानाला ओव्हरएस्टीमेट करत नाही तसे तंत्रज्ञानाची क्षमता अंडरएस्टीमेट सुद्धा करू इच्छित नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन

प्रसाद प्रसाद
Wed, 08/26/2015 - 16:56 नवीन
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने महाभारतातील प्रक्षिप्त भाग कोणता आहे हे शोधून काढून महाभारताची शुद्ध (दुसरा कोणता शब्द वापरावा हे कळत नाही) प्रत तयार केली आहे. प्रचेतस याविषयीचे जाणकार आहेत. त्यांनी ह्या प्रतीचा संदर्भ दिलेला वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

मूळ व्यासप्रणीत ग्रंथातील भाग

बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 15:37 नवीन
मूळ व्यासप्रणीत ग्रंथातील भाग कुठला हे शोधण्याचा प्रयत्न एम आर यार्दी यांनी केलेला आहे, तेव्हा हे अगदीच खपुष्प वगैरे आजिबात नाही. १९८६ च्या आसपास भांडारकर संस्थेनेच त्यांचा यासंबंधीचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे.
  • Log in or register to post comments

तुमच्या प्रतिसादाला तुमच्याच

माहितगार
गुरुवार, 08/27/2015 - 17:10 नवीन
तुमच्या प्रतिसादाला तुमच्याच (पुर्विच्या) प्रतिसादाचा संदर्भ गूगलबाबांच्या सौजन्याने मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मधुकर रामराव यार्दी

माहितगार
गुरुवार, 08/27/2015 - 20:05 नवीन
ब्याटमनराव लै गूगलल्या नंतर मधुकर रामराव यार्दी यांची जराशी माहिती मिळाली ती मराठी विकिपीडियावर जोडली आहे. एक तर त्या माहिती दुजोर्‍याची गरज वाटते. दुसरे अजून बरीच माहिती खास करुन जन्म मृत्यू व्य्कतीगत जीवन इत्यादी माहिती हवी आहे. मिळाल्यास जरूर कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माझ्याकडे त्यांचे पुस्तक आहे,

बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 20:19 नवीन
माझ्याकडे त्यांचे पुस्तक आहे, त्याच्या प्रस्तावनेत काही माहिती मिळाल्यास पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

दत्ता जोशी>>+११११११११११

तुडतुडी
गुरुवार, 08/27/2015 - 15:51 नवीन
दत्ता जोशी>>+११११११११११ इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे कि नाही हे शोधण्यासाठी सध्या केवढा आटापिटा केला जातो आणि पैसे खर्च होतात . हे सगळं करण्यापेक्षा योगानुभावातून का शोधत नाहीत ? सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील . आपल्या अध्यात्मात आणि धार्मिक ग्रंथात उल्लेख केलेले वेगवेगळे लोक हि केवळ कल्पना नसून खरोखर अस्तित्वात आहेत . संदर्भ : चित्शक्ती विलास by स्वामी मुक्तानंद . (तो साउथ इंडिया मधला भोंदू बाबा मुक्तानंद नव्हे . गणेशपुरीचे मुक्तानंद . गेल्या शतकातले योगसामर्थ्य संपन्न . ) माणसांना ईश्वरा पर्यंत पोचण्याचा रस्ता दाखवण्यात नाग्लोकातून आलेल्या नागांचा फार मोठा वाटा आहे , योगशास्त्राची देणगी नागांनीच जगाला दिली आहे . (महर्षी पतंजलींची मूर्ती अर्धा नाग अर्धा मानव अश्या स्वरुपात आहे ) . साईबाबा ३ दिवस भौतिक शरीर सोडून गेले होते तेव्हा ते नाग्लोकातील १ समस्या सोडवण्यासाठी गेले होते . काळाप्रमाणे माणसांचा जसा अध्यात्मिक ऱ्हास झाला तसाच नागांचाही झाला . माणसांकडून नागांची मोठ्या प्रमाणात हत्या सुरु झाली (सर्पसत्र यज्ञ). तेव्हा नागराज अनंताने सर्व नागांना माघारी नागलोकात बोलावले . पण काहींना हे थांबेल अशी अशा होती तर काहींनी बंडाळी करून इथेच राहणं पसंत केलं . आज मनुष्याच्या दैवी शक्तीचा लोप होवून तो जसा 'मनुष्यप्राणी' बनून राहिलंय तशीच अवस्था नागांची सुधा झालीये . संदर्भ : Apprenticed to Himalayan Master By Shri M .
  • Log in or register to post comments

हे सगळं करण्यापेक्षा

बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 16:01 नवीन
हे सगळं करण्यापेक्षा योगानुभावातून का शोधत नाहीत ? सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील .
म्हण्जे आमी येडे. - नासा, इस्रो आणि त्यांचे अन्यदेशीय समस्त जातबंधूभगिनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

प्लँचेट वापरून या सर्व

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/28/2015 - 14:11 नवीन
प्लँचेट वापरून व्यास, वैशंपायन, सौती इ इ सर्व या सर्व प्राचीन लेखकांच्या आत्म्यांनाच प्रश्न विचारले तर खुद्द "घोड्यांच्या तोंडून" खरी माहिती मिळू शकेल ! (नेटीव उपाय लय झाले आता इन्नोवेटीव उपायांची बारी हाय ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा ;)

बॅटमॅन
Fri, 08/28/2015 - 16:13 नवीन
हा हा हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पण मी काय म्हणतो? हा टॉपिक

प्यारे१
गुरुवार, 08/27/2015 - 16:32 नवीन
पण मी काय म्हणतो? हा टॉपिक नंतर घ्या ना अभ्यासाला. आत्ता बरेच मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरु आहेत मिपावर. थोडा slack आला की घ्या की हा बोर्डावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

=))

माहितगार
गुरुवार, 08/27/2015 - 17:14 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

असले प्रतिसाद वाचले की

सूड
गुरुवार, 08/27/2015 - 17:59 नवीन
असले प्रतिसाद वाचले की नाडीमार्तंड बोलल्यासारखं वाटतं !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

तुमचे विवेचन रोचक आहे. आपण

द-बाहुबली
Sat, 08/29/2015 - 18:48 नवीन
तुमचे विवेचन रोचक आहे. आपण अतिशय गुढ बोलत आहात. इतके की हास्यास्पद वाटावे. पण सध्या नासा व तत्सम भौतिक ज्ञानाच्या प्रणेत्या देशांचे प्रचंड लष्करी सामर्थ्य व मुक्तर्थव्यवस्थेच्या लोभस फळांची चलती असल्याने सामान्यांना रुचेल झेपेल असे ज्ञान व आयुष्य तुमचे दावे देणार नसतील तर ते मसणात जावे असेच म्हणावे लागेल. सध्यस्थितीमधे आपण अपेक्षा करता/मानता ते प्रकार जिव, रसायन वा भौतीक शास्त्राच्या पातळीवर यावेत अशी अनेकांची इछ्चा असली तरी ते काही शतके निव्व्वळ क्ल्पना रंजनच असेल.. अनलेस सम मिरॅकल हॅपन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

इतर ग्रहांवर

कपिलमुनी
Wed, 09/02/2015 - 13:43 नवीन
इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे कि नाही हे शोधण्यासाठी सध्या केवढा आटापिटा केला जातो आणि पैसे खर्च होतात . हे सगळं करण्यापेक्षा योगानुभावातून का शोधत नाहीत ?
म्हणजे ? तुम्हाला वर्तकांचे मंगळभ्रमण माहित नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

वर्तकांचे मंगळभ्रमण

चित्रगुप्त
गुरुवार, 09/03/2015 - 07:27 नवीन
आता एवीतेवी " वर्तकांचे मंगळभ्रमण" हा विषय निघालाच आहे, तर हेही वाचून घ्या एकदा: http://www.misalpav.com/node/23698
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

झैरात

कपिलमुनी
गुरुवार, 09/03/2015 - 16:02 नवीन
झैरात !! झैरात !! झैरात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

महभारताच्या आधारावर दोन

कंजूस
गुरुवार, 08/27/2015 - 20:10 नवीन
महभारताच्या आधारावर दोन गोष्टी आवर्जून सांगितल्या जातात- १)सर्व लेण्या पांडवांनी एका रात्रीत बांधल्या.( हे सांगणाय्रा गाववाल्यास शंका विचारायची नाही.कानफटात बसू शकते.) २)सर्व तृतीयपंथीयांना मूळपुरूष मिळाला( अर्जुन)
  • Log in or register to post comments

म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी

तुडतुडी
Fri, 08/28/2015 - 12:18 नवीन
म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी येडे. - नासा, इस्रो आणि त्यांचे अन्यदेशीय समस्त जातबंधूभगिनी.
हो का . बर . अरबस्तान , पाकिस्तान , तुर्कस्तान आणि कसल्या कसल्या स्तानातल्या एखाद्या संस्थेचा उल्लेख नै केला तो
  • Log in or register to post comments

हे महामाये ..

पगला गजोधर
Fri, 08/28/2015 - 12:29 नवीन
अरबस्तान , पाकिस्तान , तुर्कस्तान आणि कसल्या कसल्या स्तानातल्या एखाद्या संस्थेचा उल्लेख नै केला तो
तुम्ही सांगितलेल्या देशात अवकाश-संशोधन संस्था असू शकेल काय या बाबत मी जरा साशंक आहे. अश्या संस्था विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन बाळगणाऱ्या देशात (जसं की भारतासारख्या) त्यांच्या विज्ञाननिष्ठ नेतृत्वाने (जसं की पंडित नेहरू सारखे) उभारलेल्या दिसतील. ते तुम्ही म्हणताय ते देश धर्मांधतेच्या विळख्यात सापडलेले आढळतील कदाचित…. त्यांना शिया किन्वा सुन्नी किन्वा ज्यू ह्यांच्या कत्तलीतून फुरसत मिळाली तर नं …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

जो उल्लेख केलाय त्याबद्दल बोल

बॅटमॅन
Fri, 08/28/2015 - 12:45 नवीन
जो उल्लेख केलाय त्याबद्दल बोल की तुडतुडे, जो उल्लेख नाही त्याबद्दलच फापटपसारा वाढवून काय होणारे? हे लोक मूर्ख आहेत किंवा कसे इतके सांग. मग त्यांना सांगू आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

या उपचर्चेवरून वि.का. राजवाड्यांचा एक लेख आठवला

माहितगार
Fri, 08/28/2015 - 13:26 नवीन
विज्ञानाच्या पल्याडच्या योगादी सामर्थ्याच्या तथाकथीत कल्पनांमबद्दल वि.का. राजवाड्यांचा एक मस्त लेख बर्‍याच वर्षांपुर्वी वाचला होता असे आठवते. कुणाकडे वि.का. राजवाड्यांचे साहित्य उपलब्ध असल्यास तो लेख शोधून वेगळ्या धाग्याच्या रुपाने मिपा आणि इतरही मराठी संस्थळावर आवर्जून टाकला जावयास हवा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

=))

अजया
Fri, 09/04/2015 - 22:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्या 'स्ताना'तील लोक धर्मांध

वगिश
Sat, 08/29/2015 - 17:06 नवीन
त्या 'स्ताना'तील लोक धर्मांध असल्याने त्यांची तशी गत झाली आहे. मला माफ करा पण मला वाटते आपले विचार त्या लोकांशी मिळते आहेत. सुदैवाने हिंदुस्थानात बुद्धिवादी लोक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

महाभारत लिहिण्यास घेतले तेव्हा व्यासांचे वय काय असावे ?

माहितगार
Sat, 08/29/2015 - 23:17 नवीन
मंडळी चर्चा पुन्हा एकदा मूळ धागा लेखाकडे यावी म्हणून काही प्रश्न १) व्यास लिखीत महाभारत भागाची सुरवात काय असावी ? २) व्यास आणि भीष्म समावयीन असावेत का ? ३) महाभारताचे कुरुक्षेत्र युद्ध संपून व्यासांनी महाभारत (जय) लिहिण्यास घेतले तेव्हा व्यासांचे वय काय असावे ?
  • Log in or register to post comments

धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/30/2015 - 12:23 नवीन
धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर व्यासाची संतती. म्हणजे व्यासाने आपल्या वंशाचा इतिहास जिवंत रहावा म्हणून जय हा ग्रंथ लिहिला असे म्हटले तर काय चुकले ?
  • Log in or register to post comments

व्यासविषयक गृहीतकांवरील प्रश्न चिन्हे आणि काही शक्यता शंका

माहितगार
Sun, 08/30/2015 - 15:51 नवीन
धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर व्यासाची संतती. म्हणजे व्यासाने आपल्या वंशाचा इतिहास जिवंत रहावा म्हणून जय हा ग्रंथ लिहिला असे म्हटले तर काय चुकले ?
मी इथे गृहीतके सरसकट नाकारत नाहीए पण उपरोक्त विधानाच्या अनुषंगाने आधार गृहीतकांकडे निर्देश करतो आहे. कारण इतिहास जिवंत ठेवण्याची संवेदना आहे अशी व्यक्तीस वंशविच्छेद करणारे संघर्ष थांबवण्याचाही प्रयत्न करेल तटस्थ राहणार नाही. १) यातील पहिल गृहीतक हे कि अ) जय या कथेत अंशतःतरी इतिहास असला पाहिजे. (असूही शकतो, नसूही शकतो यावर या धाग्यासाठी भाष्याची विशेष जरूरी तुर्तास तरी नाही) आ) व्यासांचा नियोग प्रसंग चित्रण हा भाग प्रक्षिप्त असावयास नको. कारण महाभारतात नियोग प्रसंग चित्रीत केलेला नसता तरीही धृतराष्ट्र आणि पंडू यांच्या पुत्रांमध्ये जो सत्ता संघर्ष व्हावयाचा तो झालाच असता. (याचा अर्थ असा नव्हे की आपण ते प्रसंगचित्रण प्रक्षिप्त आहे हे आत्ताच गृहीत धरून चालू शकतो.) इथे एक उल्लेखनीय भाग म्हणजे व्यासांच भाषेवरच प्रभूत्व एवढ विशीष्ट आहेतर महाभारतातील विवीध संघर्ष प्रसंग हाता बाहेर जाण्या पुर्वीच व्यासांनी इफेक्टीव्ह हस्तक्षेप करून स्वतःच भाषा प्रभूत्व सिद्ध का केले नाहीत. त्यांनी इफेक्टीव्ह हस्तक्षेपाचा प्रयत्न केला असता तर त्यांनी कृष्णाने युद्ध कर म्हणून गीता लिहिली त्याच्या तोडीस तोड युद्ध करू नका अशी गीता अथवा स्वतःचे इतर इफ्फेक्टीव्ह संवाद आंतर्भूत केले असते. (महाभारतात असे संवाद असतील तर त्या बद्दल मला कल्पना नाही असे असू शकते आणि महाभारत जाणकारांनी व्यासांच्या अशा संवाद श्लोकांवर प्रकाश टाकावा) इ) जर नियोग प्रसंग चित्रण वस्तुनिष्ठ आहे आणि त्यांचा तदनंतरच्या प्रसंगात इफेक्टीव्ह प्रेझेन्स दिसत नाही तर एक शक्यता अशीही असू शकते की व्यासांचा मूळ जय ग्रंथ हा केवळ त्यांच्या पिढी पर्यंतचे आणि फारतर धृतराष्ट्र आणि पांडू या दोन पूत्रांच्या उदया पर्यंतचा असेल आणि नंतरचे सर्व चित्रण इतरांनी केले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नियोगाच्या अटी

पैसा
Mon, 08/31/2015 - 23:29 नवीन
नियोगाच्या अटी नुसार नियोगकर्त्याने त्या स्त्रीशी बोलूही नये असा संकेत होता. त्याने अर्थातच अशा संततीबद्दल ममत्व बाळगणे किंवा त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणे हे ही संमत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

?

माहितगार
Mon, 08/31/2015 - 23:53 नवीन
काही जण नियोगकर्ते चेहराही पहात नाहीत शरीराच्या इतर भागास स्पर्शही करत नाहीत स्वरुपाचे दावेही करत असावेत. इतर वस्तुस्थिती माहित नाही. जिथपर्यंत महाभारत कथेचा संबंध आहे अंबिका आणि अंबालिका (नावे बरोबर आहेत ना? चुकभूल देघे) यांना चेहरा पाहून भिती वाटली आणि विदुराच्या मातेस भिती वाटली नाही असा किमान उल्लेख आहे म्हणजे चेहर्‍याचे दर्शन प्रत्ययही होत नसावे असे किमान महाभारतात नसावे. दुसरे पांचालनगरीस पोहोचण्यापुर्वी वनात अज्ञातवासातील पांडवांना व्यास भेटघेऊन मार्गदर्शन करून जातात असा किस्सा शरद रावांनी सुचवलेल्या महाभारतात वाचला प्रक्षिप्त आहे अथवा नाही हा भाग वेगळा पण व्यासांचा बाजू घेणारा एक उल्लेख आढळला. कुंतीचे देवतांना आवाहन हा प्रकार नियोगात मोडणारा नसावा पण महाभारतात कुंतीचे संबंधीत देवतांशी संवाद झाले असावेत आणि पाच पांडवात वयाचे अंतर असावे असे काहीसे वाचल्याचे स्मरते पुन्हा एकदा हे स्मरणावर आधारीत आहे इतर अभ्यासकांनी दुजोरा द्यावा अथवा माझी धारणा चुकीची असल्यास तसे नजरेस आणावे. मी माझी धारणा बदलण्यात तत्पर असेन. आणि प्रक्षिप्ततेचा मुद्दा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अंबा नाही. अंबा ने भीष्माचा

प्यारे१
Tue, 09/01/2015 - 00:06 नवीन
अंबा नाही. अंबा ने भीष्माचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करून प्राणत्याग केला नि पुढील जन्म शिखंडीचा मिळाला असं आहे बहुतेक. अंबिका आणि अम्बालिका या दोघीन्ची लग्न हस्तिनापुर च्या युवराजांबरोबर लावून दिली गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

बॅट्या . बोलायचं म्हणलं तर

तुडतुडी
Mon, 08/31/2015 - 15:24 नवीन
बॅट्या . बोलायचं म्हणलं तर खूSSSSSSS प बोलता येईल . तो विषयच असा आहे . पण 'आम्ही येडे' असं भांडणाच्या सुरत बोलल्यावर नै बोलता येणार . चर्चा करायची असेल तर बोलण्यात अर्थ
विज्ञानाच्या पल्याडच्या योगादी सामर्थ्याच्या तथाकथीत कल्पनांमबद्दल वि.का. राजवाड्यांचा एक मस्त लेख बर्‍याच वर्षांपुर्वी वाचला होता असे आठवते.
वि.का. राजवाड्यांचा 'योग' ह्या विषयावर काही अभ्यास आहे का हे आधी महत्वाचं .त्यांचं लिखाण हि सुधा तथाकथीत कल्पनाच म्हणता येईल .अर्जुना , तू योगी हो म्हणून सांगणारे श्रीकृष्ण येडे , ज्ञानेश्वर महाराज येडे , रामकृष्ण परमहंस , स्वामी विवेकानंद , वासुदेवानंद सरस्वती , स्वामी राम , परमहंस योगानंद आणि असे पुष्कळ योगी सगळे येडे . राजवाडे तेवढे शहाणे
  • Log in or register to post comments

कशाला एवडा प्रतिसाद प्रपंच ?

द-बाहुबली
Mon, 08/31/2015 - 15:27 नवीन
कशाला एवडा प्रतिसाद प्रपंच ? अशावेळी फक्त होय शक्तीमान, स्वारी शक्टीमॅन, ओके शक्तीमान म्हणून विषय मोकळा करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

वि.का. राजवाड्यांचा 'योग'

माहितगार
Mon, 08/31/2015 - 15:35 नवीन
वि.का. राजवाड्यांचा 'योग' ह्या विषयावर काही अभ्यास आहे का हे आधी महत्वाचं. ...... राजवाडे तेवढे शहाणे.
हे राजवाड्यांनी त्या लेखात काय लिहिलय हे पाहून मगचं ठरवता येईल ना, तुर्तास त्यांचा लेख आंजावर तरी उपलब्ध दिसत नाही. त्यामूळे तोपर्यंत तरी राजवाड्यांची योग परीक्षा होऊ शकणार नाही. योग आणि योगी शब्दाच्या एकापेक्षा अधिक व्याख्या आहेत. बाकी तुम्ही ज्यांच्या बद्दल उपरोधानी लिहिले आहे त्यांच्या योगा बद्दल आम्ही उपरोधानेही लिहित नाही, त्यांच्या पैकी प्रत्येकाच्या योगा बद्दल वस्तुनिष्ठ कल्पना बाळगतो आणि त्यांच्या योगसामर्थ्या बद्दल अवास्तव कल्पनाही बाळगत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

महाभारत कथा ज्याच्याशिवाय होऊ

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/02/2015 - 13:57 नवीन
महाभारत कथा ज्याच्याशिवाय होऊ शकली नसती असे दोनच शब्द सुचतात "भावकीची भांडणे" (कृ ह घ्या)
  • Log in or register to post comments

+१

कपिलमुनी
Wed, 09/02/2015 - 15:25 नवीन
आमच्या सांगलीकडे भांडणाची ३ कारणे सांगतात भावकी, गावकी आणि न्हावकी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आवो मुनिवर आमचे आजोळ हाय

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/02/2015 - 15:43 नवीन
आवो मुनिवर आमचे आजोळ हाय सांगली जिल्ह्यात!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अतिनेमके!!!!!

बॅटमॅन
Wed, 09/02/2015 - 15:52 नवीन
अतिनेमके!!!!! कृष्णासारखे देव आणि भीमार्जुनासारखे योद्धे असले तरी बेशिक गोष्ट म्हंजे भावकीची भांडणे असल्यामुळेच ही कथा इंड्यन जन्तेला जास्त आपल्यातली वाटली असावी असे वाटते. राम वगैरे ठीके, पण तो तर बोलूनचालून आदर्श, त्यामुळे जरा आवाक्याबाहेरचाच. महाभारत मात्र एकदम "आपल्यातले" वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आमची आय कीर्तनकार तिच्या

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/02/2015 - 16:04 नवीन
आमची आय कीर्तनकार तिच्या शब्दांत बोलायचे झाल्यास रामायण :- मानवी स्वभावातल्या चांगल्या गुणांचा चांगुलपणाचा अतिरेक झाल्यावर जे होते त्याची कथा महाभारत :- मानवी स्वभावातल्या नीच गुणांचा अतिरेक झाल्यावर जे होते त्याची कथा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

क्या बात है, परफेक्ट वर्णन

बॅटमॅन
Wed, 09/02/2015 - 16:18 नवीन
क्या बात है, परफेक्ट वर्णन एकदम! सहीच. आता काही सेकुलर आणि लिबरल लोक्स या वर्णनावरून दोन्ही ग्रंथ 'अतिरेक्यां'ना पोषक आहेत असा जावईशोध लावायलाही कमी करणार नाहीत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मुद्दा हा गोथम नरेश का अतिरेक

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/02/2015 - 16:22 नवीन
मुद्दा हा गोथम नरेश का अतिरेक टाळा! अतिरेक टाळणे ह्या सदरा खाली सेक्युलर अन लिबरल सदरे काढून डोसक्याला गुंडाळतात हेच खरे साले :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्याला काही इलाज नाय सरजी,

बॅटमॅन
Wed, 09/02/2015 - 16:36 नवीन
त्याला काही इलाज नाय सरजी, एकवेळ कुत्रा म्यांवम्यांव आणि मांजर भू भू करेल पण यांच्यात बदल काही व्हायचे नाहीत. तरी अलीकडे जागृती होतेय हे चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बॅट्या

नाखु
Wed, 09/02/2015 - 17:05 नवीन
शिवचरीत्र माहीतीची लेखमाला चालू कर!!!(हे धागे सध्या साईडलाईन ला टाक) अन्यथा रोज दहा खरडींचा मारा करीन. नाखुस सुपारीवाला चिमण हटेला गँग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

:) नाखु रोज दहा खरडींचा

माहितगार
गुरुवार, 09/03/2015 - 09:33 नवीन
:) नाखु रोज दहा खरडींचा माराची सुपारी घेण्या आधी बहुसंख्य मिपा धागे गुणीले प्रतिसाद लिहिणारे गुणीले दहा-दहा खरडी = ? खरडी हा गुणाक्रार केलाय ना. काल रात्री मिपावरील सर्व धागे आमच्या स्वप्नात येऊन विचारत होते कि बहुतेक धागालेखाच्या मुख्य मुद्द्यापासून भरकटत राहणे यात आम्हा धाग्यांचा काय दोष. आमचा हा धागा तर या चिंतेत पडला होता शिवचरीत्र माहीतीची लेखमालेतही लोक केवळ भावकीपाहू लागले बाकी काही दिसलच नाही तर आपल्या नाखुस सुपारीवालांना किती खरडींचा मारा करावा लागेल ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अहो भावकी चा प्रतिसाद विषय

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/03/2015 - 10:19 नवीन
अहो भावकी चा प्रतिसाद विषय सोडुन वाटल्यास मी माफ़ी मागतो तुमची, पण थेट बोला की राव हे काय उगा आडून आडून, उरता उरला नंतर च्या प्रतिसादांचा प्रश्न तर ते एकातुन एक येत गेले _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अहो तसं कै नै, नाखुंच्या

माहितगार
गुरुवार, 09/03/2015 - 16:09 नवीन
अहो तसं कै नै, नाखुंच्या खरड्यांना धास्तावून आमच्या धाग्यावर खरेच बहिष्कार झाला तर काय म्हणून धास्तावलो आणि बाकी आम्ही पण :) स्मायली टाकूनच विनोदानी लिहिलकी त्यामुळे ह. घ्या. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

तुमचा

नाखु
गुरुवार, 09/03/2015 - 16:54 नवीन
धागा लवकरच शंभरी गाठो आणि द्विशतकही करो ही शुभेच्छा !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा